• Download App
    ग्रामपंचायत निवडणुकीतील आकडे सांगतात; हिंदुत्ववादी पक्षांचे मजबूतीकरण; काँग्रेस - राष्ट्रवादीचा पाया भुसभुशीत Maharashtra grampanchayat elections; Hindutvawadi parties victory showed its strength, but Congress - NCP losses the rural political ground

    ग्रामपंचायत निवडणुकीतील आकडे सांगतात; हिंदुत्ववादी पक्षांचे मजबूतीकरण; काँग्रेस – राष्ट्रवादीचा पाया भुसभुशीत

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : महाराष्ट्रातल्या ग्रामपंचायत निवडणूक निकालाच्या आकडेवारीचे बारकाईने निरीक्षण आणि विश्लेषण केले, तर महाराष्ट्रातल्या ग्रामीण राजकारणाचा बाज आता पूर्णपणे बदलल्याचे दिसत आहे. पूर्वी ग्रामीण भागात जे काँग्रेस किंवा काँग्रेसचे नाव वापरून राजकारण करत असलेले पक्ष मजबूत होते. त्यांचा पाया आता भुसभुशीत झाला आहे, तर ग्रामीण भागातील मतदारांचा संपूर्ण कल हिंदुत्ववादी पक्षांकडे झुकून काँग्रेसी राजकारणच पूर्णपणे उखडून टाकण्याकडे दिसतो आहे.

    किंबहुना ग्रामीण भागातल्या मतदारांनी ग्रामपंचायत निवडणुकीत दिलेला कौल आणि त्यातली आकडेवारी वर उल्लेख केलेली बाब सिद्ध करते आहे. 7000 हून अधिक ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत 74 % एवढे मोठ्या प्रमाणावर मतदान झाले होते. याचा अर्थ संपूर्णपणे ग्रामीण जनमताचे प्रतिबिंब या मतदानात पडले होते. त्याच्या निकालाची आकडेवारी देखील या मतदानाच्या प्रतिबिंबाचे ठळक प्रतिनिधित्व करते आणि त्यातूनच ग्रामीण राजकारण हे देखील हिंदुत्ववादी पक्षांनी व्यापून टाकल्याचे स्पष्ट होत आहे.

    काँग्रेसी समीकरण पुसले

    महाराष्ट्राचा ग्रामीण भाग म्हणजे काँग्रेस किंवा काँग्रेसनिष्ठ पक्ष हे घट्ट समीकरण आता नुसतेच सैल झाले असे नाही, तर ते पूर्णपणे पुसून गेले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या रूपाने काँग्रेसची थोडी राजकीय धुगधुगी ग्रामीण महाराष्ट्रात शिल्लक उरली आहे, हेच या निवडणुकीच्या निकालाची आकडेवारी सांगते. किंबहुना शिवसेनेतली फूट राष्ट्रवादीच्या पथ्यावर पडली. जर शिवसेनेत फूट पडली नसती तर राष्ट्रवादीला आज जे महाराष्ट्रातल्या आकडेवारीनुसार दुसऱ्या क्रमांकाचे यश मिळाले आहे ते दुसऱ्या क्रमांकाचे यश नसून ते तिसऱ्या क्रमांकाचे ठरले असते, हे आकडेवारीच सिद्ध करते.

    शिवसेनेतली फूट राष्ट्रवादीच्या पथ्यावर

    ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला 1287 जागांवर विजय मिळाला आहे, तर बाळासाहेबांच्या शिवसेनेला 842 आणि ठाकरे गटाला 637 जागांवर विजय मिळाला आहे. याचा अर्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांच्या शिवसेनेने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर ग्रामीण भागात आकडेवारीनुसार मात केली आहे. पण त्याच वेळी एक बाब स्पष्ट होते आहे, ती म्हणजे दोन्ही शिवसेनेचा आकडा एकत्रित केला, तर तो आकडा राष्ट्रवादी काँग्रेस पेक्षा जास्त होतो आहे. बाळासाहेबांच्या शिवसेनेची शिवसेनेला मिळालेल्या 842 जागा आणि ठाकरे गटाला मिळालेल्या 637 जागांची बेरीज केली तर ती 1479 एवढी होते.

    याचा अर्थ महाराष्ट्रातल्या ज्या ग्रामीण भागावर आपली मजबूत पकड असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मराठी माध्यमे करत असतात, त्या ग्रामीण भागावर प्रत्यक्षात आकडेवारीच्या हिशेबात अखंड शिवसेनेने केव्हाच राष्ट्रवादीवर मात केली होती, हे सिद्ध होते. केवळ शिवसेनेतल्या फुटीमुळे राष्ट्रवादीची आकडेवारी शिवसेनेच्या आकडेवारीपेक्षा मोठी दिसते. पण प्रत्यक्षात बाळासाहेब ठाकरे यांच्या करिष्माच्या आधारे ज्या दोन्ही शिवसेना निवडणूक लढवतात, त्या अखंड शिवसेनेची आकडेवारी मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पेक्षा निश्चितच जास्त आहे. हे 2022 च्या डिसेंबर महिन्यातल्या ग्रामपंचायत निवडणुकीनेही सिद्ध केले आहे.

    याचा दुसराही अर्थ असा की काँग्रेस सध्या ग्रामीण भागाच्याही खिसगणतीत उरलेली नाही कारण त्या पक्षाला 809 जागा मिळाल्या आहेत, तर भाजप आणि दोन्ही शिवसेना या हिंदुत्ववादी पक्षांना एकत्रित मिळून 3827 एवढ्या जागा मिळाल्या आहेत. याचा अर्थ महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातला संपूर्ण राजकीय कल निर्विवादपणे हिंदुत्ववादी पक्षांकडे झुकलेला दिसतो आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा ग्रामीण भागातला पाया उखडल्याचे यातून स्पष्ट होत आहे.

    Maharashtra grampanchayat elections; Hindutvawadi parties victory showed its strength, but Congress – NCP losses the rural political ground

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    नवीन प्रणालीद्वारे होणार सार्वजनिक तक्रारींचे निवारण

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल