नांदेड जिल्ह्यातील देगलूर बिलोली (एससी) विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची आज (२ नोव्हेंबर, मंगळवार) मतमोजणी झाली. मतमोजणीच्या एकूण 30 टप्प्यांपैकी 27 टप्प्यांची मतमोजणी झाली आहे. अंतापूरकर यांना आतापर्यंत 1 लाख 773 मते मिळाली आहेत. तर भाजपचे उमेदवार साबणे यांना ६१ हजार ३५४ मते मिळाली आहेत. म्हणजेच काँग्रेसने ही पोटनिवडणूक मोठ्या फरकाने जिंकली आहे. मतमोजणीचे केवळ तीन टप्पे शिल्लक असल्याने अधिकृत घोषणा बाकी आहे.Maharashtra Deglur Biloli Bypoll Election Final Result 2021 Jitesh Antapurkar of Congress defeated Subhash Sabane of BJP
प्रतिनिधी
नांदेड : अवघ्या राज्याचे लक्ष असलेल्या देगलूर पोटनिवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे जितेश अंतापूरकर यांनी भाजपचे सुभाष साबणे यांचा मोठ्या मतांनी पराभव केला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांचा बालेकिल्ला असलेल्या नांदेड जिल्ह्यातील देगलूर बिलोली (एससी) विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची आज (२ नोव्हेंबर, मंगळवार) मतमोजणी झाली.
मतमोजणीच्या एकूण 30 टप्प्यांपैकी 27 टप्प्यांची मतमोजणी झाली आहे. अंतापूरकर यांना आतापर्यंत 1 लाख 773 मते मिळाली आहेत. तर भाजपचे उमेदवार साबणे यांना ६१ हजार ३५४ मते मिळाली आहेत. म्हणजेच काँग्रेसने ही पोटनिवडणूक मोठ्या फरकाने जिंकली आहे. मतमोजणीचे केवळ तीन टप्पे शिल्लक असल्याने अधिकृत घोषणा बाकी आहे.
सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. या मतमोजणीचे 30 टप्पे 14 टेबलवर होते. काँग्रेसचे जितेश रावसाहेब अंतापूरकर हे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सुभाष पिराजीराव साबणे यांच्यावर सातत्याने आघाडीवर होते. शेवटपर्यंत पुढे राहून त्यांनी भाजपच्या उमेदवाराचा मोठ्या फरकाने पराभव करून काँग्रेसला मोठा विजय मिळवून दिला.
काँग्रेस आमदाराच्या निधनामुळे पोटनिवडणूक
काँग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक घ्यावी लागली. या जागेसाठी 30 ऑक्टोबर रोजी 63.9 टक्के मतदान झाले होते. 2019 मध्ये, या जागेवर 60.9% मतदान झाले होते. या जागेवरून भाजपने सुभाष पिराजीराव साबणे यांना उमेदवारी दिली. सुभाष साबणे हे पूर्वी शिवसेनेत होते. एकूण 12 उमेदवार रिंगणात होते. मात्र, खरी लढत तीन उमेदवारांमध्येच रंगली.
काँग्रेस आणि भाजपचा जोरदार प्रचार
या निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपची प्रतिष्ठा पणाला लागली होती. महिनाभर काँग्रेसचे दिग्गज अशोक चव्हाण देगलूर बिलोलीत खुंटीने अडकले होते. भाजपनेही निवडणूक प्रचारात कोणतीही कसर सोडली नाही. देगलूरमध्ये भाजपचे अनेक नेते, आमदार, पदाधिकाऱ्यांनी मनापासून प्रचार केला.
अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या या विधानसभेच्या जागेवर काँग्रेसचे जितेश अंतापूरकर, भाजपचे सुभाष साबणे आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ. उत्तम रामराव इंगोले यांच्यात प्रतिष्ठेची लढत होती.
नवव्या टप्प्यात काँग्रेस उमेदवाराला 33 हजार 68 मते मिळाली, तर भाजप उमेदवाराला 22 हजार 486 मते मिळाली. म्हणजेच काँग्रेस उमेदवार भाजप उमेदवारापेक्षा 10 हजार 582 मतांनी आघाडीवर होता.
Maharashtra Deglur Biloli Bypoll Election Final Result 2021 Jitesh Antapurkar of Congress defeated Subhash Sabane of BJP
महत्त्वाच्या बातम्या
- मुस्लिमां बद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याने भाजप नेत्यावर एफ आर आय दाखल
- DADRA NAGAR HAVELI ELECTION RESULT : शिवसेनेच्या कलाबेन डेलकरांचा विजय ; भाजपचा 47 हजार 447 मतांनी पराभव
- ‘रा. स्व. संघ एक विशाल संघटन समग्र दर्शन’ पुस्तकाची दुसरी आवृत्ती आली
- केएल राहुल न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत टीम इंडियाचे करू शकतो नेतृत्व , वरिष्ठ खेळाडूंना दिली जाईल विश्रांती