ओबीसी आरक्षणाला कुठल्याही प्रकारे धक्का न लावता कौशल्याने तोडगा काढल्याबद्दल सरकारचे केले विशेष अभिनंदन
विशेष प्रतिनिधी
शिंदे – फडणवीस सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले. मराठा समाजाने खूप संघर्ष केला आणि आज त्यांचा विजय झाला, अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे. राज्य सरकारने कुणबी प्रमाणपत्रासंबंधित अध्यादेश आणि राजपत्र जारी केल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर स्तुतीसुमने उधळली. यावर आता विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. भाजप मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महायुती सराकचं विशेष अभिनंदन केले आहे.Mahayuti government will get reservations that will survive in court Chandrakant Patil
चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या सर्व मागण्या महायुती सरकारने मान्य केल्या आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळायला हवे, अशीच महायुती सरकारची भूमिका आहे. या दिशेनेच आमचे सरकार प्रयत्नशीलही आहे. जरांगे पाटील यांनी आंदोलन स्थगित करून महायुती सरकारला केलेल्या सहकार्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. ‘
याचबरोबर ‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील आमचे सरकार मराठा समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून त्यांना न्याय देईल. ओबीसी आरक्षणाला कुठल्याही प्रकारे धक्का न लावता कौशल्याने तोडगा काढणाऱ्या मुख्यमंत्री शिंदे यांचं विशेष अभिनंदन. आमचं महायुती सरकार कोर्टातही टिकेल असेच आरक्षण मिळवून देईल, असा दृढ विश्वासही या निमित्ताने व्यक्त करतो.’ असंही पाटील म्हणाले.
याशिवाय “सगेसोयऱ्यां”साठी या नवीन शब्दाचा उल्लेख पहिल्यांदाच करण्यात आला आहे. राजपत्र आणि अध्यादेश इतक्या लवकर जारी करणे, हे इतिहासात पहिल्यांदाच झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चांगले काम केलं आहे. समाज म्हणून त्यांचा विरोध संपला, अशी घोषणा मनोज जरांगे यांनी केली.’
Mahayuti government will get reservations that will survive in court Chandrakant Patil
महत्वाच्या बातम्या
- समलैंगिक भागीदार प्रकरणी पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे स्पष्ट केले मत, म्हटले…
- ज्ञानवापींच्या तीन शिलालेखांमध्ये आश्चर्यकारक खुलासे!
- हरियाणाचे गृहमंत्री अनिल विज यांनी काँग्रेस नेते राहुल गांधींवर निशाणा, म्हणाले…
- राहुल गांधींनी काढली भारत जोडो न्याय यात्रा; पण INDI आघाडीत वाढला वजाबाकीचाच आकडा!!