• Download App
    Local Body Elections: NCP Alliance, Pawar Ready स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी दोन्ही राष्ट्रवादींची युती?

    Ajit Pawar : स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी दोन्ही राष्ट्रवादींची युती? शरद पवार भाजप वगळता कुणासोबतही जाण्यास तयार!

    Ajit Pawar

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : Ajit Pawar आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून महत्त्वाची माहिती समोर आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप वगळता इतर कोणत्याही पक्षाशी युती करण्यास पक्ष सकारात्मक असल्याचे पक्षातील वरिष्ठ सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. विशेष म्हणजे, यामध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही पर्याय असणार आहे. यामुळे काका-पुतणे एकत्र येणार का? याची चर्चा सुरू आहे.Ajit Pawar

    राज्यात गेल्या तीन ते चार वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत हालचाली वाढल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले. त्यानंतर राज्य सरकारने महापालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतींसाठी प्रभाग रचना करण्याचे आदेश जारी केले आहेत. त्यामुळे संपूर्ण राज्यात राजकीय वातावरण तापू लागले असून, सर्वच पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत.



    आगामी निवडणुकांसाठी दोन्ही राष्ट्रवादीच्या युतीची शक्यता

    राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजप वगळता कुणाशी देखील युती करण्यास तयार असल्याची माहिती राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वरिष्ठ सूत्रांनी माहिती दिली आहे. यामुळे युतीसाठी अजित पवार यांच्या पक्षाचा ही पर्याय राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षासाठी खुला राहणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून युतीबाबतचे सर्व अधिकार स्थानिक पातळीच्या नेत्यांवर सोपवले जाणार आहेत, अशी माहिती देखील सूत्रांकडून देण्यात आली आहे.

    महाविकास आघाडीचे काय होणार?

    महाविकास आघाडीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी एकत्र येण्याबाबत फारसे इच्छुक नसल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या युतीबाबत अनिश्चितता कायम आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, महाविकास आघाडीतील घटक पक्ष या निवडणुकीसाठी स्वतंत्र लढण्यासाठी इच्छुक असल्याची देखील माहिती आहे. अद्याप महाविकास आघाडीत स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत एकत्र येण्याबाबत कोणतीच चर्चा नाही, अशी माहिती देखील आहे.

    दोन्ही राष्ट्रवादींच्या युतीवर सुळेंची प्रतिक्रिया

    राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हा भाजप सोडून इतर पक्षांसोबत युती करण्याचा निर्णय स्थानिक नेते घेतील. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत स्थानिक नेते ठरवतील, ही आमच्या पक्षाची गेली 26 वर्षांपासूनची लाईन आहे, ती आता कायम राहील. एखाद्या महापालिका निवडणुकीत अजितदादांच्या राष्ट्रवादीसोबत जाण्याची वेळ आली तर जाणार का, या प्रश्नावर ‘आता पाऊस पडला तर मी रेनकोट घालणार की छत्री घेणार याबाबतचा निर्णय मी अजून घेतलेला नाही, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी उत्तर दिले.

    Local Body Elections: NCP Alliance, Pawar Ready

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Nitin Gadkari : नितीन गडकरी म्हणाले- ग्रामीण भागाचा विकास-रोजगार निर्मिती हाच आपल्या अर्थव्यवस्थेचा खरा पाया असावा

    हिंदी सक्ती आणि त्रिभाषा सूत्र, संघाच्या प्रतिक्रियेवरून वेगळाच narrative set करायचा मराठी माध्यमांचा प्रयत्न!!

    Sanjay Shirsat : ‘विट्स’ वाद पेटला: संजय शिरसाट अडचणीत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उच्चस्तरीय चौकशीचे आदेश