विशेष प्रतिनिधी
मुंबई : आधी ओबीसी बचाव यात्रेचे निमंत्रण, पण ते निमंत्रण स्वीकारले नाही. त्यानंतर शरद पवार आणि अजितदादांचे श्रीमंत मराठ्यांचे पक्ष आहेत, अशी प्रकाश आंबेडकर यांची टीका!! ही भूमिका स्वतः प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेतच जाहीर करून टाकली. त्यांनी महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षांची जातनिहाय मांडणी सांगितली. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय नेत्यांच्या यात्रा लवकरच सुरु होणार आहेत. अशात प्रकाश आंबेडकर यांनी श्रीमंत मराठे म्हणजे शरद पवार, अजित पवारांचे पक्ष अशी टीका केली. Later criticism of Prakash Ambedkar on pawars
महाराष्ट्रात सध्या ओबीसी आणि मराठा आरक्षणावरुन हे दोन समाज आमने-सामने आले असून त्यावरून गावागावांत आणि नेत्यांमध्येही जातीय तणाव पाहायला मिळत आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरुन समाजात जातीय संघर्ष वाढत असल्याने राज्यात सलोखा निर्माण व्हावा आणि आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागावा, यासाठी वंचित आरक्षण बचाव यात्रा काढली जात असल्याचं सांगण्यात येत आहे. या यात्रेचे निमंत्रण प्रकाश आंबेडकरांनी शरद पवार आणि छगन भुजबळ यांना पत्र लिहून दिले होते. परंतु, या दोन्ही नेत्यांनी हे निमंत्रण स्वीकारले नाही. या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली.
प्रकाश आंबेडकर म्हणाले :
महाराष्ट्रात ओबीसी आणि मराठा हे दोन समाज एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. मात्र, अशावेळेस राजकीय पक्ष आणि नेत्यांनी कोणतीही भूमिका घेतलेली नाही. हे पक्ष जातींचे पक्ष आहेत, श्रीमंत मराठे म्हणजे शरद पवार पक्ष, काँग्रेस आणि अजित पवार यांचा पक्ष असे आहेत, तर कायस्थ प्रभूंचे पक्ष म्हणजे भाजपा आणि शिवसेना उबाठा यांचा पक्ष आहे. यामुळेच आम्ही आता गुरुवारपासून आरक्षण बचाव यात्रा काढत आहोत. चैत्यभूमीवरुन ही यात्रा सुरु होईल, मग पुण्यात फुले वाडा, नंतर अनेक जिल्हे करत पुढे औरंगाबाद येथे 7 ऑगस्ट रोजी यात्रेची सांगता होईल, अशी माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिली.
ओबीसी समाज घाबरला
महाराष्ट्रातला ओबीसी समाज हा सध्या घाबरला आहे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे ओबीसी कार्यकर्त्यांवर हल्ला होत आहे. राज्यात अशा घटना घडू नयेत आणि शांतता प्रस्थापित व्हावी अशी आमची भूमिका आहे. मनोज जरांगे हे थेट आरक्षण द्या किंवा आरक्षण रद्द करा म्हणत आहेत. या परिस्थितीत ओबीसींना त्यांचे आरक्षण जाईल असे वाटते आहे.
Later criticism of Prakash Ambedkar on pawars
महत्वाच्या बातम्या
- BCCI सचिव जय शहा यांची घोषणा; ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंना 8.5 कोटींची मदत, 117 भारतीय खेळाडू सहभागी होणार
- Pushkar Singh Dhami : अग्निवीरांसाठी पुष्कर सिंह धामी सरकारने केली मोठी घोषणा
- US Elections : बायडेन यांनी निवडणुकीतून माघार घेतल्यावर ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया
- एकीकडे जरांगेंची अमित शाहांवर जहरी टीका; तर दुसरीकडे पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला!!