विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्र देशाच्या अर्थव्यवस्थेत अव्वल क्रमांकाचे राज्य आहे महाराष्ट्रात इतर कोणत्याही राज्यांपेक्षा मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक येत असते या अर्थाने महाराष्ट्र हे देशाचे ग्रोथ इंजिन आहे या इंजिनाचे ताकद वाढवण्याचा प्रयत्न सरकार करते आहे. यातून महाराष्ट्राबरोबरच देशाच्या प्रगतीलाही मोठा हातभार लागेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.Maharashtra is the growth engine of the entire country; Happy Republic Day from Chief Minister
भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त आज मुंबईतील छत्रपती शिवाजी पार्क येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात राज्यपाल श्री. रमेश बैस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपस्थित राहून ध्वजवंदन केले.
यावेळी बोलताना राज्यपाल रमेश बैस यांनी गेल्या वर्षभरात राज्य सरकारने केलेल्या विविध विकासकामांचा आढावा घेतला. तसेच राज्यातील सर्व स्तरातील नागरिकांना न्याय देण्यासाठी शासनाने घेतलेल्या निर्णयाचे कौतुक केले. अटल सेतू, कोस्टल रोड, धारावी विकास, मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील क्षमतावाढ प्रकल्प, मुंबई-सिंधुदुर्ग ग्रीन फिल्ड हायवे या प्रकल्पांमुळे राज्याचा सर्वांगीण विकासात मोलाची भर पडणार असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.
यावेळी देशाची सुरक्षा सांभाळणारे भारतीय नौदल, गोवा पोलीस, एसआरपीएफ, मुंबई पोलीस दल, दंगल नियंत्रण पथक, महिला पोलिसांचे पथक, सी-60 पोलिसांचे पथक, रेल्वे पोलीस दल अशा विविध संरक्षण दलांनी शानदार संचलन केले. तसेच राज्य शासनाचे नगरविकास, मृद आणि जलसंधारण, उमेद, अल्पसंख्याक विभाग, आदिवासी विकास अशा विविध विभागांचे चित्ररथ देखील या संचलनात सहभागी झाले होते.
यावेळी लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी, पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते.
Maharashtra is the growth engine of the entire country; Happy Republic Day from Chief Minister
महत्वाच्या बातम्या
- मराठा आरक्षणासाठी जरांगे यांचा मोर्चा नवी-मुंबईत धडकला; आझाद मैदानावर उपोषणाची तयारी; पोलिसांनी परवानगी नाकारली
- ज्ञानवापीचा पुरात्त्वीय सर्वेक्षण अहवाल सार्वजनिक, मंदिराचे तब्बल 32 पुरावे, महादेवाची 3 नावे, भंगलेल्या मूर्तीही सापडल्या
- आसाम मध्ये भारत जोडो न्याय यात्रेत राहुल गांधींकडून बॉडी डबलचा वापर??
- राष्ट्रपतींचे अभिभाषण : 75वे वर्ष अनेक अर्थाने ऐतिहासिक, राममंदिर, कर्पूरी ठाकूर यांचा उल्लेख