• Download App
    devendra fadnavis मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पाळला शब्द; अर्थसंकल्पातून केली शेतकऱ्यांची कर्जमाफी!!

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पाळला शब्द; अर्थसंकल्पातून केली शेतकऱ्यांची कर्जमाफी!!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत महाराष्ट्राचा 2026 – 27 चा अर्थसंकल्प मांडला. देवेंद्र फडणवीस यांची महाराष्ट्र शासन संपूर्ण देशातच काय, पण जगातही Infra Man म्हणून ओळख आहे. ती ओळख जपण्याचे कामच देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प मांडताना केले. त्यांनी महाराष्ट्रातल्या पायाभूत सुविधांसाठी विविध घोषणा केल्या.

    – शेतकऱ्यांची केली कर्जमाफी

    पण त्या पलीकडे जाऊन मुख्यमंत्र्यांनी 2024 च्या विधानसभा निवडणुकीत दिलेल्या शब्द 2026 – 27 च्या अर्थसंकल्पात पाळला. त्यांनी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर केली. दोन लाख रुपयांपर्यंत कर्ज घेतलेल्या सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी या योजनेतून होईल, असे मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्प सादर करताना जाहीर केले. महाराष्ट्रातले जे शेतकरी पात्र असतील त्या सगळ्यांची कर्जमाफी होईल. शिवाय जे शेतकरी कर्ज घेऊन ते नियमित फेडतात त्यांना प्रोत्साहन भत्ता देखील कायम मिळेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले. मुख्यमंत्र्यांनी शेतकरी कर्जमाफी योजनेची घोषणा करताच महायुतीच्या आमदारांनी विधानसभेत मोठा जल्लोष केला.

    देवेंद्र फडणवीस म्हणाले :

    कुठल्याही राज्याच्या, देशाच्या विकासात इन्फ्रास्ट्रक्चरचा रोल महत्वाचा असतो. कारण त्यामुळे जीडीपी, रोजगाराला गती मिळते. मुंबई – पुणे जलदगती रेल्वेसाठी केंद्र सरकारने भरीव तरतूद केली आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानतो. विकसित महाराष्ट्रात आपला वाटा सर्वांत मोठा असेल.

    महाराष्ट्र हे देशाचे आर्थिक इंजिन आहे. विकसित भारत 2047 च्या विकासात आपला मोठा वाटा असेल. 5 ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्था करणं हे आपलं ध्येय आहे. राज्याच्या सर्व अर्थसंकल्पात विकसित महाराष्ट्राचं प्रतिबिंब दिसणार आहे.

    राज्याचे व्हिजन डॉक्युमेंट तयार केले आहे. प्रादेशिक संतुलित विकासासाठी चार प्रमुख स्तंभ ठरवले आहे. चार केंद्रांखाली १६ उपकेंद्र ठरवले आहेत. प्रत्येक अर्थसंकल्पात त्याची छबी दिसेल.

    मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा एक अंतर्गत ३० हजार किलोमीटर पर्यंत कामे झाली आहेत. उर्वरीत कामे मार्च अखेरीपर्यंत होत आहेत.

    आम्ही टप्पा तीन घोषित करत आहोत. २३ हजार किलोमीटर लांबीचे रस्ते आणि पुलांचे कामे करता येणार आहे. चार वर्षांत भांडवली गुंतवणूक वाढवून पायाभूत सुविधा निर्माण केल्या जातील

    मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा ३ अंतर्गत २३ हजार किमी रस्ते व पुलांची कामे हाती घेतली जातील.



    जागतिक उत्पादन केंद्र

    १२३ अब्ज डॉलरवरून १५०० अब्ज डॉलर्स पर्यंत वाढविण्याचे उद्देश आहे. महाराष्ट्र हे जागतिक उत्पादन केंद्र बनविण्याचे उद्देश आहे.

    इन्व्हेस्ट इन महाराष्ट्र व्यासपीठ

    इन्व्हेस्ट महाराष्ट्र हा व्यासपीठ तयार करत आहोत. ५० लाख प्रत्यक्ष रोजगार निर्माण होईल. सेवा क्षेत्रासाठी आयुक्तालय करण्याची घोषणा करत आहे.

    राज्याचे नवीन गुंतवणूक व औद्योगिक सेवा धोरण जाहीर केलं आहे. इन्व्हेस्ट महाराष्ट्र हा एकसंघ डिजीटल प्लॅटफॉर्म तयार केला जात आहे. या धोरणातून ५० लाख रोजगार निर्माण होणार आहे. तसेच यासाठी आयुक्तालय स्थापन करण्याची घोषणा करण्यात येत आहे.

    महाराष्ट्रातील पुणे हे जीसीसी साठी सर्वात पसंतीचे शहर ठरत आहे. 4 लाख उच्च कुशल रोजगार निर्मितीचे लक्ष आहे.

    निवडक 50 पर्यटन स्थळी पायाभूत सुविधा तयार करण्यात येणार आहे. वासोटा किल्ला हा महाराजांच्या शौर्य आणि रणनीतीचे प्रतिक आहे. मुनावळे ते वासोटा किल्ला रोपवे सुरू करणार.

    राज्यातील तिसरी चित्रनगरी नवरगा तालुका रामटेक येथे विकसित करण्यात येणार आहे. नवीन पिढीला महाकवी कालिदासांचा जीवनपट कळावा म्हणून चित्रपटासाठी अर्थसहाय्य देण्यात येईल.

    वाढवण जवळ चौथी मुंबई विकसित करणार

    बुलेट ट्रेनच्या तीन स्थानकांची कामे 2027 पर्यंत पूर्ण करणार. मुंबई दुबई सिंगारपूरमध्ये पर्यटन गुंतवणूक करणार. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गातील काम २०२७पर्यंत पाच स्थानकांचे काम पूर्ण होईल.

    तिसऱ्या मुंबईत रायगड पेण व नवी मुंबई विमानतळ ही ग्रीन फिल्ड म्हणून विकसित करणार.

    चौथी मुंबई वाढवण येथे होईल.एमएमआरमध्ये 10 लाख नवी घरे उभारणार. नवी अनधिकृत बांधकामे होणार नाहीत, याचा रोडमॅप तयार होणार.

    राज्यात 1 हजार 200 किमीचे मेट्रो मार्ग व 6 हजार किमीचे द्रुतगती मार्ग विकसित केले जातील. 2019 पर्यंत 165 किमी मार्गाचे मेट्रो मार्गिका तयार केल्या जातील.

    Maharashtra Budget 2026 today announcements devendra fadnavis speech

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    शेतकऱ्यांपासून लाडक्या बहिणींपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अर्थसंकल्पात दिले काय??, वाचा तपशीलवार!!

    आठवण अजितदादांची, पण महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पावर छाप देवेंद्र फडणवीसांची!!

    Infra Man देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांसाठी नेमक्या काय घोषणा केल्या??, वाचा सविस्तर!!