• Download App
    CM Fadnavis on Phaltan Doctor Suicide Promises Severe Punishment For Accused Slams Politicization तरुण डॉक्टरची आत्महत्या दु:खद; आरोपींना कठोर शिक्षा होईल,

    CM Fadnavis : तरुण डॉक्टरची आत्महत्या दु:खद; आरोपींना कठोर शिक्षा होईल, कुणालाही सोडणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    CM Fadnavis

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : CM Fadnavis  सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील एका महिला डॉक्टरच्या आत्महत्येमुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. तर विरोधकांकडून सत्ताधारी पक्षावर आरोप केले जात आहेत. या प्रकरणावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली असून, तरूण महिला डॉक्टरचा मृत्यू अत्यंत दुर्दैवी आहे. यामध्ये जे कोणी सहभागी असतील, त्यांना कठोरता कोठोर शिक्षा दिली जाईल, असे ते म्हणाले. याबरोबरच त्यांनी अशा संवेदनशील विषयाचे राजकारण करणे अत्यंत असंवेदनशील असल्याचेही म्हणत विरोधकांवर निशाणा साधला.CM Fadnavis

    फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरने भाऊबीजेच्या दिवशी जीवन संपवले होते. तिच्या तळहातावर सुसाइड नोट आढळून आली. माझ्यावर चार वेळा अत्याचार करण्यात आले. माझा प्रचंड मानसिक छळ झाला. माझ्या मरण्याचे कारण पोलिस उपनिरीक्षक गोपाल बदने असून त्याने माझ्यावर चार वेळा अत्याचार केला. प्रशांत बनकरने मानसिक आणि शारीरिक त्रास दिला, असे त्या सुसाइड नोटमध्ये लिहिले होते. दरम्यान, या प्रकरणातील प्रशांत बनकरला अटक करण्यात आली असून, चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. आता या प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली.CM Fadnavis



    नेमके काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस?

    हे खूपच गंभीर प्रकरण आहे. कारण एक तरूण डॉक्टर स्वत:च्या हातावर आपल्या मनातील वेदना लिहून आत्महत्या करते ही आमच्यासाठी एक दु:खद गोष्ट असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. सरकारने कालच संबंधित पोलिस अधिकाऱ्याला निलंबित केले आहे. अटक करण्याचे कामही सुरू करण्यात आले आहे. कोणालाही सोडले जाणार नाही. जे कोणी सहभागी असतील त्यांना कठोरता कोठोर शिक्षा दिली जाईल, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

    संवेदनशील विषयाचे राजकारण करणे असंवेदनशील

    या आत्महत्या प्रकरणी राज्य सरकारला जाब विचारणाऱ्या आणि आरोपांची सरबत्ती करणाऱ्या विरोधकांवरही देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. मला वाटतं की या प्रकरणात विरोधक जे राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत, तेही खूप चुकीचे असल्याचे ते म्हणाले. इतक्या संवेदनशील प्रकरणात, जेथे एका तरुण डॉक्टरचा मृत्यू झाला आहे, त्यातही राजकीय पोळी भाजण्याचे काम करणे ही असंवेदनशीलता आहे इतकेच मी म्हणेन, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

    CM Fadnavis on Phaltan Doctor Suicide Promises Severe Punishment For Accused Slams Politicization

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Raj Thackeray : मोर्चा असा काढा की गल्ली ते दिल्लीचे लक्ष मुंबईकडे लागेल, राज ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना निर्देश; निवडणूक आयोगाविरोधात एल्गार

    अशोक चव्हाणांच्या जिल्ह्यावर अजितदादांचा डोळा; संपूर्ण नांदेड जिल्हा राष्ट्रवादीमय करण्याचा संकल्प!!

    Dombivli : जमीन नोंदीसाठी महसूल मंत्र्यांच्या सही – शिक्क्याचा गैरवापर, महसूल विभागाच्या विशेष कार्य अधिकाऱ्याचेही बनावट पत्र, गुन्हा दाखल