• Download App
    MAHARASHTRA : धक्कादायक…!कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा ? २०२० मध्ये महाराष्ट्रातच सर्वाधिक शेतकरी आत्महत्या । MAHARASHTRA: Shocking…! Where is my Maharashtra? Maharashtra has the highest number of farmer suicides in 2020

    MAHARASHTRA : धक्कादायक…!कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा ? २०२० मध्ये महाराष्ट्रातच सर्वाधिक शेतकरी आत्महत्या

    एनसीआरबी च्या अहवालानुसार 2020 मध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या घटनांमध्ये 18% वाढ झाली आहे. यामध्ये दुर्देव म्हणजे महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या झालेल्या आहेत. MAHARASHTRA: Shocking…! Where is my Maharashtra? Maharashtra has the highest number of farmer suicides in 2020


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : नैसर्गिक संकटे, उत्पादनात घट आणि यामधून नैराश्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढतच आहेत. शेती व्यवसयात प्रगती होत असली तरी वाढत्या आत्महत्या या वास्तवाकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. एनसीआरबी च्या अहवालानुसार 2020 मध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या घटनांमध्ये 18% वाढ झाली आहे.

    यामध्ये दुर्देव म्हणजे महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या झालेल्या आहेत. महाराष्ट्र कुठ नेऊन ठेवलाय माझा महाराष्ट्र जिथं माझं शेतकरी राजा आत्महत्या करतोय, जिथं माझी महाराष्ट्रातील तरुण पिढी बेरोजगारी पुढं आत्महत्या करतेय.

    भारत गेल्या वर्षी कोरोना महामारीला तोंड देत होता तेव्हा देशात १.५३ लाखांपेक्षा जास्त जणांनी आत्महत्या केली आहे. त्यात 13% दुर्घटना महाराष्ट्रातील होत्या. राज्यात आत्महत्या केलेल्यांपैकी दर पाचवी व्यक्ती ही शेतीवर अवलंबून होती. राष्ट्रीय गुन्हे रेकॉर्ड ब्युरोकडील ताज्या आकडेवारीनुसार देशात आत्महत्या केलेल्या एकूण १.५३.०५२ जणांत १०,६७७ (७ टक्के) शेतीशी संबंधित होते.



    शेतीवर उपजीविका करणारे सर्वाधिक ४००६ जण महाराष्ट्राचे होते. त्यात २३२४ जणांची स्वतःची शेती होती.तर राहिलेले २४३ भूमिहीन शेतकरी आणि १४३९ शेतमजूर होते . कोरोना काळात आत्महत्या करणाऱ्यात सर्वाधिक बेरोजगारांचा समावेश होता. एकूण १५,६५२ जण बेरोजगार होते.

    २०१६ मध्ये एकूण ११३८९ शेतकरी आणि शेतमजूरांनी आत्महत्या केली. २०१७ मध्ये ती १०६५५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली होत्या. यावर्षी प्रमाण हे घटले होते. २०१८ मध्ये १०३४९ आणि २०१९ मध्ये अशा एकूण १०२८१आत्महत्या झाल्या. २०२०मध्ये आत्महत्या प्रकरणांची संख्या १०६७७ एवढी होती. जी २०१७ च्या तुलनेत वाढलेली आहे.

    बेरोजगार आत्महत्या संख्या

    कोरोना काळात एकूण आत्महत्या करणाऱ्यांपैकी १५,६५२ बेरोजगार होते. त्यातील सर्वाधिक १८४३ महाराष्ट्रातील होते.त्यानंतर १७६९ आत्महत्या केरळ , १५६६ तमिळनाडू, १३९८ ओडिशा आणि १३५९ कर्नाटक मधील होत्या.

    सरकारी कर्मचारी आत्महत्या

    आत्महत्या करणाऱ्यांपैकी २०५७ सरकारी कर्मचारी होते. त्यात सर्वाधिक २९९ महाराष्ट्रातील , २६९ तमिळनाडू , १८१ कर्नाटक , मध्य प्रदेश आणि राजस्थान मधील ११२ होते.

    MAHARASHTRA : Shocking…! Where is my Maharashtra? Maharashtra has the highest number of farmer suicides in 2020

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस