विशेष प्रतिनिधी
मुंबई : हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाशी आयुष्यात कधीही गद्दारी केली नाही. पण याउलट आता उद्धव ठाकरे हिंदुत्वाची कास सोडून खुर्चीला चिकटलेले आहेत. ते फांदीवर बसलेले पक्षी असून त्यांचे झाड लवकरच कोसळेल असा हल्लाबोल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले.Leaving Hindutva behind, Uddhav Thackeray clinging to his chair, Narayan Rane’s attack
एक वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना राणे म्हणाले, बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व बेगडे नव्हते ते उद्धव ठाकरेंचे आहे. त्यांची बाळासाहेबांशी तुलना होऊ शकत नाही. त्यांनी हिंदुत्वाशी गद्दारी आयुष्यात केली नाही. आता उद्धव ठाकरे हिंदुत्वाची कास सोडून खुर्चीला चिकटलेले आहेत. मी आज बोलतोय उद्या महाविकास आघाडी केसेस टाकतील आम्हीही केस टाकू शकतो पण आम्ही रडीचा डाव खेळत नाही.
उद्या दंगली भडकल्या तर त्या आवरण्याचे कसब राज्य सरकारकडे नाही. राज्य सरकारातील गृहमंत्री माझे आधी मित्र होते आता ते मित्र नाही. ते चांगले नेते आहे पण गृहमंत्री म्हणून त्यांनी चांगले पद सांभाळले नाही. राज्यात अत्याचार करणाºया अधिकाऱ्यांना अभय मिळाले.
राणे म्हणाले, माझा भोंग्याला विरोध नाही पण बेकायदेशिर भोंग्याला विरोध आहे. भोंग्याबद्दल कारवाई करायला राज्य सरकारमध्ये ताकद नाही. राज्य सरकारची आर्थिक स्थिती केविलवाणी आहे. शेतकऱ्यांचा प्रश्न किंवा अन्य कुठलाही प्रश्न सोडवण्याची ताकद नाही. राज्याला मुख्यमंत्रीच नाही. मी अडीच वर्षे मुख्यमंत्री होतो,
माझ्यानंतर अडीच तासात राज्य कारभार ढेपाळला. उद्धव ठाकरेंना वर्षा ते मंत्रालय जायला जमत नाही असे हे मुख्यमंत्री आहेत. या पदासाठी तीन पक्षाचे सरकार असूनही लायकीचा माणूस नाही. राज्य सुरक्षित नाही, उद्योजक येत नाही. उद्योग ठप्प आहे अशी राज्याची दयनिय स्थिती आहे पण मुख्यमंत्री बोलत नाही, विकासासाठी ते पैसे नाही कुठुन आणणार ?
Leaving Hindutva behind, Uddhav Thackeray clinging to his chair, Narayan Rane’s attack
महत्त्वाच्या बातम्या
- इन्फोसिसचे शेअर्स ६.८९ टक्क्यांनी घसरले
- Raj Thackeray : एकीकडे राज ठाकरेंना धमक्या; दुसरीकडे भोंगे परवानगीसाठी मुस्लिम संघटनांची धावपळ!!
- Pawar NCP Karnataka : शरद पवारांचा कर्नाटक दौरा; पण राष्ट्रवादीच्या बळकटीसाठी?? की काँग्रेस पोखरण्यासाठी…??
- शालेय विद्यार्थ्यांना सुपरमाईंड फाऊंडेशनतर्फे मोफत मार्गदर्शन