• Download App
    रेमडेसिव्हिरच्या जप्त केलेल्या 5000 कुप्या वापरण्यासाठी महाराष्ट्राला कोर्टाच्या परवानगीची प्रतीक्षा । Maharashtra awaits court permission to use confiscated 5000 Vials of Remdesivir Injection

    रेमडेसिव्हिरच्या जप्त केलेल्या ५००० कुप्या वापरण्यासाठी महाराष्ट्राला कोर्टाच्या परवानगीची प्रतीक्षा

    Remdesivir Injection : कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या रेमडेसिव्हिर इंजेक्शनच्या पुरवठ्याबाबत राज्य सरकारचा केंद्राशी वाद सुरू आहे. तर राज्याच्या संस्थांनी जप्त केलेल्या औषधाच्या 5,000 हजार कुप्या कोर्टाच्या परवानगीअभावी वापरात येत नाहीयेत. मार्च आणि एप्रिलमध्ये महाराष्ट्राच्या विविध भागात छापे टाकताना अन्न व औषध प्रशासन (एफडीए) आणि पोलीस विभागाने या कुप्या ताब्यात घेतल्या असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. Maharashtra awaits court permission to use confiscated 5000 Vials of Remdesivir Injection


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या रेमडेसिव्हिर इंजेक्शनच्या पुरवठ्याबाबत राज्य सरकारचा केंद्राशी वाद सुरू आहे. तर राज्याच्या संस्थांनी जप्त केलेल्या औषधाच्या 5,000 हजार कुप्या कोर्टाच्या परवानगीअभावी वापरात येत नाहीयेत. मार्च आणि एप्रिलमध्ये महाराष्ट्राच्या विविध भागात छापे टाकताना अन्न व औषध प्रशासन (एफडीए) आणि पोलीस विभागाने या कुप्या ताब्यात घेतल्या असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.

    एफडीएच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, छापेमारीच्या वेळी रेमडेसिव्हिरच्या 5 हजार कुप्या ताब्यात घेण्यात आल्या. परंतु आम्ही त्या वापरासाठी देऊ शकत नाही कारण केवळ न्यायालय याची परवानगी देऊ शकते.” ते म्हणाले, “जप्तीनंतर आम्हाला पुरावे गोळा करावे लागतात, आरोप निश्चित करावे लागतात आणि जप्त केलेला मुद्देमाल कोर्टापुढे सादर करावा लागतो. खटला जिंकण्यासाठी राज्याचा युक्तिवाद मजबूत असावा लागतो. केवळ तेव्हाच या कुप्या कोविड रुग्णांसाठी वापरल्या जाऊ शकतात.”

    यासंदर्भात विचारले असता एका आरोग्य अधिकाऱ्याने सांगितले की, संसर्गाच्या विशिष्ट कालावधीत रेमडेसिव्हिरचा वापर करावा लागतो. आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, देशाच्या इतर भागातही कोरोना विषाणूचे प्रमाण वाढत असल्याने केंद्र राज्याचा कोटा वाढवण्याची शक्यता नाही. तथापि, नुकत्याच केंद्राने जाहीर केलेल्या वाटपानुसार 21 एप्रिल ते 30 एप्रिल या दहा दिवसांकरिता एकूण 16 लाख इंजेक्शनपैकी महाराष्ट्राच्या वाट्याला 4 लाख 35 हजार इंजेक्शन आल्याचे स्पष्ट झाले आहे.

    Maharashtra awaits court permission to use confiscated 5000 Vials of Remdesivir Injection

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य