विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्र शासनाने 2021 मध्ये राज्याचे इलेक्ट्रीक वाहन धोरण जाहीर केले आहे. या धोरणानुसार दिनांक 1 जानेवारी पासून शासन स्तरावर वाहन खरेदी करताना ते इलेक्ट्रीक वाहन असावे, असे निर्देश देण्यात आले आहेत. याची सुरूवात मकर संक्रांतीच्या दिवशी राजशिष्टाचार विभागाने जीवाश्म इंधनावर चालणाऱ्या वाहनांवरून इलेक्ट्रीक वाहनाकडे संक्रमण करून केली आहे.Maharashtra government will purchase electric vehicles only, Two vehicles of fossil fuel are in retinue
राजशिष्टाचार विभागाअंतर्गत राज्य शासनाच्या अतिथींसाठी एकूण सात वाहने घेण्यात येत असून त्यातील दोन वाहने आज दाखल झाली आहेत. राजशिष्टाचार तसेच पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर (Chief secretary Manisha Mahiskar)यांनी मकर संक्रांतीच्या निमित्ताने जीवाश्म इंधनावरून इलेक्ट्रीक वाहनांकडे संक्रमण करून या वाहनांचे औपचारिक स्वागत केले.
स्वच्छ, हरीत ऊर्जेचा वापर करून इलेक्ट्रीक वाहनांच्या माध्यमातून इलेक्ट्रीक वाहन धोरणाला चालना देण्यासाठी हे संक्रमण दिशादर्शक ठरेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. उर्वरित वाहने 26 जानेवारी रोजी ताफ्यात दाखल होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
पर्यावरण व वातावरणीय बदल, पर्यटन तसेच राजशिष्टाचार विभागाचे मंत्री आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील पर्यावरण विभागाने वातावरणीय बदल रोखण्यासाठी विविध उपाययोजनांची अंमलबजावणी सुरू केली आहे. राज्याचे इलेक्ट्रीक वाहन धोरण हा त्याचाच एक भाग असून याची सुरूवात सार्वजनिक वाहतुकीमध्ये इलेक्ट्रीक वाहनांचा समावेश करून यापूर्वीच करण्यात आली आहे.
आता राज्य शासन आणि त्यांच्या अधिन कार्यालयात 1 जानेवारी पासून खरेदी करण्यात येणारी नवीन वाहने ही इलेक्ट्रीक वाहने असावीत असे निर्देश देण्यात आले आहेत. राजशिष्टाचार विभागाने याची सुरूवात करून पहिले पाऊल टाकले आहे.
Maharashtra government will purchase electric vehicles only, Two vehicles of fossil fuel are in retinue
महत्त्वाच्या बातम्या
- श्रीराम मंदिराचे बांधकाम हजार वर्षे अबाधित राहणार ,फेब्रुवारी पासून मंदिराच्या प्रत्यक्ष उभारणीला सुरुवात
- भाजप नेत्यांचे मौन सुटले : समाजवादीच्या यादीत गुंड माफियांचा भरणा; केशव प्रसाद मौर्य यांचा हल्लाबोल
- चंद्रकांत पाटलांनी उत्तर प्रदेशमधील गळतीकडे लक्ष द्यावे , जयंत पाटलांची टीका
- बिपिन रावत यांच्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत घातपात किंवा तांत्रिक चूक नव्हती; तपासातला प्राथमिक निष्कर्ष