• Download App
    Maharashtra Rajya Sabha Election Set to be Unopposed; Supriya Sule to Visit Matoshree VIDEOS राज्यसभा बिनविरोध होईल असे दिसतंय; शरद पवारांना पाठिंबा दिल्याबद्दल सुप्रिया सुळेंनी मानले ठाकरेंचे आभार

    Supriya Sule : राज्यसभा बिनविरोध होईल असे दिसतंय; शरद पवारांना पाठिंबा दिल्याबद्दल सुप्रिया सुळेंनी मानले ठाकरेंचे आभार

    Supriya Sule

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : Supriya Sule  राज्यसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत महाराष्ट्राच्या राजकारणातील ‘संस्कृती’ आणि ‘सौहार्द’ पुन्हा एकदा अधोरेखित होताना दिसत आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून शरद पवार यांनी अर्ज दाखल केल्यानंतर, शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आभार मानण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे आज संध्याकाळी साडेसहा वाजता ‘मातोश्री’वर जाणार आहेत.Supriya Sule

    राज्यसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा आज अखेरचा दिवस होता. भाजपकडून ४, शिवसेना शिंदे सेनेकडून १, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून १ तर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. सात जागेंसाठी सातच अर्ज आल्याने ही निवडणूक बिनविरोधी होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. शरद पवारांचा उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधत सर्वांचे आभार मानले.Supriya Sule



    नेमके काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

    ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी ट्वीट केले होते की, शिवसेनेने अजुनही राज्यसभेची जागा सोडलेली नाही. त्यात ते आज शरद पवार यांचा उमेदवारी अर्ज भरतानाही उपस्थित नव्हते. याबाबत सुप्रिया सुळे यांना विचारले असता त्या म्हणाल्या, आज सगळे सचिन तेंडूलकर यांच्याकडील लग्नाला उपस्थित आहेत. मी परवा उद्धव ठाकरेंना भेटायला गेले होते. आज संध्याकाळी साडेसहा वाजता पुन्हा ठाकरे कुटुंबाला भेटायला मातोश्रीवर जाणार आहे. शरद पवारांना राज्यसभेसाठी पाठिंबा दिल्याबद्दल त्यांचे आभार मानणार आहे.

    यावेळी माध्यमांशी संवाद साधताना सुप्रिया सुळे भावूक झाल्या. “आमची ही नाती गेली सहा दशके प्रेमाची आहेत. २००६ मध्ये मी जेव्हा पहिल्यांदा राज्यसभेत गेले होते, तेव्हा आदरणीय बाळासाहेब ठाकरे हयात होते आणि माझी निवडणूक बिनविरोध झाली होती. आज २० वर्षांनंतर बाळासाहेब आपल्यात नाहीत, पण शिवसेना आणि काँग्रेसने दाखवलेली ही समंजस भूमिका म्हणजे महाराष्ट्राची खरी ‘आण-बाण-शान’ आहे,” असे त्या म्हणाल्या. यशवंतराव चव्हाणांच्या महाराष्ट्रात विरोधक हा शत्रू नसून वैचारिक लढाई असते, हीच संस्कृती जपण्याचा प्रयत्न सर्व पक्ष करत असल्याचे त्यांनी नमूद केले.

    ‘इंडिया’ आघाडीचे बळ

    शरद पवार यांच्या उमेदवारीला केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशपातळीवरूनही पाठिंबा मिळत आहे. “कालच माझे अखिलेश यादव यांच्याशी बोलणे झाले, त्यांनीही सहकार्याची भूमिका मांडली. कम्युनिस्ट पक्षाचे पदाधिकारी आणि ज्यांनी गेल्या ६० वर्षांपासून पवारांना साथ दिली, ते सर्व आज आमच्यासोबत उभे आहेत,” असे सांगत सुप्रिया सुळे यांनी महाविकास आघाडी आणि ‘इंडिया’ (INDIA) अलायन्सचे आभार मानले.

    पार्थ पवारांना आत्याचा मोलाचा सल्ला

    याच निवडणुकीत अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार हे पहिल्यांदाच राज्यसभेवर जात आहेत. आत्या म्हणून पार्थला काय सल्ला द्याल? या प्रश्नावर सुप्रिया सुळे यांनी शरद पवारांनी दिलेला कानमंत्र सांगितला. “लोकसभा किंवा राज्यसभेत गेल्यानंतर कान उघडे ठेवावेत आणि कमी बोलावे. जेव्हा संधी मिळेल तेव्हा अत्यंत अभ्यासपूर्णच बोलावे. कारण तिथे बसलेला प्रत्येक व्यक्ती आपल्यापेक्षा जास्त जाणकार असतो आणि संपूर्ण देश आपल्याकडे बघत असतो,” असा मोलाचा सल्ला सुप्रिया सुळे यांनी पार्थ पवारांना दिला.

    अजितदादांच्या अपघाताची पारदर्शक चौकशी व्हावी

    उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अपघात प्रकरणी व्हीएसआर कंपनीच्या मालकाची आज सीआयडीने चौकशी केली. यावर प्रतिक्रिया देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, अजितदादांवर प्रेम करणारी सर्वच जनता अस्वस्थ आहे. त्यामुळे अजितदादांच्या अपघाताचा पारदर्शक तपास व्हावा अशी सर्वांचीच मागणी आहे. यावर वारंवार रोहित पवारांनी प्रश्न उपस्थित केले आहेत, तसेच जय पवारांनीही त्यावर भाष्य केले आहे. त्यामुळे अजित पवारांच्या अपघाताची पारदर्शच चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली.

    Maharashtra Rajya Sabha Election Set to be Unopposed; Supriya Sule to Visit Matoshree VIDEOS

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Iran war effect : पुण्यात व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा स्थगित; सरकारचे घरगुती गॅस पुरवठ्याला प्राधान्य

    Minister Pratap Sarnaik : मंत्री सरनाईकांची घोषणा- एसटी बसचालक, वाहक, कर्मचाऱ्यांना दररोज अल्कोटेस्ट सक्तीची, प्रवासी सुरक्षेला प्राधान्य

    Shinde : राज्यसभेसाठी एकनाथ शिंदेंकडून ज्येष्ठ नेत्यांना डावलून नव्या चेहऱ्याला संधी, ज्योती वाघमारे यांचा अर्ज दाखल