वृत्तसंस्था
पुणे : पुण्यातील सरकारी रुग्णालयाचा गैरकारभार उघडकीस आला आहे. काही डॉक्टरांनी उपचारासाठी दाखल करून घेण्यासाठी कोरोना रुग्णाच्या नातेवाईकांकडून एक लाख रुपये उकळल्याची घटना उघडकीस आली आहे.Lakhs of rupees boiled by doctors in Pune; Government hospital mismanagement exposed
विशेष म्हणजे संबंधित रुग्णालय महापालिकेच्या अखत्यारीत आहे. याप्रकरणी पिंपरी ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून तीन डॉक्टरांना अटक झाली आहे.
ऑटो क्लस्टर रुग्णालयात दाखल होणाऱ्याकडून एक रुपयाही आकारला जात नाही. परंतु 3 डॉक्टरांनी बेड मिळवून देण्यासाठी आणि दाखल करून घेण्यासाठी एक लाख रुपये उकळले आहेत.
महापालिकेनं पिंपरी ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यानंतर डॉ. प्रवीण जाधव, डॉ. शशांक राळे आणि डॉ. सचिन कसबे यांना अटक झाली. पिंपरी चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त उल्हास बबनराव जगताप यांनी फिर्याद दिली होती.
Lakhs of rupees boiled by doctors in Pune; Government hospital mismanagement exposed
महत्त्वाच्या बातम्या
- India Corona Case Updates : देशात 24 तासांत 3,68,000 नवीन रुग्णांची नोंद, 3417 मृत्यू; सक्रिय रुग्णसंख्या 34 लाखांच्याही पुढे
- ममतांना मुस्लिमांचे एकगठ्ठा मतदान, 59 मुस्लिमबहुल मतदारसंघांपैकी 58 मध्ये तृणमूलचा विजय
- India Fights Back : अमेरिकेतून 125,000 रेमडेसिव्हिर कुप्या विमानाने भारतात दाखल, जर्मनीतूनही 4 ऑक्सिजन क्रायोजेनिक टँकरची मदत
- देशात 15 दिवसांचे कडक लॉकडाऊन?, कोविड टास्क फोर्सच्या मागणीवर केंद्र सरकार आज निर्णय घेण्याची शक्यता
- काळजी करू नका, मी लवकरच भारतात परतेन – आदर पूनावाला यांची माहिती