वृत्तसंस्था
मुंबई : राज्यात कोरोनाचा अक्षरशः महाविस्फोट झाला असून रविवारी तब्बल ५७,०७४ नव्या रुग्णांची नोंद झाली. गेल्या वर्षभरातील एका दिवसातील ही सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. रविवारी दिवसभरात कोरोनामुळे २२२ जणांचा मृत्यू झाला. Maharashtra becomes hot spot
कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात अधिकाधिक चाचण्यांवर भर दिला जात आहे. त्यामुळे दररोजची रुग्णसंख्या नवा उच्चांक ठरत आहे.
निदान झालेल्या एकूण रुग्णांपैकी ८० टक्क्यांहून अधिक रुग्ण हे लक्षणविरहित असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे लक्षण नसल्याने अनेक जण चाचण्या करत नसल्याने संसर्ग वेगाने पसरत आहे.
ही परिस्थिती लक्षात घेता कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर देण्यासह ठिकठिकाणी शिबिरे घेत कोरोना चाचण्या केल्या जात आहेत. दरम्यान, दिवसभरात राज्यात २७,५०८ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून आतापर्यंत २५,२२,८२३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८३.८ टक्क्यांवर गेले आहे. सध्या राज्यात ४,३०,५०३ ॲक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहे.