विशेष प्रतिनिधी
मुंबई : शिंदे – फडणवीस सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिलांसाठी विविध घोषणा करताना काहीही हातचे राखून ठेवले नसल्याचे दिसत आहे. वाचा त्यांनी केलेल्या महत्वाच्या घोषणा…Maharashtra Budget : Everything for Women… 50% concession in ST travel and big hike for ASHA & Anganwadi sisters
- राज्य परिवहन महामंडळाच्या बससेवेत तिकिटदरात महिलांना 50 टक्के सवलत
- चौथे सर्वसमावेशक महिला धोरण जाहीर करणार
- महिला बचत गटांच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यात बांबू क्लस्टर
- कोल्हापूर जिल्ह्यात कोल्हापुरी चप्पल क्लस्टर
- मुंबईत महिला युनिटी मॉलची स्थापना
- महिला सुरक्षा, सुविधाजनक प्रवासासाठी महिला केंद्रीत पर्यटन धोरण
- माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियानात 4 कोटी महिला-मुलींची आरोग्य तपासणी, औषधोपचार
मानधनात भरीव वाढ
- आशा स्वयंसेविकांचे मानधन 3500 वरुन 5000 रुपये
- गटप्रवर्तकांचे मानधन 4700 वरुन 6200 रुपये
- अंगणवाडी सेविकांचे मानधन 8325 वरुन 10,000 रुपये
- मिनी अंगणवाडी सेविकांचे मानधन 5975 वरुन 7200 रुपये
- अंगणवाडी मदतनिसांचे मानधन 4425 वरुन 5500 रुपये
- अंगणवाडी, मिनी अंगणवाडी सेविका, मदतनीसांची 20,000 पदे भरणार
- अंगणवाड्यांमार्फत घरपोच आहार पुरवठ्यासाठी साखळी व्यवस्थापन प्रणाली
नोकरदार महिलांसाठी 50 वसतीगृहे
- शहरी भागात नोकरीसाठी आलेल्या महिलांसाठी केंद्राच्या मदतीने 50 वसतीगृहांची निर्मिती
- अडचणीतील महिलांसाठी, लैंगिक शोषणापासून मुक्त केलेल्या महिलांसाठी, कौटुंबिक समस्याग्रस्त महिलांसाठी स्वाधार आणि उज्वला या दोन योजनांचे
एकत्रिकरण करुन केंद्राच्या मदतीने ‘शक्तीसदन’ ही नवीन योजना
- या योजनेत पीडित महिलांना आश्रय, विधी सेवा, आरोग्यसेवा, समुपदेशन इत्यादी सेवा
- या योजनेत 50 नवीन ‘शक्तीसदन’ निर्माण करणार
Maharashtra Budget : Everything for Women… 50% concession in ST travel and big hike for ASHA & Anganwadi sisters
महत्वाच्या बातम्या
- शरद हे शादाब असते तर सेक्युलरांनी त्यांना भाजपची बी टीम म्हटले असते का??, नागालँड वरून ओवैसींचा पवारांना टोला
- Eric Garcetti Profile : राष्ट्राध्यक्ष बायडेन यांचे विश्वासू, वादांशी संबंध; आता होणार भारतातील राजदूत, कोण आहेत एरिक गार्सेटी? वाचा सविस्तर
- दिल्लीत मद्य घोटाळ्यात केसीआर यांच्या कन्येला तात्पुरता दिलासा, आमदार कविता यांची आता 11 मार्चला ईडीकडून होणार चौकशी
- नागालँडच्या मुख्यमंत्र्यांना पाठिंबा दिल्याने JDU ने राज्य कार्यकारिणीवर केली ‘ही’ मोठी कारवाई