• Download App
    व्हीपच्या लढाईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचा ठाकरे गटाचा आदेश मानण्यास नकार!! Maharashtra assembly speaker Election : Eknath shinde refused to obey Thackeray group's whip

    विधानसभा अध्यक्ष निवडणूक : व्हीपच्या लढाईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचा ठाकरे गटाचा आदेश मानण्यास नकार!!

    प्रतिनिधी

    मुंबई : महाराष्ट्रात शिंदे – फडणवीस सरकारच्या विश्वासदर्शक ठरावा आधी विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी रविवारी निवडणूक होणार आहे. त्यासाठी शिवसेनेने राजन साळवी, तर भाजपने राहुल नार्वेकर यांना उमेदवारी दिली आहे, तर राजन साळवी यांना अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी शिवसेनेने व्हीप जारी केला आहे. शिंदे गटालाही तो व्हीप लागू होत असल्याचा दावा शिवसेनेने केला आहे. पण शिवसेनेचा हा दावा आता स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फेटाळून लावला आहे. Maharashtra assembly speaker Election : Eknath shinde refused to obey Thackeray group’s whip

    आम्हाला व्हीप लागू नाही

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व बंडखोर आमदार हे गोव्यातून मुंबईकडे येण्यासाठी रवाना झाले आहेत. त्यावेळी गोवा विमानतळावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. आमच्याकडे दोन तृतीयांश आमदारांचे संख्याबळ आहे. त्यामुळे आम्हाला शिवसेना पक्ष प्रतोद सुनील प्रभू यांनी काढलेला व्हीप लागू होत नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.



    शिवसेनेकडून व्हीप जारी

    विधानसभा अध्यक्ष पदासाठी शिवसेनेने कोकणातील राजापूर मतदारसंघाचे आमदार राजन साळवी यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे राजन साळवी आणि राहुल नार्वेकर यांच्यात रविवारी अध्यक्षपदासाठी चुरस रंगणार आहे. त्यामुळे आपले उमेदवार राजन साळवी यांना मतदान करण्यासाठी शिवसेनेने व्हीप जारी करण्यात आला आहे. शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी तसे आदेश दिले आहेत.

    अपात्र व्हायचं नसेल तर…

    शिंदे गटातील आमदारांनाही हा व्हिप लागू होत असल्याचे राजन साळवी यांनी म्हटले आहे. बंडखोर आमदारांना जर आमदार म्हणून अपात्र व्हायचं नसेल तर त्यांना मतदान हे मलाच करावं लागेल, असे शिवसेनेचे अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठीचे उमेदवार राजन साळवी यांनी सांगितले.

    परंतु आता दस्तूर खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच शिवसेनेचा वीप एकनाथ शिंदे गटाला लागू होणार नसल्याचे जाहीर केल्यामुळे ही लढाई आता कायदेशीर पातळीवर पोहोचणार आहे. उद्या विधानसभेत नेमके काय होते? एकनाथ शिंदे यांचा गट अध्यक्षपदाच्या निवडणुकीत कोणाला मतदान करतो? त्याचबरोबर त्यांचे मतदान वैध धरले जाईल की अवैध हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्याचबरोबर मूळात एकनाथ शिंदे गट हा विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मतदान करेल ही आयत्या वेळेला तटस्थ राहून भाजप आणि अपक्षांच्या मदतीने राहुल नार्वेकर यांना निवडून आणेल आणि नंतर आपल्या सरकारच्या शक्तिपरीक्षेला सामोरा जाईल हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे.

    Maharashtra assembly speaker Election : Eknath shinde refused to obey Thackeray group’s whip

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!