• Download App
    अमरावतीत लव्ह जिहाद; धर्मांध मुसलमानाने फसवले उच्चविद्याविभूषित हिंदू तरुणीला!!|Love Jihad in Amravati; A bigoted Muslim cheated a highly educated Hindu girl!!

    अमरावतीत लव्ह जिहाद; धर्मांध मुसलमानाने फसवले उच्चविद्याविभूषित हिंदू तरुणीला!!

    प्रतिनिधी

    अमरावती : अमरावती जिल्ह्यात लव्ह जिहादचा गंभीर प्रकार खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी उघडकीस आणला आहे. त्यामुळे डॉ. बोंडे यांनी थेट मुस्लिमांना इशारा दिला आहे. मुस्लिमांनी आपली मुले सांभाळावी, अन्यथा जशास तसे उत्तर देण्यासाठी आम्हीही मागे हटणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे.Love Jihad in Amravati; A bigoted Muslim cheated a highly educated Hindu girl!!

    अमरावती जिल्ह्यातील धारणी येथील रुग्णवाहिकेवर चालक असणाऱ्या एका मुस्लिम युवकाने येथील उच्चविद्याविभूषित तरुणीला प्रेम जाळ्यात अडकवल्याचा प्रकार पुढे आला आहे. या युवकाने तिला विश्वासात घेत अमरावती येथील चंद्रविला या ट्रस्ट कडून अवैधरित्या लग्न लावून घेतले.



    डॉ. बोंडे यांचा आक्रमक पवित्रा

    हा संपूर्ण गंभीर प्रकार खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी उघडकीस आणला. प्रकरणातील पीडित मुलीची प्रकृती खालावल्याने तिला बुधवारी सकाळी जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या ठिकाणी धाव घेत खासदार डॉ. बोंडे यांनी मुलीची आणि तिच्या नातेवाईकांची भेट घेत त्यांच्या प्रकृती बद्दल विचारणा केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पीडित मुलीच्या कुटुंबीयांना सर्वकष मदत करणार असल्याचे त्यांनी आश्वासन दिले. तर दुसरीकडे डॉ. अनिल बोंडे यांनी याप्रकरणी आक्रमक पवित्रा घेतला असून मुस्लिमांनी आपली मुले सांभाळावीत अन्यथा हिंदूही त्याला जशास तसे प्रत्युत्तर देईल, असा दम सुद्धा त्यांनी भरला आहे.

    २ वर्षांत लव्ह जिहादची २० प्रकरणे

    २० प्रकरणात अनेक मुली बेपत्ता जिल्ह्यातील आदिवासी क्षेत्रात लव्ह जिहादची प्रकरणे मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्यांच्या सतर्कतेने धारणी येथील प्रकाराला लगेच आळा घालण्यात यश आले. तर ग्रामीण पोलिसांची भूमिका सुद्धा या प्रकरणात संशयास्पद आहे. गत दोन वर्षात लव्ह जिहादच्या २० प्रकरणांमध्ये शेकडो मुली बेपत्ता झाल्या आहेत, असे खासदार डॉ. अनिल बोंडे म्हणाले.

    Love Jihad in Amravati; A bigoted Muslim cheated a highly educated Hindu girl!!

    महत्वाच्या बातम्या 

     

    Related posts

    नवीन प्रणालीद्वारे होणार सार्वजनिक तक्रारींचे निवारण

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल