विशेष प्रतिनिधी
मुंबई : आज तुम्ही म्हणताय, कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे म्हणून आम्ही एकत्र आलो. मग 20 वर्षांपूर्वी तुम्ही वेगळे झालात, त्यावेळी काय महाराष्ट्र छोटा होता का??, असा खोचक सवाल करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे बंधूंच्या ऐक्याची शिवाजी पार्कवर पोलखोल केली.Maharashtra small at that time??; You came together for selfish reasons; Eknath Shinde’s attack on Thackeray brothers!!
ठाकरे बंधूंच्या ऐक्यावर एकनाथ शिंदे यांनी जोरदार घणाघात केला. हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे त्यावेळी तुम्हाला एकत्र यायला सांगत होते, त्यावेळी तुम्ही एकत्र आला नाहीत त्यांची इच्छा पूर्ण केली नाही आणि आता तुमच्या राजकीय अस्तित्वाला धोका उत्पन्न झाल्यानंतर तुम्ही एकत्र आलाय, पण आता महाराष्ट्रातले आणि मुंबईतली जनता तुम्हाला भुलणार नाही, असा टोला एकनाथ शिंदे यांनी हाणला.
– लंडन मधली थंड हवा खाल्ली
पहलगाम वर हल्ला झाला, त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेश दौऱ्यावरून भारतात परत आले, पण तुम्ही त्यावेळी लंडनला होतात. तिथे थंड हवा खात होतात. पहलगामधल्या हल्ल्यानंतर तुम्ही मुंबईला परत आला नाहीत. मराठी माणसाचे अश्रू तुम्ही पुसले नाहीत. निवडणुका झाल्या की परदेशात निघून जायचे एवढेच तुम्हाला माहिती आहे. तुमच्या स्वतःच्या घरासाठी परवानग्या आणि गरिबांच्या घरासाठी विकासात अडथळा हेच तुमचे धोरण आहे, असे शरसंधान देखील एकनाथ शिंदे यांनी साधले.
– स्वार्थासाठी तुम्ही एकत्र
कोणत्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा असल्याचे तुम्ही आता सांगता. पण 20 वर्षांपूर्वी तुम्ही वेगळे झालात, त्यावेळी काय महाराष्ट्र छोटा होता का??, त्यावेळी तुम्ही स्वार्थासाठी वेगळे झालात आणि आता स्वार्थासाठीच एकत्र आलात, हे सगळे महाराष्ट्र जाणतो. त्यामुळे तुम्ही आता मुंबईकरांना आणि महाराष्ट्रातल्या लोकांना फसवू शकत नाही, असा टोमणाही एकनाथ शिंदे यांनी हाणला.
Maharashtra small at that time??; You came together for selfish reasons; Eknath Shinde’s attack on Thackeray brothers!!
महत्वाच्या बातम्या
- राज ठाकरे गौतम अदानींवर पुराव्यांसह आरोप करणार म्हणून शिवाजी पार्कच्या सभेला शरद पवार गैरहजर??
- शरद पवारांचा तुतारीवाला डाव्या हाताला ठेवून राज ठाकरेंचा गौतम अदानींवर हल्लाबोल!!
- पुण्यात भाजपने लावली यंत्रणा कामाला; पिंपरी चिंचवड मध्ये महेश लांडगेंना मुख्यमंत्र्यांचे “बळ”; दोन्हीकडे अजितदादा “कॉर्नर”!!
- CDS Anil Chauhan : CDS म्हणाले- ऑपरेशन सिंदूर थांबले आहे, संपले नाही, पाक वाईट रीतीने हरला