• Download App
    संपामुळे राज्य परिवहन महामंडळाचे मोठे नुकसान; एसटीला तब्बल १२०० कोटी रुपयांचा तोटाloses Rs 1,200 crore due to staff strike; ST Corporation Vice President Shekhar Channe told

    संपामुळे राज्य परिवहन महामंडळाचे मोठे नुकसान; एसटीला तब्बल १२०० कोटी रुपयांचा तोटा

    वृत्तसंस्था

    मुंबई :  गेल्या दोन महिन्यांहून सुरु असलेल्या कर्मचाऱ्यांच्या संपामुळे राज्य परिवहन महामंडळाचे ( एसटी) मोठे नुकसान झाले असून तब्बल १२०० कोटी रुपयांचा तोटा झाला आहे, अशी माहिती महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकिय संचालक शेखर चन्ने यांनी दिली.loses Rs 1,200 crore due to staff strike; ST Corporation Vice President Shekhar Channe told

    एसटीची बससेवा बंद असल्याने एकीकडे प्रवाशांचे हाल होत आहेत. पण, विलीनीकरणासाठी कर्मचारी आडून बसले आहेत. त्यामुळे एसटीची चाके रुतली आहेत. कामावर हजर राहा, असे आवाहन करूनही कर्मचारी आपल्या मागणीवर कायम आहेत.



    दोन हजारांहून अधिक रोजंदारीवरील कामगारांची सेवासमाप्त केली असून, ३१२३ कर्मचाऱ्यांना बडतर्फ केल्याचे ते म्हणाले.आता दररोज ३०० ते ४०० कर्मचारी रुजू होत आहेत. त्यामुळे २५० पैकी २१५ आगारांतून बससेवा सुरू झाली आहे.

    आतापर्यंत २६ हजार ५०० कामगार रुजू झाले आहेत. गुरुवारी २१५ आगारांतून २३८२ बस धावल्या असून, ७१३८ फेऱ्यांमधून ४ लाख प्रवाशांनी प्रवास केल्याची माहिती चन्ने यांनी दिली.

    loses Rs 1,200 crore due to staff strike; ST Corporation Vice President Shekhar Channe told

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Palghar Highway Accident : ट्रक – कंटेनरच्या टक्करमध्ये 13 ठार; पालघर जिल्ह्यात साखरपुड्याला जाणाऱ्या वऱ्हाड्यांचा मृत्यू; 25 गंभीर, मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील घटना

    Sunetra Pawar : NCPचे सर्व आमदार सुनेत्रा पवारांच्या पाठीशी; आमदार शेळकेंची स्पष्टोक्ती; रोहित पवारांकडे भाजपत जाणाऱ्या 40 लोकांची नावे – लोंढे

    NEET Paper Leak : NEET पेपरलीकप्रकरणी RCC क्लासेसच्या शिवराज मोटेगावकरला 9 दिवसांची CBI कोठडी, 10 दिवस आधीच मिळवला होता पेपर