• Download App
    महावितरणचा गलथान कारभार, सहा महिन्यांपासून विश्वासार्हतेचे निर्देशांक प्रसिध्दच केले नाहीत Mahavitaran has not published its credibility index for six months

    महावितरणचा गलथान कारभार, सहा महिन्यांपासून विश्वासार्हतेचे निर्देशांक प्रसिध्दच केले नाहीत

    वीज नियामक आयोगाने घालून दिलेल्या नियमावलीप्रमाणे महावितरणने दरमहा विश्वासार्हतेचे निर्देशांक प्रसिध्द करणे आवश्यक आहे. महावितरणने त्यांच्या संकेतस्थळावर मार्च २०२१ नंतर हे निर्देशांक गेल्या सहा महिन्यांपासून प्रसिद्ध केलेले नाहीत. Mahavitaran has not published its credibility index for six months


    विशेष प्रतिनिधी

    पुणे: वीज नियामक आयोगाने घालून दिलेल्या नियमावलीप्रमाणे महावितरणने दरमहा विश्वासार्हतेचे निर्देशांक प्रसिध्द करणे आवश्यक आहे. महावितरणने त्यांच्या संकेतस्थळावर मार्च २०२१ नंतर हे निर्देशांक गेल्या सहा महिन्यांपासून प्रसिद्ध केलेले नाहीत.
    मार्च २०२१ या संपूर्ण महिन्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात तांत्रिक बिघाडाच्या ९ हजार ११५ घटना घडल्या. ज्यामधे राज्यातील २ कोटी १७ लाख २९ हजार ५७३ नागरिकांना एकूण ११ हजार १९९ तास अंधारात बसावे लागले.

    मार्च २०२१ मध्ये पुण्यामध्ये तांत्रिक बिघाडाच्या ६४८ घटना घडल्या ज्यात पुणेकरांना ७७० तास अंधारात बसावे लागले. महावितरणला नियमाप्रमाणे दरमहा हे निर्देशांक प्रसिध्द करण्यास भाग पाडावे आणि निर्देशांकातून समोर येणार्‍या महावितरणच्या ढिसाळ कारभारात सुधारणा करावी अशी माहिती सजग नागरिक मंचाच्या वतीने विवेक वेलणकर यांनी महावितरणकडे केली आहे.

    Mahavitaran has not published its credibility index for six months

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    राष्ट्रवादीच्या भ्रष्टाचाराच्या फाईलींचे कपाट तुम्हीच मोदी साहेबांना उघडायला सांगा; अजितदादा गटाचा पवारांना टोला!!

    पुरोगामी महाराष्ट्राच्या नुसत्याच तोंडी वाफा; दुसऱ्या टप्प्यात मतदारांनी घरात काढल्या झोपा!!; वाचा मतदानाचा आकडा!!

    435 कोटी थकबाकीच्या कारखान्याच्या गोडाऊनला बँकेने ठोकले सील; पवार समर्थकांनी त्याचा संबंध जोडला पवारांच्या सभेशी!!