विशेष प्रतिनिधी
नाशिक : महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाचा घोळ संपता संपेना अशी स्थिती झाली आहे. आजच्या आरोग्य विभागाच्या परीक्षेत पुन्हा विविध केंद्रावर गोंधळ झाला आहे. पुणे आणि नाशिक येथील केंद्रांवर पेपर पोहाचायलाच उशीर झाला. maharashtra health dept. exam, papers reached late, students agitated
पुण्यात आबेदा इनामदार कॉलेज कॅम्प, येथील परीक्षा केंद्र असलेल्या विद्यार्थांच्या म्हणण्याप्रमाणे सकाळचे 10.02 वाजूनही विद्यार्थ्यांना पेपर मिळालेला नव्हता आणि बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली नव्हती. नाशिकमध्ये नियोजित वेळ झाली तरी पेपर आलेच नसल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली.
यावर आरोग्यमंत्री राजेश टोपे काही तांत्रिक कारणांमुळे पेपर वेळेत विद्यार्थ्यांना मिळाले नसल्याचे मान्य केले. तसेच विद्यार्थ्यांना प्रश्न पत्रिका सोडवायला नियोजित वेळ वाढवून देण्यात आल्याचेही स्पष्ट केले.
सर्व परीक्षा केंद्रावर 10 ची वेळ देण्यात आलेली असताना पुण्यातील आझम कॅम्पसमध्येही तिथे पर्यवेक्षक, परीक्षा केंद्रावर प्रश्नपत्रिका पोहोचल्या नव्हत्या. परीक्षा केंद्रावर पर्यवेक्षकच आले नसल्याने विद्यार्थी संतप्त झाले. गोंधळ झाला. नाशिक जिल्ह्यातील गिरणारे परीक्षा केंद्रावर एकूण विद्यार्थी संख्येच्या कमी प्रमाणात प्रश्नपत्रिका उपलब्ध झाल्याने विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला. प्रश्नपत्रिका घेऊन येणाऱ्यांकडे ओळखपत्र नसल्याचा दावा देखील विद्यार्थ्यांनी केला.
पुण्यातील आझम कॅम्पस परीक्षा केंद्रावर तब्बल दीड तास उशीराने परीक्षा सुरू झाली. परीक्षेत झालेल्या गोंधळामुळे भाजप आक्रमक झाली आहे. भाजपच्या युवा मोर्चाकडून परीक्षा केंद्राबाहेर ठिय्या आंदोलन केले. भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी त्याचे नेतृत्व केले. गृहखात्यात जसा सचिन वाझे होता. तसाच आरोग्य खात्यातही असल्याचा गंभीर आरोप यावेळी भाजपने केला आहे.
आरोग्य विभागाच्या परीक्षेत गोंधळ तांत्रिक अडचणीमुळे झाल्याचा खुलासा राजेश टोपे यांनी केला. या गोंधळामध्ये जेवढा वेळ विलंब झाला तेवढा वेळ विद्यार्थांना वाढवून दिल्याची माहिती राजेश टोपेंनी दिली आहे.
पुण्याच्या केंद्रावर ती पाच ते दहा मिनिट उशिरा प्रश्नपत्रिका मिळण्याचे कारण हे प्रश्नपत्रिकेच्या बॉक्सवरील डिजीटल लॉक वेळेत न उघडल्यामुळे झाल्याचेही स्पष्टीकरण टोपे यांनी दिले.
maharashtra health dept. exam, papers reached late, students agitated
महत्त्वाच्या बातम्या
- Drug Case : एनसीबीचा नवा आरोप, आर्यन आणि त्याच्या मित्रांनी ड्रग्जचे पैसे देण्यासाठी वापरले डार्कनेट
- मन की बात: पंतप्रधान मोदी म्हणाले- लसीकरण मोहीम मोठे यश, देश नव्या उर्जेने पुढे जात आहे
- निजामशाहीची पालखी वाहण्यात मोठा आनंद; गोपीचंद पडळकर यांची संजय राऊतांवर टीका
- औरंगाबाद: हीच ‘शिवशाही’ का? मुख्यमंत्री आले- न्यायालयाचं उद्घाटन केलं-अन्यायावर मात्र मौन!दरोडा-बलात्कार प्रकरणाची साधी दखलही नाही…