विशेष प्रतिनिधी
मुंबई : शिंदे- फडणवीस सरकारचा पहिला अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेल्या पहिल्या अर्थसंकल्पात बळीराजासाठी विविध घोषणा केल्या. त्यासाठी केंद्राच्या धर्तीवर राज्य सरकारही १२ हजार कोटी रूपयांचा सन्माननिधी देणार आहे. त्याचबरोबर केवळ एक रूपयात पीकविमा दिला जाणार आहे.Maharashtra Budget : Now, Shinde- Fadanvis government will also give Rs 6000 to farmers every year
वाचा फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी केलेल्या योजना :
- नमो शेतकरी महासन्मान निधी योजना
- प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेत राज्य सरकारची भर
- नमो शेतकरी महासन्मान निधी योजना
- प्रतिशेतकरी, प्रतिवर्ष 6000 रुपये राज्य सरकार देणार
- केंद्राचे 6000 आणि राज्याचे 6000 असे 12,000 रुपये प्रतिवर्ष मिळणार
- 1.15 कोटी शेतकरी कुटुंबांना लाभ
- 6900 कोटी रुपयांचा भार राज्य सरकार उचलणार
आता केवळ 1 रुपयांत पीकविमा
- आधीच्या योजनेत विमाहप्त्याच्या 2 टक्के रक्कम शेतकर्यांकडून
- आता शेतकर्यांवर कोणताच भार नाही. राज्य सरकार भरणार हप्ता
- शेतकर्यांना केवळ 1 रुपयांत पीकविमा
- 3312 कोटी रुपये भार राज्य सरकार उचलणार
कर्जमाफी योजनांचे लाभ
- 2017 च्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतील उर्वरित पात्र शेतकर्यांना योजनेचे लाभ देणार
- महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील लाभ या सरकारने दिले.
- 12.84 लाख पात्र शेतकर्यांच्या खात्यात 4683 कोटी रुपये थेट जमा.
गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा योजना
- गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना यापूर्वी विमा कंपन्यांकडून
- आता गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना
- ही योजना राज्य सरकार राबविणार, त्यामुळे शेतकर्यांचा पूर्ण त्रास वाचणार
- अपघातग्रस्त शेतकर्यांच्या कुटुंबांना पूर्वीच्या 1 लाखाहून आता 2 लाख रुपयांपर्यंत लाभ
महाकृषिविकास अभियान
- राज्यातील शेतकर्यांच्या उत्पन्नवाढीसाठी महाकृषिविकास अभियान राबविणार
- पीक, फळपीक घटकाच्या उत्पादनापासून ते मूल्यवर्धनापर्यंत
- तालुका, जिल्हानिहाय शेतकरी गट, समूहांसाठी योजना
- एकात्मिक पीक आधारित प्रकल्प आराखडा तयार करणार
- 5 वर्षांत 3000 कोटी रुपये उपलब्ध करून देणार
अन्नधान्याऐवजी थेट रोखीने आर्थिक मदत!
- विदर्भ, मराठवाड्यातील 14 आपत्तीग्रस्त जिल्ह्यांना केशरी शिधापत्रिकाधारकांना थेट आर्थिक मदत
- अन्नधान्याऐवजी रोख रक्कम थेट आधार बँक खात्यात
- प्रतिवर्ष, प्रतिशेतकरी 1800 रुपये देणार
‘श्रीअन्न अभियान’
- 200 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद
- सोलापुरात श्री अन्न उत्कृष्टता केंद्र स्थापन करणार
नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन
- नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देणार
- 3 वर्षांत 25 लाख हेक्टर क्षेत्र सेंद्रीय शेतीखाली आणणार
- 1000 जैवनिविष्ठा स्त्रोत केंद्र स्थापन करणार
- डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशनची व्याप्तीवाढ
- 3 वर्षांत 1000 कोटी रुपये निधी
शेतकर्यांना निवारा-भोजन
- कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमाल विक्रीसाठी येणार्या शेतकर्यांना सुविधा
- शेतकर्यांच्या मुक्कामासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन
- जेवणासाठी शिवभोजन थाळीची उपलब्धता
नागपुरात कृषी सविधा केंद्र
- नागपुरात डॉ. पंजाबराव देशमुख कृषी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय कृषी सुविधा केंद्र स्थापन करणार
- अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि प्रसार हा उद्देश
- या केंद्रासाठी 228 कोटी रुपये देणार
- नागपूर जिल्ह्यातील नागपूर, काटोल, कळमेश्वर, अमरावती जिल्ह्यात मोर्शी, बुलढाणा जिल्ह्यात आधुनिक संत्रा प्रक्रिया केंद्र /20 कोटी रुपये तरतूद
गोसेवा, गोसंवर्धन…
- देशी गोवंशाचे संवर्धन, संगोपन, संरक्षणासाठी महाराष्ट्र गोसेवा आयोगाची स्थापना करणार
- आयोगामार्फत गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजना, गोमय मूल्यवर्धन योजना राबविणार
- देशी गोवंशाच्या संवर्धनासाठी भ्रूण बाह्यफलन, प्रत्यारोपण सुविधेत वाढ
- विदर्भ-मराठवाड्यातील 11 जिल्ह्यात दुग्ध विकासाच्या दुसर्या टप्प्यासाठी 160 कोटी रुपये
- अहमदनगर जिल्ह्यात नवीन पशुवैद्यकीय महाविद्यालय
कृषीपंपांना वीजजोडण्या
- वीज ट्रान्सफॉर्मर नसल्याने पाणी असूनही शेतकर्यांची गैरसोय टाळण्यासाठी ट्रान्सफॉर्मर योजना
- मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेत हेक्टरी 75,000 रुपये वार्षिक भाडेपट्टा
- दिवसा वीजपुरवठ्यासाठी 3 वर्षांत 30 टक्के कृषी वीजवाहिन्यांचे सौर उर्जीकरण, 9.50 लाख शेतकर्यांना लाभ
- प्रधानमंत्री कुसुम योजनेतून 1.50 लाख सौर कृषीपंप
- प्रलंबित 86,073 कृषीपंप अर्जदारांना तत्काळ वीजजोडणी
- उपसा जलसिंचन योजनेतील शेतकर्यांना वीजदर सवलतीची मुदत आता मार्च 2024 पर्यंत
Maharashtra Budget : Now, Shinde- Fadanvis government will also give Rs 6000 to farmers every year
महत्वाच्या बातम्या
- शरद हे शादाब असते तर सेक्युलरांनी त्यांना भाजपची बी टीम म्हटले असते का??, नागालँड वरून ओवैसींचा पवारांना टोला
- Eric Garcetti Profile : राष्ट्राध्यक्ष बायडेन यांचे विश्वासू, वादांशी संबंध; आता होणार भारतातील राजदूत, कोण आहेत एरिक गार्सेटी? वाचा सविस्तर
- दिल्लीत मद्य घोटाळ्यात केसीआर यांच्या कन्येला तात्पुरता दिलासा, आमदार कविता यांची आता 11 मार्चला ईडीकडून होणार चौकशी
- नागालँडच्या मुख्यमंत्र्यांना पाठिंबा दिल्याने JDU ने राज्य कार्यकारिणीवर केली ‘ही’ मोठी कारवाई