‘’देशाचा अपमान सहन करणार नाही, ओबीसी समाजाची माफी मागितलीच पाहिजे.’’, अशी मागणी अशल्याचे आशिष शेलारांनी सांगितले आहे.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्र भाजपाच्यावतीने उद्या राहुल गांधींच्याविरोधात राज्यभर आक्रमक आंदोलन केलं जाणार आहे. भाजपा नेते आशिष शेलार यांनी आज पत्रकारपरिषदेत याबाबत सविस्तर माहिती दिली. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी कालच ही घोषणा केली होती. Maharashtra BJP is aggressive against Rahul Gandhi statewide agitation tomorrow
आशिष शेलार म्हणाले, ‘’परदेशात भारताची बदनामी केल्याबद्दल तसेच ओबीसी समाजातील आडनावाच्या बदनामीचा प्रयत्न केल्याबद्दल राहुल गांधींविरोधात २५ मार्च रोजी महाराष्ट्रभरात आक्रमक आंदोलन करण्याचे आम्ही ठरवले आहे. राहुल गांधींनी ओबीसी समाजाची माफी मागावी, अशी आमची मागणी आहे.’’
‘’भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी कालच घोषित केलं आहे की, उद्या महराष्ट्रभर आम्ही राहुल गांधींच्याविरोधात आक्रमक आंदोलन करणार आहोत. एकतर त्यांनी परदेशात जाऊन भारतीय व्यवस्था, भारतीय लोकशाही व्यवस्था, संसदीय प्रणाली, निवडणूक प्रक्रिया या सगळ्यावर टिप्प्णीच केली नाही तर त्यांची बदनामी केली. रोष व्यक्त केला आहे, विपर्यास केला आहे, खोटं बोलले आहेत.’ आपल्या देशाची बदनामी परदेशात जाऊन करणं, भाजपाला कदापि मान्य नाही. त्यांनी माफी मागितली पाहिजे, राहुल गांधींनी माफी मागितली पाहिजे म्हणून हे आंदोलन आहे.’’
‘’ या गांधी परिवाराचा अहंकार जणूकाही आभाळालाच पोहचला आहे. ते एका विशष्ट परिवाराचे आहेत म्हटल्यावर दुसऱ्या सगळ्या अर्णवांच्या परिवारांवर टिप्पणी करण्याचं जणूकाही त्यांना परवानाच मिळाला आहे. आमच्या ओबीसी समाजाची बदनामी करण्याचा प्रयत्न जो राहुल गांधींनी केला आहे. तो आम्हाला मान्य नाही, आक्रमक आंदोलन त्यासाठी सुद्धा आहे आणि ओबीसी समाजाची त्यांनी माफी मागितली पाहिजे.’’
Maharashtra BJP is aggressive against Rahul Gandhi statewide agitation tomorrow
महत्वाच्या बातम्या
- पंतप्रधान मोदी ‘वन वर्ल्ड टीबी समिट’ला संबोधित करणार; वाराणसीला देणार १ हजार ७८० कोटींची भेट
- ‘’आमची कधी बंद दाराआड बैठक झाली तर…’’ फडणवीसांच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंचं विधान!
- उद्धव ठाकरे म्हणतात मी राज ठाकरेंचं कालचं भाषण ऐकलंच नाही, कारण…
- माहीम, सांगली कुपवाड, मुंब्रा पाठोपाठ नाशिक मध्येही बेकायदा दर्गे, मशिदींविरुद्ध एल्गार; नवशा गणपती शेजारील दर्गा टार्गेटवर!!