• Download App
    महाराष्ट्र भाजप : लोकसभेच्या सगळ्या ४८ जागांसाठी १८ महिन्यांचे मिशन; विनोद तावडेही बैठकीला हजर!!|Maharashtra BJP: 18 month mission for all 48 Lok Sabha seats; Vinod Tawde also attended the meeting !!

    महाराष्ट्र भाजप : लोकसभेच्या सगळ्या ४८ जागांसाठी १८ महिन्यांचे मिशन; विनोद तावडेही बैठकीला हजर!!

    प्रतिनिधी

    मुंबई : राज्यसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीवर विशेषतः शिवसेनेवर मात केल्यानंतर आत्मविश्वास वाढलेला भाजपने विधानपरिषद निवडणुकीवर कॉन्सन्ट्रेशन केलेच आहेत पण त्याचबरोबर 48 जागांसाठी अठरा महिन्यांचे लोकसभा निवडणुकीचे प्लॅनिंगही सुरू केले आहे. त्यासाठी झालेल्या विशेष बैठकीत भाजपचे हरियाणा प्रदेशाचे प्रभारी आणि माजी शिक्षण मंत्री विनोद तावडे हे उपस्थित होते.Maharashtra BJP: 18 month mission for all 48 Lok Sabha seats; Vinod Tawde also attended the meeting !!

    लोकसभा निवडणुकीसाठी भाजप आतापासून तयारी करू लागली आहे. यासाठी भाजपने लोकसभा निवडणुकीला १८ महिने उरले असतानाच आतापासून तयारीला सुरुवात केली आहे. महाराष्ट्रातील लोकसभेच्या ४८ जागांसाठी हे मिशन आहे. याकरता भाजपने सर्व जागांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी समित्या स्थापन केल्या आहेत, अशी माहिती विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दिली.



    सर्व लोकसभा मतदारसंघात दौरे

    यासंबंधी भाजपची एक महत्वाची बैठक पार झाली. या बैठकीला भाजपचे केंद्रीय नेते विनोद तावडे हेही उपस्थित होते. लोकसभेच्या सर्व जागांवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी ज्या समित्या स्थापन केल्या आहेत. त्यांचे समन्वय आमदार चंद्रशेखर बावनकुळे करणार आहेत. या मतदार संघात नेते दौरे करतील, त्यांचे नियोजन करण्यात आले आहे. २०१९ च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर २०१७ सालीही असेच मिशन हाती घेतले होते, तसेच मिशन यावेळी हाती घेण्यात आले आहे. केवळ निवडणुकीत नाही तर इतरही वेळेत आम्ही काम करतो, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

    १६ जागांवर लक्ष केंद्रीत करणार 

    मागील निवडणुकीत आम्ही ज्या जागा जिंकलो त्यावर आम्ही लक्ष केंद्रित करणार आहोतच, याशिवाय इतर १६ जागा आणि विशेष म्हणजे त्यातील ९ मतदारसंघातही विशेष लक्ष ठेवणार आहोत. या निवडणुकीत ४८ मतदार संघ जिंकू असा आमचा दावा नाही, पण आम्ही त्यावर काम करणार आहोत, असेही फडणवीस म्हणाले. काँग्रेसचे आंदोलन चुकीचे आहे, राहुल गांधी यांची चौकशी दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सुरु आहे. नॅशनल हेराल्ड व्यवहारात भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाले आहे. सगळी संपत्ती गांधी परिवाराकडे गेली आहे, अशी फडणवीस म्हणाले.

    Maharashtra BJP: 18 month mission for all 48 Lok Sabha seats; Vinod Tawde also attended the meeting !!

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस