विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यासह इतर पोलीस अधिकाऱ्यांविरोधात खंडणीप्रकरणी लुकआऊट नोटीस जारी करण्यात आलीआहे. यामध्ये सध्या मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेल्या एका वरिष्ठ पोलीस उपायुक्ताचाही समावेश आहे.Lookout notice on former Mumbai Police Commissioner Parambir Singh, Pradip Sharma in ransom case
आंतरराष्ट्रीय क्रिकेट बुकी सोनू जलान आणि केतन तन्ना यांनी ठाणेनगर पोलीस स्थानकात परमबीर सिंग यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मोक्का कायद्या अंतर्गत खोट्या गुन्ह्यात अडकवून कोट्यवधी रुपये वसूल केल्याचा आरोप तन्ना यांनी केला होता. परमबीर सिंग यांच्या इशाऱ्यावरूनच एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आपल्याला धमक्या देऊन आपल्याकडून एक कोटी २५ लाख रुपये खंडणी उकळल्याचा आरोप तन्ना यांनी केला आहे.
परमबीर सिंग, प्रदीप शर्मा आणि त्यांच्या टीम मधील राजकुमार कोथमिरे, एन टी कदम, विकास दाभाडे या सगळ्यांनी खोट्या गुन्ह्यात अडकवून जेलमध्ये टाकण्याची धमकी दिल्याचा आरोप केतन तन्ना आणि सोनू जालान यांनी केला आहे. परमबीर सिंग यांच्यासह इतर अधिकाºयांवर आर्म अॅक्टसह आयपीसी कलम ३२४ (हल्ला), ३८४ (खंडणी), ३९२ (दरोडा) आणि ५०६ (गुन्हेगारी धमकी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
तन्ना यांनी आरोप केला आहे की परमबीर सिंह जानेवारी २०१८ ते फेब्रुवारी २०१९ दरम्यान ठाणे येथे पोलिस आयुक्त असताना आरोपींनी त्यांना खंडणीविरोधी कक्षाच्या कार्यालयात बोलावले. गंभीर गुन्हेगारी प्रकरणात त्यांना अटक करण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून १.२५ कोटी रुपये उकळले. त्यांचा मित्र आणि कथित सट्टेबाज सोनू जालान यांच्याकडूनही अशाच प्रकारे तीन कोटी रुपयांची उधळपट्टी केली, असा आरोप त्यांनी केला.
मुंबई पोलिसांनी परम बीर सिंह आणि इतर पाच अधिकाऱ्यांविरुद्ध भ्रष्टाचार आणि खंडणीच्या आरोपांच्या चौकशीसाठी सात सदस्यीय विशेष तपास पथक (एसआयटी) तयार केले आहे. सिंग आणि इतर पाच वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधात खंडणीच्या आरोपावरून मरीन ड्राइव्ह पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल झाल्यानंतर एका आठवड्यात या घडामोडी घडल्या.
श्यामसुंदर अग्रवाल नावाचा एक व्यापारी आणि बिल्डरने आपल्या तक्रारीत आरोप केला होता की, सिंह आणि इतर अनेक अधिकारी त्यांच्यावर दाखल केलेले खटले मागे घेण्यासाठी त्यांना 15 कोटी रुपये भरण्यासाठी जबरदस्ती करत आहेत.एसआयटीचे नेतृत्व डीसीपी दर्जाचे अधिकारी करत आहेत तर तपास अधिकारी (आयओ) एसपी रँकचा असेल.
Lookout notice on former Mumbai Police Commissioner Parambir Singh, Pradip Sharma in ransom case
महत्त्वाच्या बातम्या
- हॉकीपटू वंदना कटारियाचा उत्तराखंड सरकारतर्फे सन्मान, महिला सक्षमीकरण आणि बालकल्याण विभागाच्या होणार ब्रॅँड अॅँम्बॅसिटर
- स्वातंत्र्यवीर सावरकरांनी हिंदू राष्ट्र म्हणनू चूक केली नाही, राजस्थान कॉँग्रेसच्या अध्यक्षांनी सावरकरांचे गुणगान केल्याने पक्षात खळबळ
- इस्लामीक स्टेटच्या बांग्ला देशातील दहशतवाद्यांकडून घुसखोरी लपविण्यासाठी भारतीय मुलींशी विवाह
- नमाजाच्या वेळी भजन म्हटल्याचा आरोप करत बांग्ला देशात मंदिराची तोडफोड