विशेष प्रतिनिधी
मुंबई : कुणाल कामराच्या हातात लाल संविधान; ठाण्याच्या रिक्षावाल्यावर टीका करताना पप्पूचा “सन्मान”!!, असला प्रकार झाल्याने कुणाल कामराची कॉमेडी एका झटक्यात खाली आली. कुणालने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उठावावर विडंबन काव्य म्हटले. त्यानंतर एकनाथ शिंदे यांचे शिवसैनिक संतापले आणि त्यांनी त्याच्या कार्यक्रम स्थळाची तोडफोड केली. शिवसैनिकांनी कोणाला कामाला विरुद्ध पोलीस ठाण्यांमध्ये तक्रारी दाखल केल्या. ही शिवसैनिकांच्या संतप्त राजकीय प्रवृत्तीला साजेशी वर्तणूक घडली. Maha CM Fadnavis backs Eknath Shinde over Kunal Kamra row
पण त्यापलीकडे जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुणाल कामराच्या “पप्पूगिरी”वर कठोर प्रहार केला. त्यांनी विधिमंडळ परिसरात कुणाल कामराला ठोकून काढले. कुणाल कामराला स्टँड अप कॉमेडी व्यंगात्मक टीका करायचा अधिकार आहे. पण म्हणून दुसऱ्याच्या अधिकाऱ्यांवर अतिक्रमण करून त्यांना अपमानित करण्याचा त्याला संविधानाने अधिकार दिलेला नाही. त्याने माफी मागितली पाहिजे आणि त्याच्यावर कायदेशीर कारवाई होईल, अशी स्पष्ट ग्वाही फडणवीस यांनी दिली.
पण त्यापलीकडे जाऊन कुणाला कामराची “पप्पूगिरी” दिसली. कारण त्याने स्टॅन्ड अप कॉमेडी करताना सगळ्यात शेवटी लाल संविधान हातात दाखवून आपण संविधानानुसार इथे काहीही बोलू शकतो. आपल्या विरुद्ध काही कारवाई होऊ शकत नाही, असे म्हटले होते. त्या पाठोपाठ त्याने आज तेच लाल संविधान हातात धरून फोटो ट्विट केला. यातून त्याने स्वतःचा अजेंडाच उघड्यावर आणला. जे लाल संविधान हातात घेऊन राहुल गांधी उभा आडवा भारत फिरले आणि त्यानंतरच्या सगळ्या निवडणुकांमध्ये जोरदार आदळले, तेच लाल संविधानाचे पुस्तक कुणाल कामराने जाहीरपणे फडकवून दाखवले. त्यामुळे कुणाल कामराच्या स्टॅन्ड अप कॉमेडीचा स्तर पूर्ण घसरून पडला.
देवेंद्र फडणवीस यांनी यानिमित्ताने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला फटकावून काढले. कुणाल कामराच्या बाजूने आदित्य ठाकरे आणि संजय राऊत उभे राहिले होते. पण फडणवीसांनी त्यांच्यावर मात केली. गद्दार कोण आणि खुद्दार कोण, हे 2024 च्या विधानसभा निवडणुकीत जनतेने ठरवून टाकले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा वैचारिक वारसा एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे, याचा कौल महाराष्ट्राच्या जनतेने महायुतीला दिला. ज्यांनी केवळ बाळासाहेबांच्या विचाराशी गद्दारी केली, त्यांना जनतेने घरी बसवले त्यामुळे ते कितीही फडफडले तरी गद्दार कोण आणि खुद्दार कोण, हे महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
Maha CM Fadnavis backs Eknath Shinde over Kunal Kamra row
महत्वाच्या बातम्या
- Jayant Patil सत्तेच्या वळचणीला यायची जयंत पाटलांची तडफड; त्यांच्याबरोबरच इतर “पवार संस्कारितांची” देखील तीच तगमग!!
- Nagpur : नागपुरातील सर्व भागातून हिंसाचाराच्या सहा दिवसांनी कर्फ्यू हटवला
- समाजवादी पार्टी आणि मुस्लिम संघटनांकडून जास्तीत जास्त तुष्टीकरण; हेच भाजपसाठी राजकीय विस्ताराचे भरण पोषण!!
- Delimitation मीटिंग वरून तामिळनाडू मध्येच फूट; सर्वपक्षीय बैठकीला हजर राहिल्यानंतर AIADMK चा वेगळा सूर!!