वृत्तसंस्था
मुंबई : महाराष्ट्रात दोन दिवसांचा वीकेंड लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्यानुसार शनिवार-रविवारी (10-11 एप्रिल) लॉकडाऊन करण्यात येईल. तर उद्यापासून दररोज रात्री आठ वाजल्यापासून सकाळी सात वाजेपर्यंत रात्रीची संचारबंदी लागू राहील. वीकेंड लॉकडाऊनच्या काळात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरु राहणार आहे. Maharashtra Weekend Lockdown Public Transport
सार्वजनिक वाहतूक सुरु राहणार
शुक्रवार 9 एप्रिल रात्री आठ वाजल्यापासून सोमवार 12 एप्रिल सकाळी सात वाजेपर्यंत वीकेंड लॉकडाऊन लागू असेल. या काळात केवळ अत्यावश्यक सेवा सुरु राहील. रिक्षा, टॅक्सी, बस, ट्रेन, खाजगी वाहतूक अशी सर्व प्रकारची परिवहन सेवा सुरु राहील. मात्र निम्म्या क्षमतेने सार्वजनिक वाहतूक सुरु राहणार असल्याची माहिती अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली. मास्क बंधनकारक
गर्दीची ठिकाणं बंद राहणार
पुढचे काही दिवस मॉल, रेस्टॉरंट, बार बंद राहतील, मात्र होम डिलीव्हरी सुरु असेल. मैदानं, बाग-बगिचे, समुद्र किनारे, गेट वे ऑफ इंडियासारखी पर्यटन स्थळे या काळात बंद राहतील, असं मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी सांगितलं.
काय सुरु काय बंद?
- सोमवार 5 एप्रिल रात्री 8 वाजल्यापासून नियमावली लागू
- पुढील आठवड्यात रात्री 8 ते सकाळी सात वाजेपर्यंत रात्रीची संचारबंदी
- मॉल, थिएटर, बार, रेस्टॉरंट बंद, टेक अवे सर्व्हिस चालू राहणार
- सरकारी कार्यालय 50 टक्के क्षमतेने काम करणार
- इंडस्ट्री चालू राहणार, कामगारांवर कुठलेही निर्बंध नाहीत
- बांधकाम चालू, सरकारी ठेके असलेली कामं सुरु राहणार
- भाजी मार्केटवर कुठल्याही प्रकारचे निर्बंध नाहीत. फक्त गर्दी कमी करण्यासाठी कठोर निर्णय
एकमताने चर्चा करुन निर्णय
निर्णय घेण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, हॉटेल, चित्रपट क्षेत्रातील तज्ज्ञ, उद्योजक यांच्याशी चर्चा केली. शूटिंग सुरु राहतील, मात्र गर्दी होणार असेल, तिथे परवानगी दिली जाणार नाही. सर्व ट्रान्सपोर्ट व्यवस्था सुरु राहणार, क्षमतेच्या 50 टक्क्याने सर्व सार्वजनिक वाहतूक सुरु राहणार, असं मलिक यांनी सांगितलं.