प्रतिनिधी
मुंबई – ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी झालेल्या राष्ट्रमंचाच्या बैठकीवरून देशात आणि महाराष्ट्रात जोरदार टीका – टिपण्णी सुरू झाली असून माढा मतदारसंघाचे भाजपचे खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी या बैठकीवर खोचक शब्दांमध्ये निशाणा साधला आहे. Madha MP rangeetsingh nimbalkar hits out at sharad pawar and Rashtra manch leaders
चिल्लर जमा करून रुपया करता येत नाही, अशा शब्दात खासदार निंबाळकरांनी दिल्लीतल्या बैठकीवरून राष्ट्रमंचाच्या नेत्यांना टोला लगावला आहे. शरद पवारांनी दिल्लीत राष्ट्रमंचच्या बॅनरखाली विविध पक्षाचे नेते, पत्रकार, राजकीय विश्लेषक, गीतकार अशा विविध क्षेत्रातील लोकांची बैठक घेतली. खासदार रणजितसिंह निंबाळकरांनी दिवा विझत चाललेल्या पक्षांची बैठक अशा खोचक शब्दांमध्ये तिची संभावना केली.
-येडी सध्या बाहेर फिरताहेत
ईडी मागे लागते अशी दिशाभूल करणारे येडी सध्या बाहेर फिरत आहेत. अपरिपक्व लोक सध्या मीडियावर येऊन रोज बोलतात. त्यांचा यातून तात्पुरता स्वार्थ साधला गेला पण भविष्यातील मोठे नुकसान युती तुटल्यामुळे झाले, असा टोला त्यांनी संजय राऊतांना लगावला. शिवसेनेच्या कृपेमुळे चोर लोक सत्तेवर आलीत, अशा शब्दात त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीवरही घणाघात केला.
रणजितसिंह निंबाळकर म्हणाले, की पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या समोर उभे राहण्याची आज देशात कुणाची पात्रता नाही. बत्ती बुझने से पहले थोडी जलनी चाहीए, अशी या पक्षांची आणि त्यांच्या नेत्यांची परिस्थिती आहे. ज्या राजकीय पक्षांचे अस्तित्व संपले आहे. त्या पक्षांचे नेते पवारांच्या घरी आता एकत्र जमलेत. असले अनेक प्रयोग पूर्वीच अयशस्वी झाले आहेत. मोडीत निघालेल्या पक्षांना पवार एकत्र करत आहेत.
Madha MP rangeetsingh nimbalkar hits out at sharad pawar and Rashtra manch leaders
महत्त्वाच्या बातम्या
- अमरिंद सिंगांचा पत्ता कट…!!; पंजाबमध्ये काँग्रेस सोनियाजी – राहुलजींच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढविणार; मल्लिकार्जुन खर्गे यांचे महत्त्वपूर्ण विधान
- पंतप्रधानांनी अश्रू गाळल्यामुळे नव्हे; तर ऑक्सिजन पुरवठ्यामुळे लोकांचे जीव वाचले असते; राहुल गांधींचे टीकास्त्र
- महाबळेश्वरच्या गुहांतील वटवाघुळांमध्ये आढळला घातक निपाह व्हायरस ; संशोधन अहवालात स्पष्ट
- अरे बापरे… ओडिशात अवघ्या अर्ध्या तासात नागरिकास दिले लसीचे दोन डोस