विशेष प्रतिनिधी
मुंबई :Maharashtra ZP दिवाळीनंतर लगेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा धुराळा उडण्याची शक्यता आहे. राज्यातील 32 जिल्हा परिषदा व त्या अंतर्गतच्या 336 पंचायत समितींच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता सदस्यपदाचे आरक्षण निश्चित करण्यासाठी 13 ऑक्टोबर 2025 रोजी सोडत काढण्यात येणार असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयोगाने केली आहे.Maharashtra ZP
संबंधित जिल्हाधिकारी 10 ऑक्टोबर 2025 रोजी वृत्तपत्रांत आरक्षण सोडतीसंदर्भातील सूचना प्रसिद्ध करतील. 13 ऑक्टोबर 2025 रोजी सोडत काढल्यानंतर प्रारूप आरक्षणाची अधिसूचना प्रसिद्ध केली जाईल. त्यावर 14 ते 17 ऑक्टोबर 2025 या कालावधीत हरकती व सूचना दाखल करता येतील. प्राप्त हरकती व सूचनांचा विचार करून 3 नोव्हेंबर 2025 रोजी शासन राजपत्रात अंतिम आरक्षण प्रसिद्ध केले जाईल.Maharashtra ZP
असा आहे आरक्षणाचा कार्यक्रम
6 ऑक्टोबर 2025 पर्यंत – अनुसुचित जाती व अनुसुचित जमातीकरिता जागा निश्चित करण्यासाठी विहित नमुन्यातील प्रस्ताव तयार करून विभागीय आयुक्तांकडे सादर करणे.
8 ऑक्टोबर 2025 पर्यंत – अनुसुचित जाती व अनुसुचित जमातीकरिता राखीव जागांच्या प्रस्तावास मान्यता देणे.
10 ऑक्टोबर 2025 – आरक्षण सोडतीची सुचना वृत्तपत्रात प्रसिद्ध करणे. (नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग व महिला, अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गातील व सर्वसाधारण महिलांसहबाबत)
13 ऑक्टोबर 2025 – जिल्हा परिषद गटासाठी व पंचायत समिती गणासाठी आरक्षण सोडत.
14 ऑक्टोबर 2025 – प्रारूप आरक्षणाची अधिसूचना प्रसिध्द करणे.
14 ते 17 ऑक्टोबर 2025 – जिल्हाधिकारी यांच्याकडे जिल्हा परिषद व पंचायत समितीमधील प्रारूप आरक्षणावर हरकती व सुचना सादर करण्याचा कालावधी.
27 ऑक्टोबरपर्यंत प्राप्त प्रारूप आरक्षणावरील हरकती व सुचना आधारे अभिप्रायासह गोषवारा विभागीय आयुक्त यांना सादर करणे.
3 नोव्हेंबर 2025 रोजीपर्यंत प्रारूप आरक्षणावर प्राप्त हरकती व सूचनांचा विचार करून आरक्षण अंतिम करणे.
3 नोव्हेंबर 2025 रोजी अंतिम आरक्षण शासन राजपत्रात प्रसिद्ध करणे.
Maharashtra ZP, Panchayat Samiti Election Buzz: Reservation Draw on October 13, Final List on Nov 3
महत्वाच्या बातम्या
- संघ शताब्दी : पुणे महानगरात शताब्दी वर्षात संघशक्तीचे विराट दर्शन; विजयादशमी निमित्त 77 संचलने, 84 शस्त्र पूजन उत्सव!!
- Mohsin Naqvi : पाकिस्तानात गृहमंत्री नक्वींवर राजीनाम्यासाठी दबाव; आशिया कप पराभवानंतर पीसीबी अध्यक्षांविरुद्ध संतापाची लाट
- पराभूत निजामाने तयार केलेले गॅझेट मराठा आरक्षणासाठी स्वीकारण्याचे कारण काय??; खासदार शाहू महाराजांचा परखड सवाल
- Vijay Kumar Malhotra : भाजप नेते विजय कुमार मल्होत्रा यांचे निधन; दिल्लीचे पहिले भाजप अध्यक्ष, मनमोहन सिंग यांचा केला होता पराभव