• Download App
    LOKSABHA : सुप्रिया सुळेंनी स्वतः ट्विट करत दिली माहिती ; सुप्रिया सुळे ठरल्या लोकसभेत नंबर वन खासदार ! |LOKSABHA: Supriya Sule tweeted the information herself; Supriya Sule becomes number one MP in Lok Sabha!

    LOKSABHA : सुप्रिया सुळेंनी स्वतः ट्विट करत दिली माहिती ; सुप्रिया सुळे ठरल्या लोकसभेत नंबर वन खासदार !

    विद्यमान सतराव्या लोकसभेतही राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे या अव्वल ठरल्या आहेत.LOKSABHA: Supriya Sule tweeted the information herself; Supriya Sule becomes number one MP in Lok Sabha!


    विशेष प्रतिनिधी

    पुणे : नुकत्याच पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनापर्यंत सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खासदारांची यादी जाहीर झाली असून संसदेतील खासदारांच्या कामगिरीच्या आधारे ‘पीआरएस’ या संस्थेने खासदारांची कामगिरी जाहिर केली आहे. त्यात सुप्रिया सुळे या यंदाही अव्वल ठरल्याचे नोंदविण्यात आले आहे.

    लोकसभा अधिवेशनातील उपस्थितीसह प्रश्नोत्तरे, विविध चर्चांमधील सहभाग, खासगी विधेयके आदींचा यात प्रकर्षाने उल्लेख करण्यात आला आहे. या यशासाठी खासदार सुप्रिया यांनी पुन्हा एकदा बारामती लोकसभा मतदार संघातील सर्व मतदारांचे आभार मानत संसदेतील त्यांच्या कामगिरीची आकडेवारी जाहीर केली आहे.



    सर्व मतदारांनी आपल्यावर दाखविलेला विश्वास आणि प्रेम यामुळे हे शक्य झाले, असे त्यांनी म्हटले आहे.

    बारामती लोकसभा मतदारसंघातील नागरिक, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, सहयोगी पक्ष आणि कार्यकर्त्यांनी आपल्याला संसदेत प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली. त्या सर्वांच्या विश्वासाला सार्थ ठरविण्याचा प्रामाणिक प्रयत्न आपण करत असून

     

    यातूनच आपल्याला महाराष्ट्रातील जनतेच्या हितासाठी विविध मुद्दे संसदेत मांडण्यासाठी ऊर्जा मिळते, असेही त्यांनी म्हटले आहे. यापुढेही संसदेच्या माध्यमातून मतदारसंघातील व राज्यातील जनतेच्या हिताचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण सदैव प्रयत्नशील राहू याची ग्वाही देत पुन्हा त्यांनी सर्वांचे आभार मानले आहेत.

    सुप्रिया सुळे यांची १७ व्या लोकसभेतील कामगिरी

    एकूण उपस्थिती: ९१%
    एकूण चर्चासत्र: १५९
    एकूण प्रश्न: ३८३
    खाजगी विधेयक: ७

    LOKSABHA: Supriya Sule tweeted the information herself; Supriya Sule becomes number one MP in Lok Sabha!

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस