• Download App
    मोठी बातमी : कांद्याच्या दराला घसरगुंडी, 900 रुपये प्रतिक्विंटलपर्यंत घसरले दर, शेतकऱ्यांची चिंता वाढली । Maharashtra Onion prices Slashed By Rs 900 per quintal Big Reason To Worry For Farmers

    मोठी बातमी : कांद्याच्या दराला घसरगुंडी, 900 रुपये प्रतिक्विंटलपर्यंत घसरले दर, शेतकऱ्यांची चिंता वाढली

    किरकोळ बाजारात कांद्याचा भाव 50 ते 60 रुपये किलो आहे, पण शेतकऱ्यांना किती पैसे मिळतात हे सामान्य ग्राहकांना माहिती नसते. बहुतांश शेतकऱ्यांना 900 ते 1900 रुपये प्रतिक्विंटल दराने कांदा विकावा लागत आहे. खरा नफा दलाल आणि किरकोळ विक्रेते घेतात. शेतकऱ्यांना मिळणारा हा दर देशातील सर्वात मोठा कांदा उत्पादक असलेल्या महाराष्ट्रातील आहे. Maharashtra Onion prices Slashed By Rs 900 per quintal Big Reason To Worry For Farmers


    विशेष प्रतिनिधी

    नाशिक : किरकोळ बाजारात कांद्याचा भाव 50 ते 60 रुपये किलो आहे, पण शेतकऱ्यांना किती पैसे मिळतात हे सामान्य ग्राहकांना माहिती नसते. बहुतांश शेतकऱ्यांना 900 ते 1900 रुपये प्रतिक्विंटल दराने कांदा विकावा लागत आहे. खरा नफा दलाल आणि किरकोळ विक्रेते घेतात. शेतकऱ्यांना मिळणारा हा दर देशातील सर्वात मोठा कांदा उत्पादक असलेल्या महाराष्ट्रातील आहे. आशियातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ असलेल्या लासलगावमध्ये 16 नोव्हेंबर रोजी कांद्याचा किमान भाव केवळ 901 रुपये प्रति क्विंटलवर आला. तर मॉडेल प्राइसेस 1880 रुपये प्रति क्विंटल होती.

    उत्पन्न दुप्पट कसे होणार?

    16 नोव्हेंबर रोजी लासलगाव मंडईत लाल कांद्याचा किमान भाव केवळ 600 रुपये प्रतिक्विंटल होता. तर मॉडेल प्राइस २०२० रु. होती. महाराष्ट्र कांदा उत्पादक संघटनेच्या मते, बहुतांश लोक खूप कमी दराने आणि मॉडेलच्या किमतीत विक्री करतात. फार कमी लोकांचा कांदा कमाल दराने खरेदी केला जातो. त्यामुळे शेतमालाला किती भाव मिळतो हे जाणून घेण्यासाठी किमान व मॉडेल किंमत पाहावी. कांद्याला प्रतिक्विंटल 17-18 रुपये खर्च येतो. कारण डिझेल, खत, मजुरीचा खर्च वाढला आहे. अशा स्थितीत किमान ३२ ते ३५ रुपये किलोचा दर मिळायला हवा. पण तसे न झाल्यास शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट कुठून होणार?



    सर्व नफा दलालांच्या खिशात

    एवढ्या कमी दरातही आपला खर्च निघणार नसल्याचे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. कारण डिझेलच्या दरात प्रचंड वाढ झाली आहे. शेततळे तयार करण्याचा खर्च वाढला आहे. खतांचे भाव गगनाला भिडले आहेत. शेतात काम करणाऱ्यांची मजुरीही वाढली आहे. शेतकऱ्यांच्या कष्टाचा सर्व नफा दलाल आणि किरकोळ विक्रेतेच घेतात, हे वारंवार घडत आलंय.

    Maharashtra Onion prices Slashed By Rs 900 per quintal Big Reason To Worry For Farmers

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!