विशेष प्रतिनिधी
औरंगाबाद : राज्य शासनाने शेतकऱ्यांना केलेली मदत ही तटपुंजी असल्याची टीका केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड यांनी केली.औरंगाबादच्या सरस्वती भवन महाविद्यालयाच्या व्याख्यानमालेसाठी ते आले होते. त्यावेळी ते म्हणाले,Losses for farmers The amount of compensation is meager
राज्य शासनाने कोरडवाहूसाठी १० हजारांची आणि बागायतसाठी पंधरा हजार ही रक्कम जाहीर केली. मात्र अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून सरकार तटपुंजी रक्कम जाहीर करून त्यांना शेतकऱ्यांची थट्टा करत आहे.
हेक्टरी ५० हजार रुपये रक्कम शेतकऱ्यांसाठी मंजूर करण्यात यावी अशी भाजपची मागणी आहे. राज्य सरकारने पन्नास हजार रुपये शेतकऱ्यांसाठी मंजूर करावेत, असे ते म्हणाले.
- शेतकऱ्यांना नुकसान भरपाई तुटपुंजी
- अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
- अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांची सरकारकडून थट्टा
- हेक्टरी ५० हजार रुपये मदत करण्याचे आवाहन