वृत्तसंस्था
पुणे : कोरोनाविरोधातील मॅच जिंकण्यासाठी कोरोनाची चाचणी गरजेची आहे. त्यामुळे उपचाराचा मार्ग त्वरित मोकळा होईल, असे मत क्रिकेटपटू हरभजन सिंगने व्यक्त केले.Let’s win the match against Corona: Harbhajan Singh;BJP inaugurates Corona test van in Pune
भाजपतर्फे पुण्यातील नागरिकांच्या आरटीपीसीआर आणि रॅपिड अँटीजेन चाचण्या करण्यासाठी फिरत्या कोरोना चाचणी व्हॅनचे उदघाटन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यवाह महेश करपे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ऑनलाईन कार्यक्रमात हरभजनसिंग बोलत होता.
पाटील म्हणाले, कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट वेगळी आहे. कोरोनाची टेस्ट केल्याने लवकर निदान होऊन वेळीच उपचार होतील. कामगार तसेच कर्मचाऱ्यांना टेस्ट करण्यासाठी सांगितले आहे.
त्यामुळे लॅबवर ताण वाढला आहे. कोरोनावर मात करण्यासाठी टेस्ट वाढवाव्या लागतील. त्यामुळे कोरोना चाचणी व्हॅनची संकल्पना राबविण्यात येत आहे. हरभजनसिंग यांनी व्हॅन उपलब्ध करून दिली.
शहराध्यक्ष मुळीक म्हणाले, अंगावर दुखणे काढल्यामुळे काहींना थेट अतिदक्षता विभागात (आयसीयु) दाखल करावे लागत आहे. त्यामुळे त्वरित टेस्ट करा. व्हॅनच्या माध्यमातून जास्तीतजास्त टेस्ट केल्या जाणार आहेत. त्यामुळे धोका टाळता येईल. रुग्णसंख्या वाढत असल्याने टेस्टचे प्रमाण वाढविण्याची गरज आहे.
फिरत्या चाचणी व्हॅनचे वैशिष्ट्य
- आरटीपीसीआर टेस्ट ५०० रुपयांत होणार असून रिपोर्ट सात तासात मिळणार आहे.
- अँटिजेन टेस्ट २५० रुपयांत होणार असून रिपोर्ट १५ मिनिटांत मिळणार आहे.
- पुण्यातील मतदारसंघात दोन दोन दिवस ही व्हॅन फिरणार आहे.
- दिवसात आरटीपीसीआरची ६ हजार जणांच्या टेस्ट आणि अँटिजेन टेस्ट १५०० करता येणार आहे.
Let’s win the match against Corona: Harbhajan Singh;BJP inaugurates Corona test van in Pune
महत्त्वाच्या बातम्या
- वसुली प्रकरण : CBIने अनिल देशमुखांविरूद्ध दाखल केली FIR, अनेक ठिकाणी छापेमारी
- पुण्यातील पोलिस मुख्यालयातील हॉस्पिटलमध्ये दहा ऑक्सिजन बेड सुविधा ; पोलिसांना दिलासा
- आमने-सामने : राजेश टोपेंच्या ‘त्या’ असंवेदशील विधानावर प्रविण दरेकर यांचा संताप -जनतेच्या दुःखावर मीठ चोळणारी वक्तव्य तरी करू नका !
- आणि सोनू सूदने तिला एअर अॅम्ब्यूलन्सने नागपूरहून हैद्राबादला पोहोचविले
- केंद्रावर आरोप करण्यापेक्षा मंत्र्यांनी जनतेकडे लक्ष द्यावे, रामदास आठवले यांचा सल्ला7