विशेष प्रतिनिधी
मुंबई – मुंबई शहर, उपनगरांत, तसेच ठाणे, पालघर, रायगड विभागात मद्यविक्रीला जोर आला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी एप्रिल ते जूनदरम्यान मद्यविक्री तिपटीने वाढली असून बियरला सर्वाधिक मागणी आहे.Liquor demand increased in Mumbai region
गेल्या वर्षी या कालावधीत १ कोटी ९ लाख ५३ हजार बल्क लिटर बियरची विक्री झाली होती. त्या तुलनेत या वर्षी २ कोटी १६ लाख १४ हजार बल्क लिटर बियरची विक्री झाली असून इतर मद्य प्रकाराच्या विक्रीतही वाढ झाली आहे.
गेल्या वर्षी लॉकडाऊनमुळे सार्वजनिक मद्यविक्री बंद करण्यात आली होती. त्यामुळे मद्यविक्रीत मोठी घट झाली होती. आता राज्य सरकारने कोरोनाचे निर्बंध शिथिल केले असून सध्या सायंकाळी ४ वाजेपर्यंत मद्य दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे; तर परमिट रूमसुद्धा ५० टक्के क्षमतेने सुरू ठेवण्याची परवानगी आहे.
शिवाय ४ वाजता मद्यविक्रीची दुकाने बंद केल्यानंतर घरपोच मद्य विक्री सेवाही सुरू आहे. त्यामुळे उत्पादन शुल्क विभागाच्या आकडेवारीनुसार मुंबई उपनगरे, ठाणे विभागात सर्वाधिक बियर विक्री झाली आहे. त्यानंतर भारतीय बनावटीचे विदेशी मद्य, देशी मद्य आणि वाईन विक्रीतही मोठी वाढ झाली आहे.
Liquor demand increased in Mumbai region
महत्त्वाच्या बातम्या
- बैजू बावरा सिनेमात रणवीर – दीपिकाची जोडी फुटणार, मानधनावरून दिपीकाला सिनमातून डच्चू?
- भावविश्व परिपूर्ण करण्यात स्पर्श आणि डोळ्यांच्या सहजीवनाची भूमीका महत्त्वपूर्ण
- अफगाणिस्तानच्या ८० टक्के भूभागावर तालिबानच्या दहशतवाद्यांचा ताबा, जगाचा धोका पुन्हा वाढणार
- कर्जाच्या आर्थिक दलदलीतून त्वरित बाहेर पडा
- पश्चिम बंगालमधील शिक्षिकांना मासिक पाळी रजा द्या, शिक्षक संघटनेने केली मागणी