• Download App
    Maharashtra Corona Update : रिकव्हरी रेटसोबतच मृत्यूदरही वाढला; २४ तासांमध्ये १९७ जणांचा मृत्यू ; 'डेल्टा प्लस'ची व्हेरियंटची धास्ती। Maharashtra Corona Update Today 197 Deaths ; 9844 New Cases Recorded

    Maharashtra Corona Update : रिकव्हरी रेटसोबतच मृत्यूदरही वाढला; २४ तासांमध्ये १९७ जणांचा मृत्यू ; ‘डेल्टा प्लस’ची व्हेरियंटची धास्ती

    वृत्तसंस्था

    मुंबई : गेल्या महिण्यात राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या कमी झाली असली, तरी ती ९ ते १० हजारांच्या घरात आहे. तर मृत्यूदर देखील २ टक्क्यांवर गेला आहे. Maharashtra Corona Update Today 197 Deaths ; 9844 New Cases Recorded

    महाराष्ट्र सरकारने ५ टप्प्यांमध्ये लॉकडाउनच निर्बंध शिथिल करण्यास सुरू केले आहे. बुधवारी दिवसभरात राज्यात मृतांचा आकडा १६३ होता, तो वाढून गुरुवारी १९७ झाला. या पार्श्वभूमीवर मृतांचा एकूण आकडा १ लाख १९ हजार ८५९ झाला असून मृत्यूदर २ टक्के आहे. गुरुवारच्या या आकडेवारीनुसार मृत्यूदर गेल्या १५ ते २० दिवसांमध्ये १.९५ वरून २ टक्क्यांवर आला आहे.



    कोरोनाच्या नव्या डेल्टा प्लस प्रकारामुळे आरोग्य प्रशासनाची चिंता वाढली आहे. राज्यात शुक्रवारी दिवसभरात ९ हजार ८४४ नव्या बाधितांची नोंद झाली. त्यामुळे रुगणांचा आकडा ६० लाख ७ हजार ४३१ झाला आहे. यामध्ये १ लाख २१ हजार ७६७ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर दुसरीकडे दिवसभरात ९ हजार ३७१ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे कोरोनामुक्त झालेल्यांचा राज्यातला आकडा ५७ लाख ६२ हजार ६६१ झाला आहे. त्यापाठोपाठ राज्याचा रिकव्हरी रेट देखील ९५.९३ टक्के झाला.

    मुंबईत शुक्रवारी दिवसभरात ७८९ नवे बाधित सापडले आहेत. त्यामुळे एकूण आकडा ७ लाख २४ हजार ११३ झाला आहे. मात्र, ५४२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे एकूण रुग्णसंख्येतील डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या ६ लाख ९१ हजार ६७० झाली. दरम्यान, मुंबईत दिवसभरात १० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे रोजच्या मृत्यूंचा आकडा पुन्हा दोनअंकी होऊ लागली आहे. आजपर्यंत मुंबईत १५ हजार ३४८ रुग्णांचा मृत्यू झाला.

    Maharashtra Corona Update Today 197 Deaths ; 9844 New Cases Recorded

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Devendra Fadnavis : जगाला हेवा वाटेल असे ‘ज्ञानपीठ’ आळंदी येथे उभारणार – देवेंद्र फडणवीस

    Tapti Mega Recharge : ताप्ती मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र-मध्यप्रदेशात ऐतिहासिक करार!

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ