• Download App
    Maharashtra Economic Survey : महाराष्ट्राच्या आर्थिक विकास दरात 6.8 % वाढ अपेक्षित; विकास दर वाढविण्याचे आव्हान|Maharashtra economic Survey 2022 - 23 greater challenge to meet national growth rate

    Maharashtra Economic Survey : महाराष्ट्राच्या आर्थिक विकास दरात 6.8 % वाढ अपेक्षित; विकास दर वाढविण्याचे आव्हान

    प्रतिनिधी

    मुंबई : महाराष्ट्राचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प उद्या सादर करणार पूर्वी महाराष्ट्र राज्याचा 2022-23 चा आर्थिक पाहणी अहवाल जाहीर केला आहे. सन 2022-23 च्या पुर्वानुमानानुसार राज्याच्या आर्थिक विकासदरात 6.8 % टक्क्यांची वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात आली आहे, तर देशाच्या अर्थव्यवस्थेत 7.0 % वाढ अपेक्षित आहे. म्हणजेच महाराष्ट्राचा विकासाचा दर हा देशाच्या विकास दरापेक्षा कमी आहे. तो वाढविण्याचे शिंदे – फडणवीस सरकार समोर मोठे आव्हान आहे. पण राज्याच्या कृषी आणि संलग्न कार्ये क्षेत्रात 10.2 % वाढीचा अंदाज आहे. त्याचबरोबर उद्योग क्षेत्रात 6.1 % वाढ आणि सेवा क्षेत्रात 6.4 % वाढ अपेक्षित असल्याची माहिती आर्थिक पाहणी अहवालातून समोर आली आहे. Maharashtra economic Survey 2022 – 23 greater challenge to meet national growth rate

    स्थूल राज्य उत्पन्न 35 लाख 27 हजार 84 कोटी अपेक्षित

    2022-23 मध्ये सांकेतिक (चालू किंमतींनुसार) स्थूल राज्य उत्पन्न  35 लाख 27 हजार 84 कोटी अपेक्षित आहे. तर वास्तविक (रिअल) (सन 2011-12 च्या स्थिर किंमतींनुसार) स्थूल राज्य उत्पन्न 21 लाख 65 हजार 558 कोटी अपेक्षित आहे.



    तुटीचे स्थूल उत्पन्नाशी प्रमाण 2.5 %

    राजकोषीय तुटीचे स्थूल राज्य उत्पन्नाशी प्रमाण 2.5 % आहे. राज्यात नोव्हेंबर, 2022 अखेर एकूण 1 हजार 543 शिवभोजन केंद्रे कार्यरत आहेत. या योजनेच्या सुरुवातीपासून नोव्हेंबर, 2022 पर्यंत राज्यातील गरीब आणि गरजू व्यक्तींना एकूण 12.22 कोटी शिवभोजन थाळींचे वितरण करण्यात आले.

     महसुली जमा  2 लाख 51 हजार 924 कोटी

    प्रत्यक्ष महसुली जमा  2 लाख 51 हजार 924 कोटी (अर्थसंकल्पीय अंदाजाच्या 62.4 टक्के) आहे, तर राज्याचा महसुली खर्च हा 4 लाख 27 हजार 780 कोटी अपेक्षित आहे. सन 2022-23 च्या खरीप हंगामामध्ये 157.97 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण करण्यात आल्या आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत तृणधान्ये, तेलबिया, कापूस, ऊस यांच्या उत्पादनात अनुक्रमे 10 टक्के, 19 टक्के, पाच टक्के आणि चार टक्क्यांची वाढ अपेक्षित आहे. तर कडधान्याच्या उत्पादनात 37 टक्के घट अपेक्षित आहे. सन 2022-23 च्या रब्बी हंगामामध्ये 57.74 लाख हेक्टर क्षेत्रांवर पेरणी पूर्ण करण्यात आली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत कडधान्याच्या उत्पादनात 34 % वाढ अपेक्षित असून तृणधान्ये व तेलबियांच्या उत्पादनात प्रत्येकी 13 % घट अपेक्षित आहे.

     सिंचन क्षमता

    मोठ्या, मध्यम आणि लघु पाटबंधारे (राज्य क्षेत्र) प्रकल्पांद्वारे  जून, 2021 अखेर 55.24 लाख हेक्टर सिंचन क्षमता निर्माण करण्यात आली आहे. सन 2021-22 मध्ये प्रत्यक्ष सिंचित क्षेत्र 43.38 लाख हेक्टर (78.5 टक्के) होते. शेतकरी कर्जमुक्ती योजना, 2019 च्या सुरुवातीपासून दिनांक 31 डिसेंबर, 2022 पर्यंत 32.03 लाख लाभार्थी शेतकऱ्यांना 20 हजार 425 कोटी रकमेचा लाभ देण्यात आला आहे.

     कर्जमुक्तीचा शेतकऱ्यांना 2 हजार 982 कोटींचा लाभ 

    पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्यात जुलै 2022 पासून महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ति योजना सुरु करण्यात आली. 2019 अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना राबवण्यात येत आहे. सन 2022-23 मध्ये डिसेंबर अखेर 8.13 लाख लाभार्थी शेतकऱ्यांना 2 हजार 982 कोटी रकमेचा लाभ देण्यात आला. मॅग्नेटिक महाराष्ट्र 2.0 अंतर्गत  जून, 2020 ते डिसेंबर, 2022 या कालावधीमध्ये राज्यात  2.74 लाख कोटी गुंतवणूक झाली आहे. तसेच 4.27 लाख अपेक्षित रोजगार असलेले प्रस्ताव प्राप्त झाले आहेत.

    Maharashtra economic Survey 2022 – 23 greater challenge to meet national growth rate

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी खुशखबर, 14 जानेवारीपूर्वी 3 हजार येणार, मकरसंक्रांती-निवडणूक जुळल्याने विरोधक आक्रमक

    Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस म्हणाले- राज ठाकरे सर्वात मोठ्या पराभवाचे धनी ठरतील; जन्मामुळे मालमत्ता मिळू शकते, वारसा नाही, उद्धव ठाकरेंवरही निशाणा

    Supriya Sule : सुळेंनी केला मोठा खुलासा- शरद पवारांची राष्ट्रवादी एनडीएत जाणार का? रोहित पवार राज्यात, तर सुप्रियाताई केंद्रात मंत्री होणार का?