विशेष प्रतिनिधी
पालघर : क्रूझवरील पार्टी प्रकरणी अभिनेता शाहरुख खान चा मुलगा आर्यन खान अटक प्रकरणात एनसीबी ने साक्षीदार बनविलेल्या किरण गोसावी याच्या विरोधात महाराष्ट्र पोलीस चांगलेच मागे लागले आहेत. आता गोसावी यांच्या विरोधात पालघर जिल्ह्यातील केळवे सागरी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.Maharashtra Police has registered a case against Kiran Gosavi in an old case in Palghar district, he is the NCB’s arbitrator in the Aryan Khan case
यापूर्वी पुण्यातही गोसावी याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी त्याला फरार घोषित केले आहे.पालघर जिल्ह्यातील एडवण येथील उत्कर्ष तरे व आदर्श किणी ह्या दोन तरुणांना मलेशिया येथें नोकरी देतो असे सांगून त्यांच्याकडून दीड लाख रुपये ची रक्कम गोसावी यांनी बँक खात्या मार्फत घेतली होती.
त्याच्या नवी मुंबई येथील के पी इंटरप्राईजेस या कार्यालयातून तो आपली सूत्रे हलवत होता.ह्या दोन मुलांना तिकीट आणि व्हिसा दिल्या नंतर ते विमानतळावर गेल्यावर तिकीट आणि व्हिसा बनावट असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
त्यानंतर दोन्ही तरुणांनी केळवे पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला होता. मात्र त्यांचा तक्रारी अर्ज केळवे पोलीस ठाण्यात धूळ खात पडून होता.मात्र गोसावी याला पुरते घेरण्यासाठी पोलिसांनी जुनी फाईल ओपन केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आर्यन खान ड्रग प्रकरणात एनसीबी ने किरण गोसावी याला साक्षीदार बनविल्यानंतर एका वृत्तवाहिनीवर सुरू असलेल्या बातम्या दरम्यान आर्यन खान सोबत सेल्फी घेत असलेला किरण गोसावी ह्याला उत्कर्ष तरे यांनी आपली फसवणूक केलेली व्यक्ती हीच आहे
याची खात्री त्याला पटली आणि दोन्ही तरुणांनी तात्काळ केळवे पोलीस स्टेशन गाठून आपली फसवणूक करणाऱ्या गोसावी विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
दरम्यान अनेक गुन्हे दाखल असलेला गोसावीला एनसीबी ने साक्षीदार बनविल्याच्या प्रकरणाबाबत राष्ट्रवादी चे मंत्री नवाब मलिक यांनी आक्षेप घेतल्याने एनसीबी चे अधिकारी अडचणीत सापडले होते.
त्यातच ह्या प्रकरणात गृह विभागाकडून पालघर पोलिसांवर दबाव वाढत चालल्याने अखेर केळवे पोलीस ठाण्यात किरण गोसावी विरोधात रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला.
किरण गोसावी यांचे बालपण पालघर जिल्ह्यातील मनोर मध्ये गेले असून तो एक प्रामाणिक आणि हुशार विद्यार्थी म्हणून त्या भागात परिचित होता. मनोर मधील लालबहादूर हायस्कूल शाळेमधून त्याने नववी पर्यंतचे शिक्षण घेतले असून त्या शाळेत समोरच तो राहत होता.
Maharashtra Police has registered a case against Kiran Gosavi in an old case in Palghar district, he is the NCB’s arbitrator in the Aryan Khan case
महत्त्वाच्या बातम्या
- थोडी तरी लाज शिल्लक असेल तर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राजीनामा द्यावा किंवा मुख्यमंत्र्यांनी घ्यावा, अतुल भातखळकर यांची मागणी
- सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश : दिल्ली उच्च न्यायालय गुप्तचर-सुरक्षा संस्थांना आरटीआय अंतर्गत आणण्याचा निर्णय घेईल
- Csk चा शिलेदार ऋतुराज गायकवाडचे पुण्यातील घरी धूमधडाक्यात आगमन
- सरदार उधम सिंग मुव्ही रिव्ह्यू
- Target Killing : काश्मिरात दहशतवाद्यांचे पुन्हा भ्याड कृत्य, कुलगाममध्ये तीन परप्रांतीयांवर गोळीबार, दोन जणांचा मृत्यू