• Download App
    Goseva Commission : महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या स्थापनेनंतर आता प्रत्यक्ष कामकाज सुरू; फडणवीसांचा आणखी एक ड्रीम प्रोजेक्ट पूर्णत्वास! Maharashtra Goseva Commission established and actual functioning started

    Goseva Commission : महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या स्थापनेनंतर आता प्रत्यक्ष कामकाज सुरू; फडणवीसांचा आणखी एक ड्रीम प्रोजेक्ट पूर्णत्वास!

    गोपालक आणि गोरक्षकांच्या पाठीमागे आता महाराष्ट्र गोरक्षक आयोग उभा, आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा यांनी केली कामाला सुरुवात

    विशेष प्रतिनिधी

    सोलापूर : राज्यातील गोवंश पशुधनाचे संरक्षण, जतन करण्यासाठी आणि गोवंश संवर्धनातून खत निर्मिती, वीज निर्मितीसह बायोगॅस निर्मितीसारख्या योजना राबवण्यासाठी  महाराष्ट्र गोसेवा आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे. आता या आयोगाच्या प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवातही झाली आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांचा आणखी एक ड्रीम प्रोजेक्ट  पूर्णत्वास गेल्याचे बोलले जात आहे. Maharashtra Goseva Commission established and actual functioning started

    महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी शेखर मुंदडा यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी अध्यक्षपदाच्या  कामाची सूत्र हाती घेतली असून, पंढरपुरच्या विठुरायाचे दर्शन घेत कामाला सुरुवात केली आहे.  त्यामुळे ज्याला आता गाय नाईलाजाने विकावी लागत असेल त्यांनी आयोगाशी थेट संपर्क साधावा, आयोग ती गाय विकत घेऊन गोशाळेत पाठवेल असे आवाहन गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा यांनी केले आहे. गोपालक आणि गोरक्षकांच्या पाठीमागे आता महाराष्ट्र गोरक्षक आयोग उभा राहिल असेही मुंदडा यांनी सांगितले आहे.  गोवंशाचे महाराष्ट्रात संगोपन, संवर्धन आणि संरक्षण करण्यासाठी गोसेवा आयोगाची स्थापना झाली आहे.

    शेण, गोमूत्र, दूध याला फार मोठी मागणी आहे, याबाबत जनजागृतीचे कामही आयोगाकडून  केले जाणारर आहे. राज्यात सध्या पाच ते सहा लाख गायी असल्याची माहिती असून राज्यातील सर्व गोशाळांची नोंदणी आणि गायीच्या टॅगिंग कामाला देखील सुरुवात होणार आहे. गायींना कत्तलखान्यात जाण्यापासून वाचवणे, गायींच्या स्थानिक प्रजातींची पैदास वाढवणे, वैरणींच्या सुधारीत जातींची लागवड हाती घेणे, बायोगॅस, उर्जा निर्मिती करणे आदी कामे आयोगामार्फत केली जाणार आहेत,  अशी माहिती आयोगाचे अध्यक्ष  मुंदडा यांनी दिली आहे.

    Maharashtra Goseva Commission established and actual functioning started

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    साहेब खडे तो सरकार से बडे; पण सगळी राजकीय स्वप्नं धुळीस मिळे!!

    Gajanan Bhaskar Mehendale : इतिहासाचे एक महत्त्वाचे पान काळाच्या पडद्याआड पालटले ! मान्यवरांच्या उपस्थितीत महिंदळे यांना अंतिम निरोप

    Gopichand Padalkar : वादग्रस्त वक्तव्यांची पडळकरांची मालिका सुरूच !