• Download App
    Mahayuti are certain to be elected in the Rajya Sabha elections; the remaining one candidate should be decided by the Mahavikas Aghadi!; Fadnavis strikes a wedge राज्यसभा निवडणुकीत महायुतीचे सहा उमेदवार निवडून येणे पक्के; उरलेला एक उमेदवार महाविकास आघाडीने ठरवावा!; फडणवीसांनी मारली पाचर

    राज्यसभा निवडणुकीत महायुतीचे सहा उमेदवार निवडून येणे पक्के; उरलेला एक उमेदवार महाविकास आघाडीने ठरवावा!; फडणवीसांनी मारली पाचर

    Mahavikas Aghadi!; Fadnavis

    नाशिक : राज्यसभा निवडणुकीत महायुतीचे सहा उमेदवार निवडून येणे पक्के आहे; उरलेला एक उमेदवार महाविकास आघाडीने ठरवावा!!, अशा स्पष्ट शब्दांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यसभा निवडणुकीतले चित्र स्पष्ट केले. त्यामुळे शरद पवार महाविकास आघाडीचे राज्यसभा उमेदवार म्हणून उभे राहणार की कुठला वेगळाच मार्ग अवलंबणार??, यावर दाट संशय निर्माण झाला.Mahayuti are certain to be elected in the Rajya Sabha elections; the remaining one candidate should be decided by the Mahavikas Aghadi!; Fadnavis strikes a wedge

    राज्यसभा निवडणुकीत शरद पवार उतरणार आणि ते महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून उतरणार, असा दावा संजय राऊत यांनी केला. त्याचवेळी शरद पवारांच्या उमेदवारी विषयी मोठी शंका तयार झाली. शरद पवार खरंच महाविकास आघाडीचे उमेदवार होणार आणि विरोधी राजकारणच पुढे रेटत राहणार, की सुनेत्रा पवार त्यांना स्वतःच्या राष्ट्रवादीतली काही मते उपलब्ध करून देणार??, याविषयी सुद्धा राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली.



    पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजधानी नवी दिल्लीत मात्र राज्यसभा निवडणुकीत सहा उमेदवार महायुतीचे निवडून येतील. यामध्ये भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचा समावेश असेल. उरलेला एक उमेदवार महाविकास आघाडीचा निवडून येऊ शकतो, तो त्यांनी ठरवावा, असे स्पष्ट केले. त्यामुळे महाविकास आघाडीचा उमेदवार या रूपाने शरद पवार पुढे येणार, की सुनेत्रा पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांनाच आपला उमेदवार म्हणून पुढे करणार??, असा संशय तयार झाला.

    – सुनेत्रा पवारांना घ्यावी लागेल भाजपची परवानगी

    सुनेत्रा पवारांनी शरद पवारांचे नाव राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार म्हणून पुढे केले तर ते कदाचित राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार संख्येच्या बळावर राज्यसभेत पोहोचू सुद्धा शकतील, पण सुनेत्रा पवारांना त्यासाठी महायुतीतल्या सर्वांत मोठ्या पक्षाची म्हणजेच भाजपची परवानगी घ्यावी लागेल. भाजपने परवानगी दिली, तरच सुनेत्रा पवार शरद पवारांचे नाव राज्यसभेसाठी उमेदवार म्हणून निवडू शकतील. अन्यथा शरद पवारांना महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून राज्यसभेवर निवडून यावे लागेल, पण त्यामुळे महाविकास आघाडीत सुद्धा मोठी फूट पडेल. कारण शरद पवारांना काँग्रेसचा आणि शिवसेनेचा आतून विरोध आहे.

    – पवारांना काँग्रेसचा विरोध

    शरद पवार एकीकडे भाजपला डोळा मारत राहणार आणि दुसरीकडे महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून राज्यसभेत पोहोचणार असतील, तर त्यांना काँग्रेसने उमेदवारीच द्यायला नको त्यांनी रेटून उमेदवारी केली, तर त्यांना मते द्यायला नकोत, असा मतप्रवाह काँग्रेसमध्ये आहे या मतप्रवाहाची दखल घेऊनच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ दिल्ली दरबारी पोहोचले तिथे त्यांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधींशी चर्चा केली. त्यामुळे शरद पवारांच्या उमेदवारीला काँग्रेस पाठिंबा देणार की विरोध करणार याविषयी संभ्रम तयार झाला.

    – फडणवीसांनी मारली पाचर

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीच्या सहा उमेदवारांच्या बाजूने पक्का कौल दिल्यामुळे शरद पवारांची उमेदवारी राजकीय दृष्ट्या अडचणीत आली. त्यांना एकतर महाविकास आघाडी कडून लढावे लागेल, पण त्यातून महाविकास आघाडीतल्या फुटीचा धोका पत्करावा लागेल किंवा सुने पुढे शरणागती पत्करून अखंड राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी स्वीकारून राज्यसभेत पोहोचावे लागेल. म्हणजेच एक प्रकारे भाजपच्या सत्तेपुढे शरणागती पत्करावी लागेल.

    Mahayuti are certain to be elected in the Rajya Sabha elections; the remaining one candidate should be decided by the Mahavikas Aghadi!; Fadnavis strikes a wedge

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    AI फॉर एग्रीकल्चर वर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा AI इंडिया समिटमध्ये विशेष संवाद!!; महाराष्ट्राचे मॉडेल स्वीकारले संपूर्ण देशाने!!

    महाराष्ट्रातल्या राजकीय धबडग्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मात्र दिल्लीतल्या AI समिटमध्ये मुशाफिरी; महाराष्ट्रासाठी महत्त्वपूर्ण करार आणि घोषणा

    Ganesh Naik : मंत्री गणेश नाईक म्हणाले- मराठी लोकांनी गुजरातमध्ये जाऊन व्यवसाय करावा, गुजराती लोकांनीच इकडे यावे असे काही नाही