• Download App
    Maharashtra Budget 2026 शेतकऱ्यांपासून लाडक्या बहिणींपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अर्थसंकल्पात दिले काय??, वाचा तपशीलवार!!

    शेतकऱ्यांपासून लाडक्या बहिणींपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अर्थसंकल्पात दिले काय??, वाचा तपशीलवार!!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज 2026-27 वर्षासाठी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. यात मुख्यमंत्र्यांनी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. यात गावं आणि शहरांपासून, ते शेतकरी कष्टकऱ्यांसाठी घोषणांचा पाऊस पडला. त्यांनी लाडक्या बहिणींनाही निराश न करता त्यांच्या योजनेसाठी भरीव तरतूद केली. Maharashtra Budget 202

    देवेंद्र फडणवीस यांनी हया अर्थ संकल्पात काही नवीन योजनाही जाहीर केल्या, तसेच बुलेट ट्रेन प्रकल्प, मेट्रो प्रकल्प, गृहनिर्माण सारख्या अनेक योजना जाहीर केल्या.

    •  कृषी क्षेत्र

    राज्यातील शेतकर्‍यांना कर्जमाफी : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर.

    30 सप्टेंबर 2025 रोजी पीककर्ज थकित असलेल्या पात्र शेतकर्‍यांना 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी, नियमित कर्ज परतफेड करणार्‍या पात्र शेतकर्‍यांना प्रोत्साहन म्हणून 50 हजार रुपये अनुदान

    कर्जमाफी आणि प्रोत्साहनपर लाभ देण्यासोबतच बँकिंग यंत्रणा सक्षम करण्यासाठी, तसेच शेतकर्‍यांना कायमस्वरुपी कर्जमुक्त करण्यासाठी समितीच्या शिफारसींनुसार कार्यवाही करणार

    जून ते ऑक्टोबर 2025 : शेतकर्‍यांना 15,492 कोटी रुपये वितरित

    शेतीमालाला जागतिक बाजारपेठ देण्यासाठी 10 ते 15 पिकांची एकात्मिक मूल्यसाखळी निर्माण करणार

    अ‍ॅग्रीस्टॅक, महावेध, क्रॉपसॅप, महाडीबीटी, को. ऑप स्टॅक इत्यादी डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून एकात्मिक इकोसिस्टीम उभारणार

    शेतीत एआयचा वापर. महाविस्तार एआय, वसुधा व्हॉईस टेलिफोनी, पुश टेलिफोनी, महाराष्ट्र अ‍ॅग्रीकल्चर डेटा एक्सचेंज, एआय सक्षम सँडबॉक्स इत्यादी उपक्रम सुरु

    आता 4 कृषी विद्यापीठे एआय क्षमता आणि कृषी स्टार्टअपला प्रोत्साहन देण्यासाठी आर्टिफिशियल इंटिलिजन्स इनोव्हेशन अँड इन्क्युबेटर सेंटरची स्थापना करणार. उत्पादन खर्चात 25 टक्के घट होऊन उत्पादकता वाढीला चालना

    जानेवारी 2026 पर्यंत 1 कोटी 31 लाख फार्मर्स आयडी तयार. आता त्यात आदिवासी वनपट्टेधारक शेतकरी समाविष्ट करणार

    कृषी समृद्धी योजना : 2026-27 पासून 4 वर्षांत भांडवली गुंतवणूक वाढवणार.

    नवीन प्राकृतिक शेती अभियान: 5 लाख हेक्टर क्षेत्र प्राकृतिक शेतीखाली आणणार

    नवीन मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजक योजना : राज्य आणि जिल्हा योजनांचे एकत्रिकरण करुन पशुधनात स्वयंपूर्णता, रोजगारनिर्मिती. आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्षानिमित्त गो-पालक, कुक्कुटपालक व शेळीपालक यांच्यासाठी विशेष कार्यक्रम

    मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना : प्रतिवर्षी 1240 कोटी रुपये देणार, 20,594 मासेमारांना लाभ मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना सुरुच राहणार, यंदा सुमारे 20,000 कोटींची तरतूद, फेब्रुवारी 2026 पर्यंत 32,756 कोटी रुपये दिले

    मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 : 16 हजार मे.वॅ. ऊर्जाक्षमता स्थापित करण्याचे उद्दिष्ट, यातून 100 टक्के कृषीपंपांना दिवसा वीजपुरवठा, डिसेंबर 2026 पर्यंत 10 हजार मे.वॅ. क्षमता स्थापित होणार, सध्या 3349 मे.वॅ. क्षमता स्थापित

    मागेल त्याला सौर कृषीपंप : आतापर्यंत 6,63,324 सौर कृषीपंप दिले, अंमलबजावणीत महाराष्ट्र नंबर 1

    स्व. गोपीनाथ मुंडे अपघात सानुग्रह अनुदान योजनेत शेतमजुरांचा समावेश

    • सिंचन/पाणी

    2047 ची गरज लक्षात घेता ग्रामीण भागात दरडोई प्रतिदिन 55 लिटर आणि शहरी भागात दरडोई 135 लिटर पाण्याच्या उपलब्धतेचे लक्ष्य.

    जलसंपत्तीची डिजिटल, प्रमाणित आणि ऑनलाईन माहिती प्राप्त करण्यासाठी नाशिक येथे राज्य जल माहिती केंद्र. यासाठी 71.20 कोटी रुपये

    कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील पूर निवारणासाठी जागतिक बँकेच्या मदतीने 2240 कोटींचा प्रकल्प, कृष्णा खोर्‍यातील पुराचे पाणी भिमा खोर्‍यातील पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त भागात वळवणार

    वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्प : 94,968 कोटी

    वैतरणा व उल्हास खोर्‍यातील 54 टीएमसी पाणी गोदावरीत वळवणार, डीपीआर कार्यवाही सुरु

    दमणगंगा-वैतरणा-गोदावरी नदीजोड प्रकल्प : 13,497 कोटी

    नार-पार गिरणा नदीजोड प्रकल्प : 7465 कोटी

    दमणगंगा-एकदरे-गोदावरी नदीजोड प्रकल्प : 2213 कोटी

    बारामती-पुरंदर तालुक्यातील अवर्षणप्रवण क्षेत्राला पिण्याचे पाणी आणि सिंचनासाठी निरा-कर्‍हा नदीजोड प्रकल्प राबवविणार

    2026 मध्ये अल-निनोचा संभाव्य धोका तसेच मान्सूनवर विपरित परिणामाची, दुष्काळाची शक्यता लक्षात घेता पिण्याचे पाणी राखून ठेवणार, जलयुक्त शिवार, जलसंधारण योजना राबवणार. वैरण विकास उपाययोजना राबविणार.

    जागतिक बँकेच्या सहाय्याने राज्यातील शहरांमध्ये 5860 कोटींचा महाराष्ट्र नागरी जलपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन, पुनर्वापर प्रकल्प राबविणार. नागरी सांडपाण्यावर 100 टक्के प्रक्रिया आणि प्रभावी पुनर्वापर करणार

    •  महिला

    मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी भरीव तरतूद

    अंगणवाडी सेविकांना आर्थिक नियोजनाबाबत प्रशिक्षण, योजनेतील लाभार्थ्यांना आर्थिक साक्षर करुन लाभाचे व्यवस्थापन, गुंतवणुकीचे मार्गदर्शन करणार.

    एकल महिला धोरण : सर्व जिल्ह्यात एकल महिलांचे सर्वेक्षण सुरु असून, अहवालाचे विश्लेषण करुन धोरण आणणार.

    लखपती दिदी : राज्यात 27 लाख लखपती दिदी झाल्या, 2026-27 मध्ये आणखी 25 लाख लखपती दिदी करणार.

    महिला बचतगटांच्या वस्तु उत्पादन, विक्रीसाठी 13 जिल्ह्यात उमेद मॉल

    •  युवक – शिक्षण – क्रीडा

    एज्युसिटी : नवी मुंबईत 6 देशांचे विद्यापीठ, सर्व विद्यापीठे याचवर्षी सुरु होणार, याच धर्तीवर 8 ते 10 शैक्षणिक शहरे विकसित करणार

    विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची ओढ निर्माण करण्यासाठी मुख्यमंत्री विज्ञान वारी : इस्त्रो आणि अमेरिकेतील नासा या जगप्रसिद्ध संस्थांना भेट देण्याची संधी मिळणार.

    महाराष्ट्र एजन्सी फॉर होलिस्टिक इंटरनॅशनल मोबिलिटी अँड अ‍ॅडव्हान्समेंट (महिमा) या संस्थेची स्थापना : परदेशी नोकर्‍यांसाठी आवश्यक भाषा, कौशल्य प्रशिक्षण, आर्थिक मार्गदर्शन

    समुपदेशन सेवा विस्तार आणि अधिक संघटित व्यवस्थेसाठी 36 नवदिशा केंद्र स्थापन करणार

    स्टार्टअप, युनिकॉर्नमध्ये महाराष्ट्र नंबर 1, पुढील 5 वर्षांत 1.25 लाख उद्योजक घडवणार, 50 हजार स्टार्टअपला बळ देणार

    मुख्यमंत्री उद्योजकता महाफंडमधून स्टार्टअप्सना थेट आर्थिक मदत, सर्वोत्तम 50 स्टार्टअप्सना नाविन्यपूर्ण प्रकल्प शासनात राबविण्यासाठी 25 लाखांपर्यंतच्या शासकीय कामाचे थेट वर्कऑर्डर्स

    मिशन लक्ष्यवेध : अ‍ॅथलेटिक्स, बॅडमिंटन, बॉक्सिंग, वेटलिफ्टिंग, हॉकी, कुस्ती, आर्चरी, शुटिंग, रोईंग, सेलिंग, लॉनटेनिस, टेबल टेनिस या 12 खेळांचे राज्य स्तरावर 8 हायपरफॉर्मन्स सेंटर्स सुरु, आता आणखी 4 केंद्र सुरु करणार

    विभागीय स्तरावर 25 क्रीडा उत्कृष्टता केंद्र आणि जिल्हा स्तरावर 96 क्रीडा गुणवत्ता विकास केंद्र सुरु करणार, यासाठी निधीची तरतूद

    •  वारसा/संस्कृती

    छत्रपती शिवाजी महाराजांच्या युनेस्को यादीतील 12 किल्ल्यांच्या वारसा जतन करण्यासाठी उपाययोजना

    पुणे जिल्ह्यातील आंबेगाव शिवसृष्टी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ला परिसर विकासासाठी निधी देणार

    छत्रपती शिवाजी महाराजांचे आग्रा येथील स्मारक आणि पानिपत, हरियाणा येथील काला अंब येथील मराठा शौर्य स्मारकासाठी सहाय्य

    सातारा जिल्ह्यातील छत्रपती शिवाजी महाराजांचा वासोटा किल्ला: मुनावळे ते वासोटे किल्ला रोपवे प्रकल्प हाती घेणार

    छत्रपती संभाजी महाराजांच्या मौजे तुळापूर स्मारकाचे काम जून 2026 पर्यंत, मौजे वढू बुद्रूक समाधीस्थळाचे काम जून 2027 पर्यंत पूर्णत्त्वाचे नियोजन, रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर स्मारकाचा नियोजन आराखडा अंतिम टप्प्यात, निधी देणार

    सातारा जिल्ह्यातील अजिंक्यतारा किल्ला आणि संगम माहुली येथील महाराणी ताराबाई आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधीस्थळांचे जतन, संवर्धन, जिर्णोद्धार करणार

    महात्मा ज्योतिबा फुले यांची 200 वी जयंती: 11 एप्रिल 2026 – एक समिती स्थापन करुन विविध सामाजिक उपक्रम राबवणार, त्यासाठी निधी देणार.

    महात्मा फुले यांचे जन्मगाव मौजे कटगुण, जिल्हा सातारा येथे भव्य स्मारक उभारणार

    ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव नायगाव, जिल्हा सातारा येथे स्मारक आणि महिला प्रशिक्षण केंद्र

    भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महाड, चवदार स्थळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षानिमित्त पायाभूत सोयीसुविधांचा विकास आराखडा करणार.

    • संत गाडगेबाबा यांचे 150 वे जयंतीवर्ष

    त्यांचे जन्मस्थळ, कर्मभूमी, अंतिम श्रद्धास्थान यांना एकत्रित करुन संत गाडगेबाबा तीर्थक्षेत्र सर्किट विकसित करणार. राज्यस्तरिय अभियाने एकत्र करुन संत गाडगेबाबा ग्राम समृद्धी अभियान राबविणार. 75 गावांत एआयच्या सहाय्याने नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी पथदर्शी प्रकल्प राबविणार.

    महात्मा फुले, संत गाडगेबाबा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतिंचे विशेष वर्ष म्हणून 2026-27 हे ‘सामाजिक समता आणि समरसता वर्ष’ म्हणून साजरे करणार.

    जगदगुरु तुकाराम महाराजांचे देहू येथील जीर्ण घर आणि जन्मस्थानाच्या जतन, संवर्धनासाठी आराखडा तयार करणार

    नाशिक-त्र्यंबक कुंभमेळ्यासाठी भरीव तरतूद

    नवरगाव, रामटेक येथे राज्यातील तिसरी चित्रनगरी विकसित करणार, महाकवि कालिदास यांचे जीवनचरित्र नव्या पिढ्यांना कळण्यासाठी चित्रपट निर्मिती करणार

    रामटेक विकास आराखडा टप्पा-2 ची कामे करणार

    पंढरपूर मंदिर विकास आराखड्यातील पुढील कामे हाती घेणार

    नाशिक : रामकाल पथ विकासाची कामे सुरु

    5 ज्योर्तिलिंग विकासाची कामे सुरु, महानुभाव पंथीय विविध धार्मिक स्थळांच्या ठिकाणी सुविधांसाठी निधी देणार

    एमटीडीसीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त 50 पर्यटनस्थळी पायाभूत सुविधा निर्मिती

    मराठी भाषेतील साहित्य व ग्रंथ अन्य भाषांमध्ये तसेच अन्य भाषांमधील दर्जेदार साहित्य मराठीत अनुवादित करण्यासाठी ‘यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र अनुवाद अकादमी’ स्थापन करणार

    सामाजिक न्याय व कल्याण

    अनुसूचित जाती घटकासाठी 23,150 कोटी रुपये

    सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे आरक्षण उपवर्गीकरणाच्या शिफारसीनुसार लाभ

    आदिवासी घटकांसाठी 21,723 कोटी रुपये

    ओबीसी, धनगर, गोवारी घटकांसाठी भरीव तरतूद

    सारथी, बार्टी, आर्टी, टीआरटीआय, महाज्योती, वनार्टी, अमृत, मार्टी या संस्थांसाठी भरीव तरतूद

    दिव्यांगांसाठी सर्व सुविधा एका ठिकाणी आणण्यासाठी दिव्यांग सहाय्यक संकेतस्थळ, जिल्हा वार्षिक योजनेत 1 टक्के निधी राखीव

    तृतीयपंथियांच्या विकासासाठी स्वयंरोजगार, व्यवसायासाठी बीजभांडवल देणार

    आकांक्षित जिल्हे आणि तालुके कार्यक्रमाचा विस्तार करणार. गडचिरोली, नंदूरबार, धाराशिव, वाशीम जिल्ह्यांसोबत आता हिंगोली, जालना, पालघर, बीड, धुळे, परभणी या 6 नवीन जिल्ह्यांचा समावेश. या एकूण 10 जिल्ह्यातील 77 तालुके आणि उर्वरित जिल्ह्यातील 100 तालुक्यांचा गतिमान विकास

    चर्मकला डिझाईन व उत्पादन अद्ययावत केंद्र मुंबईतील बांद्य्रात स्थापन करणार

    आदिवासी जमातीतील युवांना नाविन्यतेवर आधारित उद्योजक, उद्योग निर्माते घडविण्यासाठी ‘भारत इनोव्हेशन, रिसर्च, स्टार्टअप्स फॉर आत्मनिर्भरता-बिरसा’ ही योजना

    – आरोग्य सुविधा

    राज्यातील 29 महापालिका, 247 नगरपालिका, 147 नगरपंचायतींमध्ये राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम, आरोग्य विभागाच्या सर्व गुणवत्तापूर्ण सुविधा देण्यासाठी शहरी आरोग्य आयुक्तालयाची स्थापना करणार

    सार्वजनिक आरोग्याच्या सर्वंकष उन्नतीसाठी एम्स, आयआयएमच्या धर्तीवर उच्च गुणवत्तेच्या प्रशिक्षण आणि संशोधनासाठी नागपूर येथे ‘महाराष्ट्र आरोग्य सार्वजनिक संस्था’ स्थापन करणार. भारतीय सार्वजनिक आरोग्य संस्था यासाठी सहकार्य करणार

    कर्करोग, मधुमेह, हृदयविकार यासारख्या आजारांचे निदान करण्यासाठी आशियाई विकास बँकेच्या मदतीतून ग्रामीण भागासाठी 4500 कोटींची प्रगती योजना

    राज्यात डिजिटल सार्वजनिक आरोग्य परिसंस्था निर्माण करण्यासाठी ‘महाराष्ट्र डिजिटल आरोग्य तंत्रज्ञान अभियान’ राबविणार, रिअल-टाईम डॅशबोर्डच्या आधारे प्रभावी निर्णय आणि संनियंत्रण

    राज्यात 35 शासकीय वैद्यकीय महाविद्यालये, 11 महाविद्यालयांची कामे विविध टप्प्यांवर

    महात्मा फुले जनारोग्य योजना : उपचारांची संख्या 1356 वरुन 2399, रुग्णालयांची संख्या 1792 वरुन 4537 तसेच 9 प्रकारच्या अवयव प्रत्यारोपणाच्या उपचारांसाठी 22 लाखांपर्यंतचा खर्च राज्य आरोग्य हमी सोसायटीच्या राखीव निधीतून करण्यास मान्यता

    स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अंबाजोगाई या संस्थेच्या इमारतीच्या एकत्रिकरणासाठी बृहद आराखडा तयार करणार

    बीड जिल्हा रुग्णालयाच्या विस्तारीकरणासाठी 360 खाटांचे रुग्णालय बांधकाम, नर्सिंग कॉलेज, वसतीगृहाचे काम प्रस्तावित

    सातारा जिल्ह्यातील दरे येथे निसर्गोपचार केंद्र, ताणतणाव, जीवनशैलीजन्म आजार, मानसिक आरोग्य तसेच प्रतिबंधात्मक आरोग्यसेवांसाठी

    मुंबई महानगर परिसरात सर्वांगिण आरोग्य आणि वेलनेसचे जागतिक केंद्र

    – 1 trillion अर्थव्यवस्था संकल्प

    1 ट्रिलियन अर्थव्यवस्थेकडे दमदार वाटचाल, 2047 पर्यंत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन डॉलर्सची करणार

    शेतीचा जीडीपी 55 अब्ज डॉलर्सवरुन 500 अब्ज डॉलर्सवर नेणार

    उद्योग क्षेत्राचे स्थूल उत्पन्न 123 अब्ज डॉलर्सवरुन 1500 अब्ज डॉलर्सवर नेणार

    सेवा क्षेत्राचे स्थूल उत्पन्न 312 अब्ज डॉलर्सवरुन 3000 अब्ज डॉलर्सवर नेण्याचे उद्दिष्ट

    सहाव्या राज्य वित्त आयोगाचा अहवाल कृती अहवालासह पुढील अधिवेशनात सादर करणार, प्रशासकीय सुधारणा आणि आर्थिक विकेंद्रीकरण यातून सक्षम स्थानिक स्वराज्य संस्थांची निर्मिती

    2026-27 च्या अर्थसंकल्पात 7,69,467 कोटी रुपयांची तरतूद. महसुली जमा : 6,16,099 कोटी रुपये अंदाजित महसुली खर्च : 6,56,651 कोटी रुपये अंदाजित, 40,552 कोटी रुपये तूट अंदाजित

    राजकोषिय तूट स्थुल उत्पन्नाच्या 3 टक्क्यांपेक्षा कमी ठेवण्यात सरकारला यश. ती नेहमीच 1 टक्क्यांपेक्षा कमी

    क्रेन आधारित वाहने यांच्या वाहन किंमतीवर 7 टक्के प्रमाणे एकरकमी कर होता. परंतू मोठ्या किंमतीची वाहने अन्य राज्यात नोंदणी होत असल्याने कराची कमाल मर्यादा 30 लाख प्रस्तावित

    वाहन वितरकास व्यवसाय प्रमाणपत्र 5 वर्षाचे. मात्र कर 1 वर्षाचा. त्यामुळे त्याच्या दरात सुधारणा प्रस्तावित

    मुद्रांकांवर दस्त निष्पादित केल्यास अपराधसिद्धीनंतर सक्तमजुरी व शास्तीची तरतूद. या शास्तीच्या रकमेत फेररचना करुन 5000 वरुन 1 लाख अशी वाढ. यामुळे कमी मुद्रांकावर दस्त निष्पादन करण्याचे प्रमाण नियंत्रणात येणार.

    • – पायाभूत सुविधा

    शाश्वत शहरी विकासासाठी 10 हून अधिक सक्षम प्रादेशिक विकास प्राधीकरणे, 50 हून अधिक सुनियोजित, बहुपयोगी शहरी समूह विकसित करणार, शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सेवा 100 टक्के डिजिटाईज करणार

    जलवाहतूक : 125 कि.मी.चे जलमार्ग जाळे 340 कि.मी.चे करणार, 21 जलमार्गावरील 20 टर्मिनल्सचे अद्ययावतीकरण, 11 नवीन जलमार्गावर 24 नवीन टर्मिनल्स, यासाठी 6600 कोटी, मुंबईतील रेडिओ क्लब येथील नवीन जेट्टी डिसेंबर 2027 पर्यंत पूर्ण करणार

    वडाळा, मुंबई येथे जागतिक दर्जाचे स्टार्टअप आणि इनोव्हेशन हब

    मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनची ठाणे ते तलासरी मार्गावरील तीन स्थानके फेब्रुवारी 2027 पर्यंत पूर्ण होणार. विरार, बोईसर, ठाणे स्थानकाभोवती विकासाचा बृहद आराखडा तयार करणार

    अटलसेतूला जोडून 200 चौरस कि.मी. क्षेत्रात तिसरी मुंबई घडवणार : कर्नाळा, साई, चिरनेर नवनगर आणि नवी मुंबई विमानतळ अधिसूचित क्षेत्र ही ग्रीनफिल्ड शहरे तयार करणार

    वाढवण बंदर : चौथी मुंबई. लॉजिस्टीक्स आणि वेअर हाऊसिंगसाठी विकास केंद्र निर्माण करणार, वाढवण बंदरामुळे 12 लाखांहून अधिक रोजगार, मासेमारांसाठी सातपाटी येथे अत्याधुनिक मत्स्यबंदर, आसपासच्या 44 गावांत कौशल्य विकासाचे उपक्रम राबविणार

    मरीन शिपयार्ड क्लस्टर विकसित करणार

    मुंबई महानगर प्रदेशात 20 लाख झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास करणार, 10 लाख परवडणारी घरांची निर्मिती करणार, नवीन झोपडपट्टी होणार नाही, यासाठी ‘नो न्यू स्लम फ्रेमवर्क’ प्रणाली

    वडाळा ते गेटवे ऑफ इंडिया मेट्रो 11 : 23,487 कोटींचा संपूर्ण भूमिगत प्रकल्प, याचा पुढे धारावी, वांद्रे स्थानक, वांद्रे टर्मिनस असा विकास

    मुंबई विमानतळ ते नवी मुंबई विमानतळ मेट्रो 8 : 22,862 कोटी

    तळोजा ते खांदेश्वर नवी मुंबई मेट्रो 2 : 5575 कोटी

    मुंबईतील भुयारी मार्ग : ऑरेंज गेट, पूर्व मुक्तमार्ग ते मरीनड्राईव्ह, गोरेगाव-मुलुंड, ठाणे ते बोरीवली, खारघर ते तुर्भे, वांद्रे-वरळी सागरी सेतू ते हायस्पीड रेल्वेस्थानक वांद्रे-कुर्ला संकुल ते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई

    मुंबई महानगरात गायमुख जंक्शन ते फाऊंटेन हॉटेल जंक्शन ते पुढे भाईंदर असा अनुक्रमे 6 आणि 9 कि.मी.चा भुयारी मार्ग

    उन्नत मार्ग : शिवडी-वरळी, ऐरोली-कटाई नका, ठाणे ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, अटलसेतू ते मुंबई-पुणे द्रूतगती महामार्ग, छेडानगर ते आनंदनगर व आनंदनगर ते साकेत, ठाणे

    सागरी सेतू : मुंबई ते वाढवण बंदर जोडण्यासाठी उत्तन ते विरार सागरी सेतू : 58,754 कोटी, स्वातंत्र्यवीर सावरकर वांद्रे-वर्सोवा सागरी सेतू तसेच वर्सोवा-दहीसर-भाईंदर ही कामे वेगाने सुरु

    किनारी मार्ग : बाळकुम ते गायमुख, उलवे किनारी मार्ग

    कल्याण ते लातूर ग्रीनफिल्ड द्रुतगती महामार्ग तयार करणार

    पनवेल-कर्जत उपनगरीय प्रकल्प 3 बी : 14,907 कोटी, यातून बदलापूर-कर्जत, आसनगाव ते कसारा, पनवेल ते वसई, 69 कि.मी.चा नवीन उपनगरीय कॉरिडॉर

    पुणे-लोणावळा तिसरी आणि चौथी रेल्वेमार्गिका, 5100 कोटी, पिंपरी-चिंचवड, आकुर्डी, तळेगावला लाभ

    पुणे मेट्रो टप्पा 2 : खडकवासला-स्वारगेट-हडपसर-खराडीच्या मेट्रोच्या हडपसर ते लोणी काळभोर आणि हडपसर बसडेपो ते सासवड रोड या प्रकल्पांना मंजुरी/रामवाडी ते वाघोली या 11 कि.मी.च्या मेट्रोला मंजुरी/येरवडा ते कात्रज आणि हिंजेवाडी ते सिंहगड रोड या 54 कि.मी.च्या दुहेरी भुयारी मार्गाचा डीपीआर तयार करण्यात येत आहे.

    राज्यातील मेट्रो नेटवर्क 1200 कि.मी.वर नेणार, 6000 कि.मी.पेक्षा अधिकचे द्रुतगती मार्गाचे जाळे तयार करणार

    नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर दुसर्‍या टप्प्याची कामे, पुरंदर विमानतळासाठी एसपीव्ही, गडचिरोली विमानतळासाठी भूसंपादन, लातूर, बारामती, अमरावती, यवतमाळ येथे नाईट लँडिंग, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, कराड, नाशिक, शिर्डी, रत्नागिरी, अकोला, यवतमाळ विमानतळांच्या विस्ताराच्या कामांसाठी निधी

    येरवाडा ते कात्रज भुयारी मार्गाचा डीपीआर

    पुणे ते शिरुर उन्नत मार्ग : 53 किमी. 7514 कोटी रुपये

    तळेगाव-चाकण उन्नतमार्ग : 25 कि.मी. 6499 कोटी रुपये

    चाकण-शिक्रापूर मार्गाचे सहापदरीकरण : 28 कि.मी. 5232 कोटी रुपये

    शिरुर ते छत्रपती संभाजीनगर ग्रीनफिल्ड महामार्गाचे सहापदरीकरण : 192 कि.मी. 14,886 कोटी

    छत्रपती संभाजीनगर विमानतळ ते वाळूज एमआयडीसी उन्नत मार्गाचे काम दोन टप्प्यात करणार

    हडपसर ते यवत सहापदरीकरण : 31.50 कि.मी. 5262 कोटी

    सोलापूर-तुळजापूर-धाराशिव 84 कि.मी.चा रेल्वे मार्ग

    समृद्धी महामार्ग : नागपूर-गोंदिया, भंडारा-गडचिरोली, नागपूर-चंद्रपूर आणि वाढवण बंदराला जोडण्यासाठी तवा-भरवीर मालवाहतूक कॉरिडॉर

    मुंबई महानगराच्या धर्तीवर पुणे, नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर ग्रोथ हब

    • नवीन नागपूर व्यापार व वित्तीय केंद्र

    महाराष्ट्र अमृतकाल रस्ते विकास योजना : 6272 कि.मी. द्रुतगती मार्ग, 14,919 किलोमीटरचे राज्य आणि जिल्हा मार्ग तयार करणार

    1000 पेक्षा अधिक लोकसंख्येच्या गावांना काँक्रिट रस्त्यांनी जोडणार, आशियाई बँकेच्या मदतीने 4500 कोटींचा कार्यक्रम

    मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा-3 : 23 हजार कि.मी.ची कामे करणार (यापूर्वी टप्पा 1 मध्ये 30 हजार कि.मी, टप्पा-2 मध्ये 2450 कि.मी.ची कामे पूर्ण)

    प्रधानमंत्री ग्रामसडक योजना भाग 4 : लोकवस्तीशी न जोडलेल्या वाड्या-वस्त्या बारमाही रस्त्याने जोडणार

    5 पेक्षा अधिक लोकसंख्येच्या सर्व वस्त्या आणि 4247 कि.मी.चे ‘पर्यटन परिरथ’ने जोडणार

    पवनार ते पत्रादेवी शक्तिपीठ महामार्ग

    प्रधानमंत्री आवास योजना : 27.87 लाख घरांना मंजुरी, 3.57 लाख घरे पूर्ण, पीएम-जनमन आवास योजनेत 54,129 घरे

    नवीन मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेला मंजुरी

    खादी ग्रामोद्योग संस्थांना अर्थसहाय्य देणार

    • – उद्योग

    इन्व्हेस्ट महाराष्ट्र या एकसंध डिजिटल व्यासपीठाची निर्मिती करणार

    18 अतिविशाल औद्योगिक केंद्र उभारणार

    प्रत्येक जिल्ह्यात सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग केंद्र स्थापन करणार, यातून 50 लाख रोजगारनिर्मिती होणार

    दोन नवे आयुक्तालय : सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग उपक्रम आयुक्तालय तसेच सेवा आयुक्तालय निर्माण करणार

    रत्ने व आभूषणे धोरणातून 1 लाख कोटींची गुंतवणूक, 5 लाख रोजगारनिर्मिती करणार

    बांबू विकास प्रकल्प : 50,000 कोटींची गुंतवणूक करुन 5 लाख रोजगारनिर्मिती करणार, औष्णिक विद्युत प्रकल्पात 5 ते 7 टक्के बांबू बायोमासच्या वापराचे उद्दिष्ट. जीआयएस, एमआयएस, ब्लॉकचेन, ड्रोन इत्यादीतून बांबू मूल्यसाखळीचा विकास करणार

    गडचिरोली स्टिल हब : 2.61 लाख कोटींची गुंतवणूक, 70,895 रोजगार निर्मिती. जैवविविधता संवर्धनासाठी 5 कोटी वृक्षलागवड

    मुंबई आणि पुण्यात 50 अब्ज डॉलर्सचे मिडिया टेक आणि एव्हीजीसी केंद्र बनविणार, 30 लाखांहून अधिक रोजगार निर्मितीसाठी नवीन 400 जीसीसी (जागतिक क्षमता केंद्र) तसेच नवउपक्रम शहरांची उभारणी करणार

    सिंधुदुर्ग, रत्नागिरी या दोन जिल्ह्यांसाठी सिंधुरत्न समृद्ध योजना आणखी 3 वर्षासाठी राबविणार. कोकण विभागातील साकव बांधणी, दुरुस्तीसाठी विशेष कार्यक्रम

    – हरित महाराष्ट्र

    राज्यात 300 कोटी वृक्ष लागवड मोहीम हाती घेणार

    2029 पर्यंत 50 टक्के आणि 2035 पर्यंत 65 टक्के हरित ऊर्जा प्राप्त करण्याचे उद्दिष्ट, 3 लाख कोटींची गुंतवणूक अपेक्षित

    प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज : महाराष्ट्र देशात दुसरा, 4.57 लाख घरगुती ग्राहकांकडून 1735 मे.वॅ. रुफटॉप सोलार स्थापित, 3200 कोटी रुपये सबसिडी प्राप्त. आता शून्य ते 100 युनिट वीज वापरणार्‍यांसाठी स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासिय रुफटॉप सोलार योजना मंजूर, यात 5 लाख लाभार्थ्यांना 635 कोटींचे अनुदान देणार

    55 उदंचन प्रकल्पांसाठी करार, 78,215 मे.वॅ. वीजनिर्मिती अपेक्षित, 1.28 लाख कोटींची गुंतवणूक. 6 प्रकल्पांचे काम सुरु, यातून 10,300 मे.वॅ. वीजनिर्मिती क्षमता निर्माण

    चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथील सागवान वारशाचे जतन, संशोधन, जनजागृतीसाठी ‘टिंबर म्युझियम व झायलॅरियम’ उभारणार

    जुने वाहन निष्कासित करुन नवीन वाहन खरेदी केल्यास मोटार वाहन करात 15 टक्के सूट

    नवीन वाहने खरेदी करताना बीएस-4 व त्यावरील प्रदूषण मानके असलेल्या वाहनांना मोटर वाहन करात 16 टक्के, बीएस-3 आणि त्याखालील प्रदूषण मानके असलेल्या वाहनांना मोटर वाहन करात 30 टक्के सूट

    बीएस-4 व त्याखालील वायूप्रदूषणाची मानके असलेल्या परिवहनेतर खाजगी संवर्गातील वाहनांमुळे वायु प्रदूषण होत असल्याने अशा वाहनांवर पर्यावरण करामध्ये दुचाकी वाहनावर 2000 रुपयांवरुन 4000 रुपये, हलकी मोटर वाहने 3000 वरुन 6000 रुपये, डिझेल हलकी मोटर वाहनांवर 3500 वरुन 7000 रुपये करवाढ प्रस्तावित

    • – सुशासन / गतिमानता

    पारदर्शक, गतिमान आणि उत्तरदायी सुशासनाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सेवाप्रवेश नियमांचे एकत्रिकरण, प्रमाणीकरण, सुलभीकरण

    महायुती सरकारमध्ये आतापर्यंत 1 लाख 20 हजार पदभरती, आता आणखी 75,000 पदभरती करणार इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान आणि एआय विभाग स्वतंत्रपणे स्थापन करणार. त्याला सहाय्यक म्हणून आयुक्तालय देणार, स्वतंत्र माहिती – तंत्रज्ञान संवर्ग करणार

    शासकीय पातळीवर विविध टप्प्यांवर सुलभता यावी यासाठी आपले सरकार 2.0, मैत्री 2.0, महाडीबीटी 2.0 हे पोर्टल नव्याने विकसित

    नागरिकांच्या मालमत्तांमधील वाद कमी करणे, मालमत्ता हस्तांतरणामधील गैरव्यवहारांना प्रतिबंध करणे आणि मालमत्तांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी महाराष्ट्र भूमी मालकी हक्कधारी अधिनियम आणणार

    जमिनीचे 100 टक्के व्यवहार संगणीकृत करणे, 100 टक्के ई-ऑफिस, कागदविरहित कामकाजाचे नियोजन

    एआय, क्लांटम संगणन, ड्रोन, स्वयंचलित वाहन, डीपटेकसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रात राज्याला जागतिक केंद्र म्हणून विकसित करणार, यासाठी विशेष धोरण आखणार

    सुरक्षित, विश्वासार्ह आणि भविष्यासाठी सज्जतेसाठी राज्याचे सायबर सुरक्षा धोरण तयार करणार

    राज्याच्या सार्वभौम डेटा, अनुप्रयोगांची सुरक्षितता यासाठी नागपूर येथे अत्याधुनिक स्टेट डेटा सेंटर स्थापन करणार

    राज्यात महाराष्ट्र जिओटेक्नॉलॉजी अप्लिकेशन सेंटरची स्थापना करणार

    अमरावती जिल्ह्यातील शिक्षण विभागाची सर्व कार्यालये एकत्रित आणण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख शैक्षणिक संकुलाची उभारणी करणार

    • – सुरक्षा व्यवस्था

    नवीन फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीसाठी तंत्रज्ञानावर आधारित पोलिस व्यवस्था, 100 टक्के डिजिटायझेशन, सक्षम सीसीटीव्ही, सर्व जिल्ह्यांत प्रगत न्यायसहाय्यक केंद्र, आयटीएमएससारख्या तंत्रज्ञानाचा वापर करणार

    बॉडी वॉर्न कॅमेरा : स्मार्ट पोलिसिंग आणि न्यायदानासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, तीन वर्षांत टप्प्याटप्प्याने बॉडी वोर्न कॅमेरे

    राज्य आपत्ती व्यवस्थापन संस्था, मिहान नागपूर येथे, नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तीचे सौम्यीकरण संशोधन, अभ्यासपूर्ण व्यवस्थापनासाठी.

    राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या धर्तीवर राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या 4 नवीन तुकड्या

    Maharashtra Budget 2026 today arthsankalp

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पाळला शब्द; अर्थसंकल्पातून केली शेतकऱ्यांची कर्जमाफी!!

    आठवण अजितदादांची, पण महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पावर छाप देवेंद्र फडणवीसांची!!

    Infra Man देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांसाठी नेमक्या काय घोषणा केल्या??, वाचा सविस्तर!!