विशेष प्रतिनिधी
मुंबई : Ladki Bahin Yojana राज्य सरकारकडून वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असलेल्या कुटुंबांतील महिलांना लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत दिली जात असून, आता या योजनेच्या निकषांची अंमलबजावणी अधिक कडक करण्यात येत आहे. प्रशासनाकडून सर्व लाभार्थी महिलांना ई-केवायसी (e-KYC) पूर्ण करण्याचे वारंवार आवाहन करण्यात आले होते आणि त्यासाठी वेळोवेळी मुदतवाढही देण्यात आली होती. आता या संदर्भात महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी महत्त्वाची सूचना दिली आहे.Ladki Bahin Yojana
अदिती तटकरे यांनी ट्विट करत म्हटले की, महाराष्ट्रातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी, त्यांच्या आरोग्य व पोषणामध्ये सुधारणा करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवण्यात येत आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व लाभार्थ्यांना दिनांक 31 डिसेंबर 2025 रोजी पर्यंत e-KYC करण्याची मुदत देण्यात आली होती.Ladki Bahin Yojana
तथापि, काही कारणास्तव e-KYC करताना चुकीचा पर्याय निवडण्याची बाब निदर्शनास आली आहे. म्हणूनच, योजनेच्या निकषांनुसार या लाभार्थी महिलांची क्षेत्रीय स्तरावर अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणी (Physical Verification) करण्याच्या सूचना राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या असल्याची माहिती अदिती तटकरे यांनी दिली आहे.
महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी प्रक्रियेसंदर्भात सोशल मीडियावरून माहिती दिली असून, त्यांच्या या पोस्टवर लाभार्थी महिलांकडून मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रिया येत आहेत. अनेक महिलांनी तांत्रिक अडचणींमुळे, विशेषतः ई-केवायसी करताना मोबाइलवर ‘ओटीपी’ न मिळाल्याने ही प्रक्रिया वेळेत पूर्ण होऊ शकली नसल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे तांत्रिक बिघाडामुळे प्रक्रियेपासून वंचित राहिलेल्या महिलांना दिलासा देण्यासाठी ई-केवायसीची मुदत आणखी काही दिवस वाढवून मिळावी, अशी आग्रही मागणी सोशल मीडियाच्या माध्यमातून केली जात आहे.
Ladki Bahin Yojana: Aditi Tatkare Announces Physical Verification for e-KYC Errors
महत्वाच्या बातम्या
- ओबीसी आरक्षण वाचवायच्या मुद्द्यावर वंचित बहुजन आघाडी जिल्हा परिषद निवडणुकीच्या मैदानावर!!
- Supreme Court : कर्नल सोफिया अपमानप्रकरणी SCने MPच्या मंत्र्याला फटकारले, म्हटले- माफी मागण्यात उशीर झाला
- Rajnath Singh : राजनाथ सिंह यांनी गायडेड-पिनाका रॉकेट प्रणालीला हिरवा झेंडा दाखवला; आर्मेनियालाही निर्यात होणार
- नितीन नवीन बॉस, मी कार्यकर्ता; पंतप्रधान मोदींनी एका वाक्यात अधोरेखित केला भाजप मधला Generational Change!!