• Download App
    Maharashtra राज्यातील कामगार कायद्यांमध्ये सुधारणा करुन महाराष्ट्र

    Maharashtra : राज्यातील कामगार कायद्यांमध्ये सुधारणा करुन महाराष्ट्र कामगार संहिता नियम तयार होणार!

    Maharashtra

    मुख्यमंत्री फडणवीसांच्या अध्यक्षतेखालील कॅबिनेट बैठकीत झाले महत्त्वपूर्ण निर्णय


    विशेष प्रतिनिधी

    Maharashtra  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. मंत्रालयातील मंत्रिमंडळ सभागृहात झालेल्या या मंत्रिमंडळ बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.Maharashtra

    मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय (संक्षिप्त) –

    -मौजे नायगाव ता. खंडाळा जि. सातारा येथे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मारक व महिला प्रशिक्षण केंद्र उभारण्याचा निर्णय. स्मारकासाठी 142.60 कोटी तर महिला प्रशिक्षण केंद्रासाठी 67.17 लाखांच्या तरतूदीस मंजूरी.

    -गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्प, ता. पवनी, जि.भंडारा या प्रकल्पाच्या 25,972 कोटी 69 लाखांच्या तरतूदीस सुधारित प्रशासकीय मान्यता.



     

    – राज्यातील कामगार कायद्यांमध्ये सुधारणा करुन महाराष्ट्र कामगार संहिता नियम तयार करणार

    -विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी कार्यालयात नियुक्त कंत्राटी विधी अधिकारी यांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय, 35,000 ऐवजी 50,000 मानधन मिळणार.

    -14 व्या वित्त आयोगामार्फत राज्यात तात्पुरत्या स्वरुपात स्थापन करण्यात आलेल्या 16 अतिरिक्त न्यायालयांना व 23 जलदगती न्यायालयांना आणखी 2 वर्षे मुदतवाढ देण्यास व त्यासाठी येणाऱ्या खर्चास मान्यता.

    -मत्स्यव्यवसायास चालना देण्यासाठी कृषी क्षेत्रा सारखाच दर्जा देण्याचा निर्णय. मच्छिमारी, मत्स्य व्यावसायसाठी आवश्यक पायाभूत सुविधा, सवलतीचा लाभ होणार.

    -पायाभूत सुविधांच्या अमंलबजावणीत बाधित झोपडपट्टी पुनर्वसनाच्या योजनेतील घरांची निर्मिती व त्यांच्या वितरणासाठीच्या धोरणात सुधारणा

    -पुणे जिल्ह्यातील तळेगाव-चाकण-शिक्रापूर या राष्ट्रीय महामार्गावरील तळेगाव ते चाकण यावर चार पदरी उन्नत मार्ग व जमिनीस समांतर चार पदरी रस्ता तसेच चाकण ते शिक्रापूर यावर जमिनीस समांतर सहा पदरी रस्ता तयार करण्याचा निर्णय.

    Maharashtra Labor Code rules will be prepared by amending the labor laws in the state

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    National School Sports : राष्ट्रीय शालेय क्रीडास्‍पर्धेत महाराष्ट्राला सर्वसाधारण विजेतेपद

    ठाकरे बंधूंच्या ऐक्यावर पवारांच्या पक्षात आनंदाच्या उकळ्या; पण पवारांचा विचार चालू यातून भाजायच्या कशा राजकीय पोळ्या??

    हिंदी सक्तीचा निर्णय घेऊन उद्धव ठाकरे नामानिराळे; अजितदादाही फडणवीस सरकारविरुद्ध फिरले; narrative setting मध्ये भाजपचे नेते उणे पडले!!