• Download App
    Maharashtra Lockdown Rules : राज्यात आज रात्री 8 वाजेपासून कडक लॉकडाऊन; काय सुरू, काय बंद... वाचा संपूर्ण नियम! । Maharashtra Lockdown Rules : Strict lockdown in the state from 8 pm tonight; Read the whole Guidelines

    Maharashtra Lockdown Rules : राज्यात आज रात्री ८ वाजेपासून कडक लॉकडाऊन; काय सुरू, काय बंद… वाचा संपूर्ण नियम!

    Maharashtra Lockdown Rules : महाराष्ट्रात देशातील इतर राज्यांच्या तुलनेत कोरोना महामारीचा सर्वाधिक प्रादुर्भाव दिसून आला आहे. दररोज विक्रमी संख्येने रुग्ण आढळून येत आहेत. कोरोना महामारीला आळा घालण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी रात्री 8 वाजेपासून राज्यात कडक लॉकडाऊन लागत असल्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री कार्यालयातर्फे या लॉकडाऊनच्या काळात काय सुरू राहणार व काय बंद राहणार याची सविस्तर नियमावली जाहीर करण्यात आली आहे. लॉकडाऊनचे हे नियम आज रात्री आठ वाजेपासून अमलात येतील. Maharashtra Lockdown Rules : Strict lockdown in the state from 8 pm tonight; Read the whole Guidelines


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : महाराष्ट्रात देशातील इतर राज्यांच्या तुलनेत कोरोना महामारीचा सर्वाधिक प्रादुर्भाव दिसून आला आहे. दररोज विक्रमी संख्येने रुग्ण आढळून येत आहेत. कोरोना महामारीला आळा घालण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी रात्री 8 वाजेपासून राज्यात कडक लॉकडाऊन लागत असल्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री कार्यालयातर्फे या लॉकडाऊनच्या काळात काय सुरू राहणार व काय बंद राहणार याची सविस्तर नियमावली जाहीर करण्यात आली आहे. लॉकडाऊनचे हे नियम आज रात्री आठ वाजेपासून अमलात येतील.

    नव्या नियमानुसार राज्य तसेच केंद्र सरकारची सर्व कार्यालये तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमधील कार्यालये १५ टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुरू राहतील. तथापि, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, अधिकारी पूर्ण क्षमतेने उपस्थित राहतील. मुंबईतील लोकल, मेट्रो यांमधून केवळ शासकीय, वैद्यकीय कर्मचारी, अधिकारी यांनाच प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. सर्वसामान्यांना यामधून प्रवास करता येणार नाही. एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवास करणाऱ्या लोकांना विनापरवाना प्रवास करता येणार नाही, असेही या आदेशात नमूद केले आहे.

    याखेरीज मंत्रालय, MMR रिजनमधील अधिकारी किंवा कर्मचारी 15 टक्क्यांपेक्षा जास्त क्षमतेने बोलवावे लागत असल्यास महाराष्ट्र राज्य आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची परवानगी अनिवार्य करण्यात आली आहे.

    रेल्वे, बसमधून प्रवास करणाऱ्यांच्या हातावर शिक्का, अँटिजनही

    • लोकल, मेट्रो, मोनो यातून प्रवासासाठी आता केवळ शासकीय कर्मचारी, अधिकारी, वैद्यकीय सेवेतील कर्मचारी, डॉक्टर्स, वैद्यकीय उपचार घेण्यासाठी जाणारे रुग्ण, अंध-अपंग आणि त्यांच्यासोबत जाणारी एक व्यक्ती यांना मुभा असेल.
    • अधिकारी, कर्मचारी, डॉक्टर यांना ओळखपत्र पाहूनच रेल्वेचे तिकीट मिळू शकेल.
    • रेल्वे आणि एसटी महामंडळाच्या बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या हातावर क्वारंटाइनचा शिक्का मारला जाईल. याखेरीज त्यांची अँटिजन टेस्टही होणार.
    • पंधरा टक्के कर्मचाऱ्यांचे बंधन
    • केंद्र सरकार, राज्य सरकार, स्थानिक स्वराज्य संस्था, स्थानिक प्राधिकरणे, सहकारी, सरकारी, आणि खासगी बँका, अत्यावश्यक सेवा पुरवणारी कार्यालये, फार्मास्युटिकल कंपन्यांची कार्यालये, रिझर्व बँक ऑफ इंडिया व त्यांच्या संलग्न वित्तीय संस्था, नॉन बँकिंग फायनान्शिअल इन्स्टिट्यूट, लघु कर्ज देणाऱ्या संस्था, वकील अशा सर्व कार्यालयांमध्ये एकूण कर्मचाऱ्यांच्या 15 टक्के किंवा 5 कर्मचारी, यांच्यापैकी जी संख्या जास्त असेल त्या प्रमाणात बोलवण्याचे आदेशात नमूद आहे.

    2 तासांत उरकावे लागेल लग्न

    लग्न दोन तासांच्या वर चालवता येणार नाही. लग्नासाठी आता केवळ २५ लोकांची उपस्थिती ठेवता येईल. एकाच हॉलमध्ये एकाच वेळी लग्न पूर्ण करावे लागेल. वेगवेगळ्या हॉलमध्ये, वेगवेगळ्या वेळी, एकाच लग्नासाठीचे विधी करता येणार नाहीत. असे करताना आढळल्यास 50 हजार रुपयांचा दंड ठोठावला जाईल. शिवाय ज्या हॉल किंवा हॉटेलमध्ये हे लग्न असेल, त्यावर कारवाई करून ते कोविड परिस्थिती संपेपर्यंत बंद ठेवले जाईल.

    अत्यावश्यक सेवा

    हॉस्पिटल, रोग निदान केंद्र, लसीकरण केंद्र, वैद्यकीय विमा कार्यालय, औषधांची दुकाने अशा 29 अत्यावश्यक सेवा 50 टक्के क्षमतेने चालवण्यात याव्यात आणि गरज असेल तर ती क्षमता 100 टक्क्यांपर्यंत वाढवता येईल.

    सर्व प्रवासी वाहतूक 50% क्षमतेने

    बसेस वगळता इतर सर्व प्रवासी वाहतूक चालक वगळता 50 टक्के क्षमतेने चालवता येईल, पण ही वाहतूक एका शहरातून दुसऱ्या शहरात अथवा एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात करता येणार नाही. अशी वाहतूक फक्त अत्यावश्यक सेवा, वैद्यकीय सेवा, अंत्यसंस्कार किंवा कुटुंबातील अतिआजारी व्यक्तींना भेटण्यासाठी होईल, हा नियम तोडणाऱ्यांना 10 हजार रुपये दंड ठोठावला जाईल.

    खासगी प्रवासी बससाठी अटी

    • बससेवा देणाऱ्यांनी एका शहरात फक्त दोन ठिकाणी गाडी थांबा ठेवावा आणि त्याचे वेळापत्रक तसेच थांबा याची माहिती स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला द्यावी. गरज भासल्यास स्थानिक आपत्ती व्यवस्थापन अधिकारी त्यात बदल सुचवू शकतील.
    • सर्व थांब्यांवर उतरणाऱ्या प्रवाशांना 14 दिवस गृहविलगीकरणाचा ठळक शिक्का हातावर मारून घ्यावा लागेल आणि हे शिक्का मारायचे काम बस कंपनीने करायचे आहे.
    • थर्मल स्कॅनरचा उपयोग करण्यात येईल आणि जर कोणत्याही व्यक्तीत लक्षणे आढळून आल्यास त्यांना कोरोना केअर सेंटर (सीसीसी) किंवा रुग्णालयात पाठविण्यात येईल.
    • स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्रशासन (डी एम ए) शहरात आगमनाच्या ठिकाणी रॅपिड एनटीजन टेस्ट (आर ए टी) करण्याचा निर्णय घेतील आणि त्यासाठी मान्यताप्राप्त प्रयोगशाळेला या सेवेची जबाबदारी देतील. सदर चाचणीसाठी लागणारा खर्च, ठरवले असल्यास, प्रवासी किंवा सेवा प्रदाता यांना करावा लागेल.
    • जर एखादा ऑपरेटर सदर मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करताना आढळला तर डी एम ए त्याच्याविरोधात दहा हजार रुपयांचा दंड लावेल आणि असे उल्लंघन वारंवार केले जात असतील तर त्या ऑपरेटरचा परवाना कोविड-१९ परिस्थिती संपेपर्यंत रद्द करण्यात येईल.
    • स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्रशासन काही ठिकाणांहून येणाऱ्या बसेस यांच्यासाठी आवश्यक असणारे स्टॅम्पिंग मध्ये सूट देऊ शकते. हा निर्णय स्थानिक परिस्थितीवर अवलंबून असेल.

    सार्वजनिक प्रवासी वाहतूक

    • फक्त खालील वर्गात मोडणाऱ्या लोकांना लोकल ट्रेन, मेट्रो आणि मोनो रेल सेवांचा वापर करता येईल. (लांब पल्ल्यांच्या रेल्वे गाड्या अपवाद)
    • सर्व शासकीय व्यक्ती/ अधिकारी/ कर्मचारी (राज्य/ केंद्र व स्थानिक) यांना तिकीट /पासेस शासनाद्वारे त्यांना देण्यात आलेल्या ओळखपत्राच्या आधारावर देण्यात येईल.
    • सर्व वैद्यकीय अधिकारी- कर्मचारी (डॉक्टर / पॅरामेडिकल /प्रयोगशाळा तंत्रज्ञ/ रुग्णालय आणि वैद्यकीय चिकित्सालयातील अधिकारी- कर्मचारी इत्यादी) यांना त्यांच्या वैद्यकीय संस्थेने दिलेल्या ओळखपत्राच्या आधारे तिकीट आणि पासेस देण्यात येईल.
    • कोणतीही व्यक्ती की, ज्याला वैद्यकीय उपचाराची गरज आहे, किंवा अपंग व्यक्ती आणि त्यांच्या मदतीला एक अतिरिक्त व्यक्ती.
    • राज्य शासन किंवा स्थानिक प्रशासनाच्या मालकीच्या सार्वजनिक बसेसमध्ये क्षमतेच्या 50 टक्के प्रवासी घेता येईल आणि कोणताही प्रवासी उभा राहून प्रवास करू शकणार नाही.
    • लांब पल्ल्याच्या रेल्वे आणि बसेससाठी
    • स्थानिक रेल्वे अधिकारी /एमएसआरटीसी अधिकारी यांना आपत्ती व्यवस्थापन प्रशासन अर्थात डीएमएला अशा रेल्वे गाड्यांमधून प्रवास करणाऱ्या यात्रेकरूंच्या तसेच त्यांच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या प्रवाशांची माहिती द्यावी लागेल.
    • ज्या ठिकाणी प्रवासी उतरतील, तेथे सर्व प्रवाशांचे स्टॅम्पिंग करून त्यांना 14 दिवसांसाठी क्वारंटाइन केले जाईल. थर्मल स्कॅनरचा उपयोग करण्यात येईल आणि लक्षणे आढळल्यास त्यांना कोरोना केअर सेंटर किंवा रुग्णालयात पाठवले जाईल.
    • स्थानिक डीएमए हे प्रवेश पॉइंटवर अँटिजन टेस्टसंबंधी निर्णय घेतील आणि कोणत्याही मान्यताप्राप्त प्रयोगशाळेला या सेवेसाठी नियुक्त करतील. जर ठरवले असेल तर या चाचणीचा खर्च प्रवाशाला करावा लागेल.
    • काही विशिष्ट ठिकाणाहून येणाऱ्या बसेसच्या प्रवाशांना आवश्यक स्टॅम्पिंगमधून स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्रशासन सूट देऊ शकते. याचा निर्णय हे स्थानिक परिस्थितीवर अवलंबून असेल.

    Maharashtra Lockdown Rules : Strict lockdown in the state from 8 pm tonight; Read the whole Guidelines

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य