दरम्यान या अजब मागणीची राज्यात तसेच सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे.Licensing liquor shop instead of giving bogus degree from online education, letter from Nanded student to education minister
विशेष प्रतिनिधी
नांदेड : राज्यात दिवसेंदिवस कोरोना वाढतच चालला आहे.त्यामुळे राज्यात शाळा,तसेच महाविद्यालयांमध्ये ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांना शिकवले जात आहे.मात्र याच शिक्षणपद्धतीला नांदेडमधील विद्यार्थी पवन जगडमवार याने विरोध केला आहे.
पावनने थेट उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांना पत्र लिहून ऑनलाईन शिक्षणातून बोगस डिग्री देण्यापेक्षा दारूच्या दुकानाचा परवाना द्या, अशी मागणी केली आहे.दरम्यान या अजब मागणीची राज्यात तसेच सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे.
पत्रात नेमकं काय आहे ?
या पत्रात पवन म्हणाला की “माझी परिस्थिती अत्यंत गिरिबीची आहे. तरीही मी अनेक अडचणींना सामोरे जाऊन शिक्षण घेत आहे.दरम्यान ऑनालाईन शिक्षण देणार असल्यामुळे मला अडचणींचा सामना करावा लागतोय. मोबाईलला रिचार्ज करुनही इंटरनेट व्यवस्थित चालेल का याची शाश्वती नाही.
पुढे पवन पत्रात म्हणाला की , नांदेड सारख्या शहरात राहूनही मला शिक्षणासाठी इतके पैसे खर्च करावे लागत असून फक्त ऑनलाईन शिक्षण मिळणार असेल तर माझा काहीही फायदा होणार नाही. अशा महामारीत दारुची दुकाने सुरु आणि शिक्षण बंद असेल तर मी शक्षण घेऊन काय करु ?मला देशी दारूच्या दुकानाचा परवाना देऊन सहकार्य करा,” असे विद्यार्थ्याने आपल्या पत्रात म्हटले आहे.
Licensing liquor shop instead of giving bogus degree from online education, letter from Nanded student to education minister
महत्त्वाच्या बातम्या
- बुलढाण्यातील अभयारण्यात जंगल सफरीला बंदी, कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे निर्णय; पर्यटकांचा हिरमोड
- लतादीदींना न्युमोनिया, आणखी 10 -12 दिवस ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्येच उपचार
- देशात कोरोना, ओमीक्रोन रुग्णांची वाढती संख्या; २४ तासांत १.९४ लाख नवीन प्रकरणांची नोंद
- National Youth Day : PM मोदी म्हणाले – 2022 हे वर्ष भारतीय तरुणांसाठी महत्त्वाचे, भारतीय तरुण संपूर्ण जगाच्या युनिकॉर्न इकोसिस्टिममध्ये चमकणार