• Download App
    महाराष्ट्र सरकारचा जमीनाचा रेट १६ कोटीरुपये, ऐवढा रेट असेल तर मी कुठून रस्ते बांधणार, नितीन गडकरी यांचा सवाल|Maharashtra government's land rate is Rs 16 crore, if there is such a rate, where will I build roads, Nitin Gadkari's question

    महाराष्ट्र सरकारचा जमीनाचा रेट १६ कोटीरुपये, ऐवढा रेट असेल तर मी कुठून रस्ते बांधणार, नितीन गडकरी यांचा सवाल

    विशेष प्रतिनिधी

    नाशिक : महाराष्ट्र सरकारचा जमिनीचा रेट मध्यतंरी १६ कोटी रुपये एकर आमच्यासाठी होता. तुमच्या सरकारने नाही अगोदरच्या सरकारने केला होता. तेव्हा माझ्या विभागाने कामच करणेच बंद केलं होतं. आता १६ कोटी रुपये एकर जर रेट दिला तर कुठून मी रस्ते बांधणार? असा सवाल केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केला आहे.Maharashtra government’s land rate is Rs 16 crore, if there is such a rate, where will I build roads, Nitin Gadkari’s question

    नाशिकमध्ये एका कार्यक्रमात बोलताना गडकरी म्हणाले, मी मुख्यमंत्र्यांना विनंती केली आणि त्यांनी आता विचार केला. पुढील आठवड्यात १३ आॅक्टोबर रोजी आमची बैठक आहे. त्यातून ते मार्ग काढणार आहे. कारण, शेवटी मर्यादाअसते. तुम्ही जर १६ कोटी रुपये रेट घेतला तर रस्ते, विमानतळ, रेल्वे मार्ग काहीच होणार नाही.



    गडकरी म्हणाले, आम्ही एक नवीन ग्रीन अलांयनमेंट केली आहे व हा रस्ता देशातील एक प्रमुख रस्ता होणार आहे. हा रस्ता नाशिकवरून जाणार असल्याने, तो आपल्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे. हा सुरत ते चेन्नई हा ग्रीनफील्ड एक्स्प्रेस हायवे जवळपास ५० हजार कोटींचा रस्ता आहे.

    याची रचना निश्चित झालेली आहे आणि याला डीपीआर देखील पूर्ण होत आलेला आहे. एका इकॉनॉमिक कॉरिडॉर सुरत, नाशिक, अहमदनगर, सोलापूर, अक्कलकोट, करमुल आणि पुढे चेन्नईमध्ये जाणार आहे. पुढे कर्नाटक, तेलंगण, आंध्र प्रदेश व तामिळनाडू चारही ठिकाणी या रस्त्याचा उपयोग होणार आहे.

    सध्या सुरत ते चेन्नई हे अंतर १६०० किलोमीटर आहे. हा रस्ता बनल्यानंतर हे अंतर १२७० किलोमीटर म्हणजे ३३० किलोमीटर कमी होणार आहे. हा संपूर्ण ग्रीन अलांयमेंट आहे, सध्या रस्ता अस्तित्वात नाही. यामुळे इंधन बचत होणार आहे, जड वाहनांसाठी प्रवास सुखकारक राहणार आहे. याची अंदाजे किंमत जवळपास ६० हजार कोटी आहे. याचे काम आम्ही लवकरच सुरू करणार आहोत.

    Maharashtra government’s land rate is Rs 16 crore, if there is such a rate, where will I build roads, Nitin Gadkari’s question

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस