• Download App
    Maharashtra HSC Exam 2026: 15.32 Lakh Students Registered for Class 12 Boards बारावी परीक्षेसाठी राज्यात 15.32 लाख विद्यार्थी नोंदणी:3,387 केंद्रांवर 10 फेब्रुवारी ते 18 मार्च दरम्यान परीक्षा

    Maharashtra : बारावी परीक्षेसाठी राज्यात 15.32 लाख विद्यार्थी नोंदणी:3,387 केंद्रांवर 10 फेब्रुवारी ते 18 मार्च दरम्यान परीक्षा

    Maharashtra

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : Maharashtra महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या बारावीच्या (उच्च माध्यमिक प्रमाणपत्र) परीक्षेसाठी यंदा १५ लाख ३२ हजार ४७८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. ही परीक्षा १० फेब्रुवारी ते १८ मार्च दरम्यान राज्यातील ३ हजार ३८७ मुख्य केंद्रांवर घेतली जाईल. मंडळाचे प्रभारी अध्यक्ष नंदकुमार बेडसे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.Maharashtra

    नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांमध्ये ८ लाख २० हजार २२९ मुले, ७ लाख १२ हजार २४० मुली आणि १८ तृतीयपंथी विद्यार्थ्यांचा समावेश आहे. एकूण १० हजार ६६४ कनिष्ठ महाविद्यालयांमधून या विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.Maharashtra



    पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. संपूर्ण राज्यात विद्यार्थ्यांसाठी ३ हजार ३८७ मुख्य परीक्षा केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत.

    परीक्षेच्या आयोजनासंदर्भात माहिती देताना बेडसे म्हणाले की, यंदा समुपदेशकांची संख्या वाढवण्यात आली असून ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत. विद्यार्थ्यांनी परीक्षा सुरू होण्यापूर्वी अर्धा तास आधी परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे.

    मंडळाने ‘कॉपीमुक्त अभियान’ राबवले असून, यासाठी विविध बैठका घेण्यात आल्या आहेत. परीक्षा काळात वीजपुरवठा खंडित होऊ नये यासाठी प्रयत्न करण्यात आले आहेत. परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून पारदर्शकता राखण्यात येणार आहे. ज्या १७२ केंद्रांवर सीसीटीव्ही उपलब्ध नाहीत, तेथील कर्मचाऱ्यांमध्ये वेळोवेळी बदल करण्यात येत आहे. परीक्षा काळातील संभाव्य गैर प्रकरणांना आळा बसावा या दृष्टीने मंडळामार्फत संपूर्ण राज्यात 271 भरारी पथके नेमण्यात आली आहे.

    Maharashtra HSC Exam 2026: 15.32 Lakh Students Registered for Class 12 Boards

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Nitesh Rane : महायुतीच्या नावावर कमळ पाडणाऱ्यांना सोडणार नाही; अदृश्य हातांना बाजूला करण्याची वेळ आलीय, नीतेश राणेंचा बंडखोरांना इशारा

    Nitesh Rane : महायुतीच्या नावावर कमळ पाडणाऱ्यांना सोडणार नाही; अदृश्य हातांना बाजूला करण्याची वेळ आलीय, नीतेश राणेंचा बंडखोरांना इशारा

    Sharad Pawar : शरद पवारांची तब्येत बिघडली; पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात उपचार, प्रकृती स्थिर; सततच्या दगदगीमुळे तब्येत खालावल्याची माहिती