• Download App
    साडेतीन शक्तीपीठे : चला, ऑनलाईन व्होटिंग करू; महाराष्ट्राच्या चित्ररथाला जिंकून देऊ!! Let the Chitraratha of Maharashtra win

    साडेतीन शक्तीपीठे : चला, ऑनलाईन व्होटिंग करू; महाराष्ट्राच्या चित्ररथाला जिंकून देऊ!!

    प्रतिनिधी

    मुंबई : 2023 च्या प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठे आणि नारीशक्ती या विषयावरील चित्ररथ महाराष्ट्राने दिल्ली येथील कर्तव्यपथावर प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने दिमाखात सादर केला होता. Let the Chitraratha of Maharashtra win

    यामध्ये महाराष्ट्रातील अध्यात्मिक शक्ती असलेल्या साडेतीन शक्तीपीठांचा देखावा, महाराष्ट्राची अमूर्त लोककला आणि वैशिष्ट्यपूर्ण मंदिर शैली दाखविण्यात आली होती.

    चित्ररथाला दोन प्रकारचे पुरस्कार असून, पहिल्या प्रकारचा पुरस्कार तज्ञ समितीच्या अहवालावरून मिळेल, तर दुसऱ्या प्रकारचा पुरस्कार लोकप्रिय चित्ररथ या सदराखाली लोकांनी ऑनलाइन व्होटिंग केल्यानुसार मिळेल.

    – लोकप्रिय चित्ररथ श्रेणीसाठी सर्वोत्कृष्ट पसंती नोंदविण्याचे आवाहन :

    साडेतीन शक्तीपीठे आणि नारीशक्ती या महाराष्ट्राच्या चित्ररथाला क्रमांक 1 च्या पसंतीसाठी आपल्या मोबाइल क्रमांकावरून खालील प्रमाणे मेसेज मंगळवार दि. ३१ जानेवारी २०२३ च्या रात्री ११.४५ वाजेपर्यंत पाठवावा.

    MYGOVPOLL 337011,12
    हा sms
    7738299899
    या मोबाईल क्रमांकावर पाठवा.
    MYGOVPOLL (space) 337011,12

    किंवा

    आपणांस खालील लिंक वर जाऊन “महाराष्ट्र” या नावासमोर आपले ऑनलाईन मत नोंदविता येईल :

    https://www.mygov.in/group-poll/vote-your-favorite-tableau-republic-day-2023/ )

    आपण वरील प्रमाणे online voting करा आणि त्यानंतर आपल्या संपर्कातील सर्वांना असे करण्यासाठी WhatsApp Group, FB व इतर social media व्दारे हा मेसेज forward करून विनंती करावी, असे आवाहन महाराष्ट्र सरकारने केले आहे.

    Let the Chitraratha of Maharashtra win

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Delhi court : दिल्ली कोर्टात आरोपी-वकिलांची न्यायाधीशांना धमकी; म्हणाले- बाहेर भेटा, बघू तुम्ही जिवंत घरी कसे पोहोचता!

    त्यावेळी राज की उद्धव?, प्रश्नावर पवारांचे उत्तर “ठाकरे कुटुंबीय”; पण आता दोन्ही भावांच्या ऐक्यावर मात्र कानावर हात!!

    ISRO : इस्रोला दुसऱ्यांदा डॉकिंगमध्ये यश, दोन उपग्रह जोडले; जानेवारीत प्रथमच स्पेस डॉकिंग केले होते