• Download App
    Legislature Privilege Committee Decision MLA Workers Jailed Photos Videos Report

    Legislature Privilege : विधानमंडळ विशेषाधिकार समितीचा निर्णय- 2 आमदारांच्या कार्यकर्त्यांना विधिमंडळाकडून दोन दिवसांची कैद

    Legislature Privilege

    विशेष प्रतिनिधी

    नागपूर : Legislature Privilege १७ जुलै २०२५ रोजी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांत मुंबई विधिमंडळ लॉबीत, पायऱ्यांवर तुफान हाणामारी झाली होती. या प्रकरणी पडळकर समर्थक कार्यकर्ते सर्जेराव टकले, आव्हाड समर्थक नितीन देशमुख यांना विधानमंडळ विशेषाधिकार समितीने दोन दिवस कैदेची (दिवाणी कोठडी) शिक्षा ठोठावली. या दोघांना २०२९ पर्यंत मुंबई, नागपूर विधानभवन परिसरात बंदी घालण्यात आली आहे. समितीने दहा बैठकांत ३० जणांचे जाब-जबाब तसेच साक्षी-पुरावे नोंदवल्यावर हा निर्णय घेतला.Legislature Privilege

    शेतापर्यंत बारमाही रस्ते योजना राबवणार

    राज्यातील सर्व शेतापर्यंत बारमाही मजबूत रस्ते बांधण्याची योजना येत्या ४ वर्षांत राबवली जाणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना त्यांचा माल बाजारपेठेत नेणे सोपे जाईल. येत्या अर्थसंकल्पात तरतूद केली जाणार आहे.Legislature Privilege



    महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी विधानसभेत ही घोषणा केली. पावसाळी अधिवेशनात या योजनेवर चर्चा झाली होती. तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बावनकुळे यांच्यावर योजनेचा आराखडा, तयार करण्याची जबाबदारी दिली होती.

    समितीच्या महत्त्वाच्या शिफारशी

    1 विधानभवन प्रवेश नियमावलीत सुधारणा : विधान भवनात येणाऱ्या सर्व अभ्यागतांसाठी एक स्वतंत्र आणि कठोर नियमावली तातडीने तयार करून तिची कडक अंमलबजावणी करावी.
    2 तंत्रज्ञान-आधारित तपासणी : विधान भवन इमारतीमधील प्रवेशिका वितरण प्रणाली महाराष्ट्र पोलीस डेटाबेसशी थेट संलग्न करण्यात यावी. या संलग्नतेमुळे अभ्यागतांची गुन्हेगारी पार्श्वभूमीची तपासणी स्वयंचलितरित्या कार्यान्वित होईल.
    3 प्रभावी सुरक्षा व्यवस्थेची निर्मिती : सुरक्षा व्यवस्था बळकटीसाठी सुरक्षा सल्लागार, पोलीस विभागाशी समन्वय ठेवला जावा. आणि गुन्हेगारी प्रवृत्तींना रोखावे.

    पडळकर-आव्हाड एकमेकांना खिजवत होते

    जुलै २०२५ च्या सुरुवातीपासून आमदार पडळकर आणि आव्हाड यांच्यात शरद पवार, सुप्रिया सुळेंवरील टीकेमुळे वाद धुमसत होता. पडळकरांना उद्देशून आव्हाड ‘मंगळसूत्र’ चोर असे ओरडत होते. पडळकर आव्हाडांना अर्बन नक्षल, मुसलमानांचा एक्स असे म्हणत होते. त्यावरून त्यांच्यात शाब्दिक चकमक होऊन त्याचे पर्यावसान १७ जुलैला कार्यकर्त्यांच्या हाणामारीत झाले. यात टकले, देशमुखांशिवाय दोन्ही बाजूंचे आठ-दहा कार्यकर्ते होते. घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केल्यावर पडळकरांनी विधानसभेत दिलगिरी व्यक्त केली होती.

     Legislature Privilege Committee Decision MLA Workers Jailed Photos Videos Report

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    NGT Halt Tapovan : तपोवन वृक्षतोडीला NGTचा ब्रेक; एकही झाड 15 जानेवारीपर्यंत तोडता येणार नाही

    Narhari Zirwal : मंत्र्यांची कबुली- 11 सरकारी रुग्णालयातून बोगस औषधींचे वितरण; दोषी कंपन्यांवर फौजदारी

    हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने नागपूरातून एकनाथ शिंदेंची विदर्भ + मराठवाड्यात राजकीय मुशाफिरी