• Download App
    Maharashtra's economy is worth Rs 51 lakh crore, leaving behind some countries in Europe and even countries in East Asia; The figures spoke from the Chief Minister's speech! महाराष्ट्राची अर्थव्यवस्था 51 लाख कोटींची, युरोप मधल्या काही देशांना आणि पूर्व आशियातल्या देशांनाही टाकले मागे; मुख्यमंत्र्यांच्या भाषणातून आकडे बोलले!!!

    महाराष्ट्राची अर्थव्यवस्था 51 लाख कोटींची, युरोप मधल्या काही देशांना आणि पूर्व आशियातल्या देशांनाही टाकले मागे; मुख्यमंत्र्यांच्या भाषणातून आकडे बोलले!!

    Chief Minister

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : महाराष्ट्राची अर्थव्यवस्था 51 लाख कोटी रुपयांची आहे, असे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युरोपमधल्या ऑस्ट्रिया आणि पूर्व आशियातल्या काही देशांना महाराष्ट्र आणि मागे टाकल्याचे आकडेवारीनिशी स्पष्ट केले.Maharashtra’s economy is worth Rs 51 lakh crore, leaving behind some countries in Europe and even countries in East Asia; The figures spoke from the Chief Minister’s speech!!

    राज्याच्या अर्थसंकल्पावर सुरू असलेल्या चर्चेदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या आरोपांना ठामपणे उत्तर दिले. विधानसभेत बोलताना त्यांनी राज्यावर वाढलेल्या कर्जाच्या मुद्द्यावरून विरोधकांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले. शिवसेना ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांनी आपल्या भाषणात राज्याच्या कर्जाचा मुद्दा उपस्थित केला होता. यावर प्रतिक्रिया देताना फडणवीस यांनी प्रभू यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रातील आर्थिक तपशीलांचा उल्लेख करत तुलना केली.

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, त्यांनी सुनील प्रभू यांचे निवडणूक प्रतिज्ञापत्र तपासले. त्या प्रतिज्ञापत्रानुसार प्रभू यांची एकूण संपत्ती सुमारे 14 कोटी रुपये आहे, तर त्यांच्यावर सुमारे 3.54 लाख रुपयांचे कर्ज आहे. या आकडेवारीचा विचार केला तर त्यांच्यावर केवळ 25.28 टक्के दायित्व येते, असे त्यांनी स्पष्ट केले. एवढ्या दायित्वामुळे एखादी व्यक्ती कर्जबाजारी होते का किंवा तिला नादारी घोषित करावी लागते का, असा सवाल करत त्यांनी विरोधकांच्या आरोपांवर अप्रत्यक्ष टोला लगावला.



    याच मुद्द्याला पुढे नेत मुख्यमंत्री म्हणाले की, जसे सुनील प्रभू एवढ्याशा कर्जामुळे नादारी जाहीर करणार नाहीत, त्याचप्रमाणे महाराष्ट्राची अर्थस्थितीही मजबूत आहे. राज्यावर सध्या सुमारे 18 टक्के कर्जाचे ओझे आहे. त्यामुळे प्रभू यांच्या उदाहरणापेक्षा राज्याची परिस्थिती अधिक चांगली असल्याचे त्यांनी सांगितले. राज्य आर्थिकदृष्ट्या स्थिर असून विकासाचा वेग कायम राखण्यावर सरकारचा भर असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

    – जगातली तिसाव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था

    या चर्चेदरम्यान फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेबाबतही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, महाराष्ट्राला स्वतंत्र राष्ट्र मानले, तर जगातील मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये त्याचे स्थान सुमारे तिसाव्या क्रमांकावर असेल. त्यांनी सांगितले की, जगातील पहिल्या 35 देशांच्या अर्थव्यवस्थांचा विचार केला तर महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ऑस्ट्रिया, थायलंड, फिलिपिन्स, नॉर्वे, व्हिएतनाम आणि बांगलादेश यांच्यापेक्षाही मोठी झाली आहे. ही वाढ राज्याच्या आर्थिक क्षमतेचे द्योतक असल्याचे त्यांनी नमूद केले.

    महाराष्ट्राचा जीएसडीपी सुमारे 16 लाख कोटी

    राज्याच्या आर्थिक वाढीचा आढावा देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी जीएसडीपीच्या आकडेवारीचाही उल्लेख केला. 2013-14 या आर्थिक वर्षात महाराष्ट्राचा जीएसडीपी सुमारे 16 लाख कोटी रुपये होता. मात्र गेल्या 10 वर्षांत या आकड्यात मोठी वाढ झाली असून तो सुमारे 51 लाख कोटी रुपयांवर पोहोचला आहे. म्हणजेच एका दशकात राज्याच्या अर्थव्यवस्थेने जवळपास तीनपट वाढ नोंदवली आहे. विकासाचा हा वेग कायम राहिला तर पुढील दोन ते तीन वर्षांत संयुक्त अरब अमिराती आणि सिंगापूरसारख्या देशांच्या अर्थव्यवस्थेलाही महाराष्ट्र मागे टाकू शकतो, असा विश्वासही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

    Maharashtra’s economy is worth Rs 51 lakh crore, leaving behind some countries in Europe and even countries in East Asia; The figures spoke from the Chief Minister’s speech!!

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    मनिकर्णिका घाटाचे तोडकाम नाही, तर संवर्धन; जयंत पाटलांच्या खोट्या narrative ला देवेंद्र फडणवीसांचे परखड प्रत्युत्तर

    शेती क्षेत्रात कर्तृत्व गाजविणाऱ्या महाराष्ट्रातील महिलांचा विधानभवनात सन्मान; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रे

    RTE प्रवेशातील 1 किलोमीटर अंतराची जाचक अट रद्द; वंचित बहुजन आघाडीच्या लढ्याला यश